There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
सेक्टर 11 द्वारका, नवी दिल्ली मध्ये, एक अन्न विक्रेता आहे.
हा माणूस 'नान थाली' विकतो.
आजपर्यंत मी पाहिलेल्या "business strategies" मध्ये त्याची strategy खूप वेगळी आहे.
एके दिवशी, आम्ही त्याच्या गाडीपाशी जेवायला थांबलो.
आम्ही त्याला किंमती विचारल्या. तो म्हणाला, 50/- 'आलू नान' (बटाटा नान), 120/- 'चूर चूर नान' आणि 140/- 'पनीर नान' साठी.
================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============
मला वाटले की आलू नान आणि चूर चूर नान मध्ये ७० रुपयांचा फरक खूप जास्त वाटतो आहे, आलू नान अगदीच साधा असेल असा विचार केला आणि मी चूर चूर नान ऑर्डर केला.
मी चूर चूर नान मागवला, आणि एक लहान विचित्र नान समोर आला. मग दुसरा माणूस त्याच्या प्लेटमध्ये एक आलू नान घेऊन आला. मी पाहिले तर सर्व नान आणि करी समान होती. त्याची प्लेट रु. फक्त 50!
मग मला लक्षात आले की बहुतेक लोक (विशेषत: स्त्रिया) जे महागड्या कार ने येऊन ऑर्डर देतात ते महागतला नान घेतात आणि बाईकर्स किंवा कामकरी लोक स्वस्त नान मागवतात.
तो वेगवेगळ्या किंमतींवर त्याच वस्तू विकतो!
थांबा, अजून संपले नाही.
रस्त्याच्या अगदी उलट बाजूस आणखी दोन विक्रेते आहेत. ते पण त्याचे लोक आहेत!
समान उत्पादन, समान गुणवत्ता परंतु किंमती 20% स्वस्त आहेत. रिक्षावाले तेथे खातात.
कमाल!
तो सर्व प्रकारच्या ग्राहकांना एकाच ठिकाणी विकत होता परंतु वेगवेगळ्या किंमतीला !
मित्रानो, आपणही ही "pricing strategy" वापरून बघा. सर्व ग्राहक समान नसतात, त्यांची पैसे देण्याची क्षमता वेगवेगळी असते! एक उद्योजक म्हणून तुम्ही याचा फायदा घेत आहात का?
================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com