About Us
NETBHET E-LEARNING SOLUTIONS
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
सोप्या मराठी भाषेतून बिझनेस, तंत्रज्ञान आणि करिअरसाठी उपयुक्त
ऑनलाईन कोर्सेस शिकण्याचे एकमेव आपल्या हक्काचे ठिकाण !
प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी
प्रशिक्षक श्री. सलिल सुधाकर चौधरी हे "नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स", "नेटभेट वेब सोल्युशन्स" आणि "चौधरी ईंजिनिअरींग कंपनी" या तीन व्यवसायांचे संस्थापक आहेत.
सिम्बिऑसिस युनिव्हर्सीटी मधून त्यांनी जनरल मॅनेजमेंट या विषयामध्ये एमबीए पुर्ण केले आहे. त्याचसोबत १४ वर्षांचा कॉर्पोरेट मधील सेल्स, सर्वीस, मार्केटिंग, ऑपरेशन्स, बिझनेस डेवलपमेंट या विविध क्षेत्रांचा अनुभव आहे.
महिंद्रा अँड महिंद्रा, गॉडफ्रे फिलिप्स इंडीया लिमिटेड, गोदरेज अँड बॉइस प्रायव्हेट लिमिटेड या कंपन्यांमध्ये त्यांनी विविध पदांवर काम केले आहे.
ऑनलाईन बिझनेस, डीजीटल मार्केटींग या विषयांमध्ये ते तज्ञ आहेत. या विषयावरील अनेक ट्रेनिंग (कार्यशाळा) मध्ये ते शिकवितात आणि मार्गदर्शन करतात.आता पर्यंत २००० हून अधिक उद्योजकांनी सलिल सुधाकर चौधरी यांच्या ट्रेनिंगचा प्रत्यक्ष फायदा घेतला आहे. तसेच २५००० हून अधिक लोक जगभरातून त्यांचे ऑनलाईन कोर्सेस शिकत आहेत.