'अतिविचार' हेच अनेक समस्यांचे मूळ असते ! अलीकडच्या काळात अनेक लोकांना अतिविचार करण्याच्या समस्येने ग्रासलेले आहे असे विधान केल्यास वावगे ठरणार नाही. अनेक लोक हे कोणत्याही गोष्टीचा अतिविचार करतात आणि आपल्या मेंदूला त्यामुळे सतत व्यस्त ठेवतात. अगदी अलीकडच्या काळापर्यंत कोणीच या सवयीला समस्या म्हणून पह...