There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
महिला सर्वच क्षेत्रात यशस्वी आणि सर्वोत्तम कामगिरी करत आहेत, अर्थातच उद्योग क्षेत्र हे त्याला अपवाद नाही. उद्योग क्षेत्रामध्ये जवळजवळ १४% असे उद्योग आहेत ज्यांची मालकी आणि व्यवस्थापन महिला करत आहेत आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आपल्या भारतामध्ये अशा खुप महिला उद्योजिका आहेत ज्या त्यांच्या त्यांच्या उद्योग क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत आहेत आपण आज अशाच टॉप १० महिला उद्योजिकांबद्दल जाणून घेणार आहोत.
१. फाल्गुनी नायर
आय आय एम अहमदाबाद मधून मॅनॅजमेण्टचं शिक्षण पूर्ण करून फाल्गुनी नायर यांनी आपल्या करिअरची सुरुवात A. F. Ferguson या कंपनीतून केली. त्यानंतर कोटक महिंद्रा फायनान्स मध्ये काम करण्यास सुरुवात केली. कंपनीची लंडन येथे शाखा सुरु करून अल्पावधीतच अमेरिकेत देखील ऑफीस स्थापन केले. भारतात परत येऊन २०१२ पर्यन्त कोटक महिंद्रा फायनान्स मध्येच काम करत राहिल्या.अमेरिकेत असताना त्यांच्या निदर्शनास आलेली एक गोष्ट म्हणजे तेथे असलेल्या सौंदर्यप्रसाधनांची मोठमोठी आणि महागडी दुकाने.त्यामुळे भारतामध्ये सौंदर्यप्रसाधने सर्वच स्तरातील ग्राहकांना योग्य दरात आणि घरपोच उपलब्ध करून देणे हा एक विचार त्यांच्या या स्टार्टअप मागे मुख्यत्वे होता.
इतक्या वर्षांच्या कॉर्पोरेटमधल्या कामाचा अनुभव असताना २०१२ मध्ये त्यांनी आपल्या उत्तम अश्या करिअरला राम राम केला आणि 'नायका' या ईकॉमर्स स्टार्टअप कंपनीची स्थापना केली. यामध्ये सौंदर्यप्रसाधने, पर्सनल केअर तसेच आरोग्यविषयक प्रोडक्ट्स चा समावेश होता.सर्वच उत्पादने ऑनलाइन आणि वाजवी दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अल्पावधीतच नायका ग्राहकांच्या पसंतीस उतरला.
२. निरु शर्मा
कंप्युटर सायन्स मध्ये इंजिनीअरिंग ची डिग्री संपादन करुन निरु शर्मा यांनी कार्नेगी मेलॉन युनिवर्सिटी मधुन मॅनॅजमेण्टचं शिक्षण पूर्ण केले. इन्फिबिम या कंपनिच्या त्या सह संस्थापिका आहेत.
इन्फिबिम या ई-कॉमर्स कंपनीची स्थापना २००७ साली झाली. हि कंपनी मुख्यत्वे पुस्तके, इलेक्ट्रॉनिक्स आणि ऑटोमोबाइल या प्रकारचे प्रोडक्ट्स योग्य दरात आणि घरपोच उपलब्ध करुन देते. इन्फिबिम हि कंपनी बॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड आहे त्याचबरोबर IPO फाईल करणारी इन्फिबिम हि भारतातील पहिली इकॉमर्स कंपनी बनली आहे.
३. राधिका घाई अग्रवाल
वॉशिंग्टन युनिवर्सिटी मधून मॅनॅजमेण्टचं शिक्षण पूर्ण करुन स्टॅनफोर्ड मधुन त्यांनी वेब २.० आणि क्रिएटिव्ह राइटिंगचं शिक्षण घेतलं. राधिका घाई अग्रवाल या शॉपक्लूझ कंपनीच्या सह संस्थापिका आहेत त्याचबरोबर युनिकॉर्न क्लब मध्ये जाणार्या त्या पहिल्या भारतीय महिला उद्योजिका आहेत.
शॉपक्लूझ कंपनी हि त्यांची पहिली कंपनी नसुन त्यांनी त्यापूर्वी फॅशनक्लूझ नावाची कंपनी परदेशी महिलांसाठी सुरु केली होती. शॉपक्लूझ हि अमॅझॉन, फ्लीपकार्ट प्रमाणेच एक इ-कॉमर्स कंपनी आहे.
४. रिचा कर
एका पारंपारिक पारिवरीक पार्श्वभूमी असलेल्या रिचा कर यांनी पुढे येऊन स्त्रियांच्या आंतरवस्त्रांशी निगडीत "झिवामी" नावाचा ब्रँड २०११ मध्ये बाजारात आणला आणि आता हा ब्रँड स्त्रियांमध्ये प्रसिध्द असणार्या ब्रँड पैकी एक आहे.
रिचा कर यांनी बिट्स पिलानी मधून आपल डिग्री च तर नरसी मोनजी इन्स्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट मधून मॅनेजमेंटचं शिक्षण पुर्ण केल. झिवामी लाँच करण्याअगोदर त्यांनी आय टी कंपनी मध्ये काम केल आहे आणि आता त्या भारतातील यशस्वी उद्योजिकांपैकी एक आहेत.
५. सबिना चोप्रा
सबिना चोप्रा या यात्रा च्या सह संस्थापिका आहेत. भारतातील सर्वात मोठी युरोपिअन ट्रॅव्हल कंपनी इ-बूक बरोबर १६ वर्षे कामाच्या अनुभवाबरोबरच त्या भारतातील यशस्वी उद्योजिकांपैकी एक आहेत. दिल्ली युनिवर्सिटी मधुन त्यांनी त्यांचं बॅचलर ऑफ आर्ट्स मध्ये आपल डिग्री शिक्षण पूर्ण केलं आहे. सबिना यांनी त्यांचे अजुन दोन सह संस्थापक ध्रुव श्रिंगी आणि मनिष अमिन यांच्याबरोबर २००६ मध्ये यात्रा.कॉम लाँच केली.
यात्रा हि एक ऑनलाईन ट्रॅव्हल एजन्सी असुन ग्राहक तिथे होटेल्स, फ्लाइट टिकीट्स, ट्रेन टिकीट्स, बस टिकीट्स आणि भारतात तसेच परदेशात हॉलिडे पॅकेज बूक करु शकतात. हि कंपनी गुरुग्राम मध्ये असुन एप्रिल २०१२ मध्ये हि कंपनी भारतातील दुसर्या क्रमांकाची ट्रॅव्हल सर्विस पुरवणारी कंपनी बनली.
================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी आजच आमचे अॅन्ड्रॉइड अॅप इन्स्टॉल करा.
https://bit.ly/35Axjzz
================
६. सायरी चहल
सायरी चहल या शेरॉझ कंपनीच्या संस्थापिका आणि CEO आहेत. ही कंपनी हा त्यांनी हाती घेतलेला पहीला उपक्रम नसुन त्यांच अजुन एक उपक्रम आहे ज्याच नाव फ्लेक्झीमॉम्स असं आहे याच उपक्रमामधून त्यांना शेरॉझ ची कल्पना सुचली आणि त्या भारतातील यशस्वी उद्योजिका बनल्या. शेरॉझ हे एक असे ऑनलाइन व्यासपीठ आहे जिथे महिलांना प्रोफेशन बद्दल सल्ला दिला जातो आणि जिथे त्या वेगवेगळ्या करिअर संधी अनुभवु शकतात.
महीलांना योग्य करिअर निवडण्यास मदत करणे आणि त्यांच आयुष्य सुखकर बनवणे या उद्देशाने २०१४ मध्ये शेरॉझ या कंपनीची सुरुवात झाली. शेरॉझ महीलांसाठी करिअर हेल्पलाईन सुध्दा चालवते ज्याच संचलित करिअर काउन्सिलर्स आणि प्रशिक्षकांची टीम करते ते महीलांना पाठींबा ,सल्ला आणि संसाधने पुरवून मदत करतात. पुढील दहा वर्षामध्ये भारतातील १०० मिलिअन महीलांना योग्य करिअरच्या नकाशावर आणने त्यांचे स्वप्न आहे.
७. श्रध्दा शर्मा
श्रध्दा शर्मा युवरस्टोरी च्या संस्थापिका आहेत. युवरस्टोरी हे उद्योजकांसाठी एक मिडीया टेक्नॉलॉजी व्यासपीठ आहे. याबरोबर त्या भारतातील टॉप ब्लॉगर्सपैकी एक आहेत. उद्योजकांना त्यांची स्टोरी सर्वांसमोर मांडता यावी या उद्देश्याने युवरस्टोरीची सुरुवात २००८ मध्ये झाली.
आत्तापर्यंत युवरस्टोरी ने ७०,००० पेक्षा जास्त उद्योजकांच्या स्टोरिज पब्लिश केल्या आहेत आणि ५०,००० पेक्षा जास्त उद्योजकांना नेटवर्किंग आणि फंडींग साठी संधी दिली आहे. युवरस्टोरी ७०,००० पेक्षा जास्त स्टोरिज च्या बेसवर उभी आहे आणि श्रध्दा या १०० माणसांच्या मुख्य म्हणुन काम बघतात . त्या ११ लोकल भाषांमध्ये माहिती पुरवतात तर मिलिअन पेक्षा जास्त त्यांच्या वाचकांचा बेस आहे.
८. सुची मुखर्जी
लाईमरोड ची संस्थापिका असलेली ही भारतीय महीला जिने आपल्या औद्योगिक प्रवासाची सुरुवात २०१२ मध्ये केली जेव्हा ती प्रसुती रजेवर होती. दुसर्या बाळाला जन्म दिल्यानंतर काही दिवसांनी जेव्हा त्या मॅगझिन वाचत होत्या तेव्हा त्यांना ही बिझनेस कल्पना सुचली.
सुची मुखर्जी या हरियाणा मध्ये त्यांचे पति आणि दोन मुलांबरोबर राहतात. १९९८ साली त्यांनी लेहमॅन ब्रदर्स या कंपनीसोबत आपल्या करिअर ची सुरुवात केली त्यानंतर त्यांनी वर्जीन मिडीया या कंपनीमध्ये डायरेक्टर म्हणून काम सांभाळंल त्यांनी ईबे, स्काइप ,गम-ट्री यासारख्या कंपन्यांबरोबर सुध्दा काम केले आहे. लाइमरोड ही एक ऑनलाइन फॅशन , जीवनशैली आणि अॅक्सेसरीज मध्ये काम करणारी कंपनी आहे
९. उपासना टाकू
उपासना टाकू या झ्याक-पे या कंपनीच्या संस्थापिका आणि मोबिक्विक या कंपनीच्या सह संस्थापिका आहेत. त्या चालवत असलेली मोबिक्विक ही कंपनी भारतातील सर्वात मोठी स्वतंत्र मोबाइल पेमेंट नेटवर्क कंपनी आहे आणि त्याचबरोबर झ्याक-पे ही ऑनलाइन पेमेंट गेटवे आहे.
उपासना यांनी HSBC आणि पेपाल बरोबर काम केले आहे त्या॑तुनच त्यांना ऑनलाइन पेमेंट बद्द्ल माहीती आणि पार्श्वभूमी मिळाली. एपिल २००९ मध्ये त्यांनी बिपीन प्रितसिंग यांच्याबरोबर मोबिक्विक ची स्थापना केली आणि २०१७ मध्ये झ्याक-पे लाँच केली जी मोबिक्विक साठी पेमेंट गेटवे म्हणून काम करते.
१०. वंदना लुथरा
वंदना लुथरा या VLCC हेल्थकेअर लिमिटेड च्या संस्थापिका आहेत. त्या सौंदर्य, फिटनेस,अन्न, न्युट्रीशन आणि त्वचेची काळजी या गोष्टींमध्ये पारंगत आहेत. त्या हे सर्व जर्मनी , युके, फ्रान्स मधून शिकल्या आहेत.
नवी दिल्ली येथे १९८९ मध्ये वंदना यांनी VLCC ची सेवा सुरु केली आणि आता त्या ३२६ पेक्षा जास्त स्थानांमध्ये, १५३ पेक्षा जास्त शहरांमध्ये आणि १३ देशांमध्ये त्यांचा बिझनेस पसरला आहे. फोर्ब्स आशिया २०१६ च्या रँकिंगनुसार वंदना या ५० व्या पॉवर बिझनेस वुमन आहेत (ज्यामध्ये आशिया,ऑस्ट्रेलिया आणि न्याझीलंड चा समावेश होतो.)
ना संपणार तुझे अस्तित्व , ना तू विरळ होणार
तुझवाचून हे विश्व आपुले, किती काळ टिकणार.......
नेटभेटच्या तर्फे जागतिक महीला दिनाच्या शुभेच्छा !
================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============
धन्यवाद !
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com