"कामाचा योग्य मोबदला" हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे, आणि तो मी मिळवणारच!

access_time 2020-01-22T06:27:32.153Z face Team Netbhet BusinessMarketingSalesEntrepreneurship

आमच्या प्रत्येक ट्रेनिंग मध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना मी ट्रेनिंगच्या सुरुवातीलाच त्यांच्या बिझनेसमधला सर्वात मोठा प्रॉब्लेम एका वाक्यात मांडायला सांगतो. नुकताच झालेल्या नेटभेटच्या एका ट्रेनिंग प्रोग्राममध्ये एक उद्योजक आले होते. त्यांनाही हा प्रश्न विचारला असता त्यांचे उत्तर होते "उधारी" ! तसा हा प्रश्न बर्‍याच उद्योजकांचा असतो पण या गृहस्थांची समस्या जास्त गंभीर होती. २५ लाखांचा टर्नओव्हर असणार्‍या या उद्योजकाची बाजारातून साधारण ४० लाखांची थकबाकी येणे बाकी होती. नेहमी विकत घेणार्‍या ग्राहकांसोबत चांगले संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात त्यांनी एवढी turnover च्या दीडपट outstanding amount बनविली होती. मी त्यांना सांगीतले की पुढच्या सहा महिन्यात किमान ५०% थकबाकी जमा करा नाहीतर विक्रीच बंद करा.

मित्रांनो, आपल्यापैकी बर्‍याच जणांना हा प्रश्न भेडसावत असेल. कित्येक लघुउद्योजकांच्या स्वप्नभंग करणार्‍या या महत्त्वाच्या समस्येकडे नीट पाहूया. मोठ्या कंपन्यांमध्ये ग्राहकांकडून येणारी थकबाकी जमा करण्यासाठी पुरेसं आर्थिक आणि मनुष्यबळ असतं. परंतु लघुउद्योजकांना मात्र ही सुविधा नसते. ग्राहक शोधण्याच्या, ऑर्डर मिळविण्याच्या नादात ग्राहकांकडून वेळेवर पैसे मिळविणे याकडे दुर्लक्ष होतं. आणि ग्राहकासोबत वैयक्तिक पातळीवर चांगले संबंध असल्यामुळे पैशांसाठी तगादा लावला जात नाही.  

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी आजच आमचे अ‍ॅन्ड्रॉइड अ‍ॅप इन्स्टॉल करा.
https://bit.ly/35Axjzz
================

१. सगळ्यात आधी MINDSET मध्ये बदल करणे गरजेचे आहे. आपल्या कामाचा योग्य मोबदला वेळेत मिळविणे हा आपला हक्क आहे हे मनात बिंबवले पाहिजे. ऑर्डर आल्यानंतर सेल पुर्ण होत नाही तर ग्राहकाकडून पुर्ण पैसे मिळविल्यानंतरच सेल पूर्ण होतो. आपले पैसे मागण्यासाठी कचरु नये हा MINDSET मधील बदल स्वीकरला पाहिजे.

२. पैशांसाठी फॉलो-अप कमी करतातच. पण आपल्या कामासाठी पुरेसे पैसे न मागणे ही उद्योजकांची दुसरी चूक असते. पैसे येण्यास ३ महिने उशीर झाला तर आपल्या मार्जिनमधून नफा पुर्णपणे निघून जातो. म्हणून पुरेसे मार्जिन ठेवूनच विक्री केली पाहिजे.

३. ग्राहकांना पैसे देण्यासाठी दिलेला अवधी म्हणजेच क्रेडीट पीरीयड हे खरंतर वाटाघाटींचे एक हत्यार आहे. Advance payment केल्यास वेगळी किंमत, ऑर्डर नंतर ७ दिवसांत पेमेंट केल्यास वेगळी किंमत, एक महिन्यात पेमेंट केल्यास वेगळी किंमत असे प्लान्स तयार करा. ग्राहकांसोबत Negotiation करताना याचा पुरेपुर वापर करा.

४. फॉलो-अप सीस्टम बनवा. प्रत्येक ग्राहकाची थकबाकी किती आहे, किती टक्के आहे आणि किती दिवसांपासून आहे याचा तक्ता बनवा. तुम्ही दिलेल्या क्रेडीट पीरीयड नंतर किती जण १५ दिवस, ३० दिवस, ६० दिवस, ९० दिवसांपेक्षा जास्त आहेत त्याचा दर आठवड्याला अभ्यास करा. आणि त्यानुसार फॉलो अप वाढवा. आपल्या टीमला लवकरात लवकर थकबाकी परत आणण्यासाठी INCENTIVES द्या.

५. ऑनलाईन विक्री करा. जास्तीत जास्त वेळा, शक्य असेल तेव्हा ऑनलाईन विक्री करा. ग्राहकांना ऑनलाईन खरेदीचा पर्याय वापरण्यासाठी प्रोत्साहित केला. ऑनलाईन बिझनेसमध्ये आधी पैसे हातात येतात आणि नंतर ऑर्डर पुर्ण केली जाते. (ऑनलाईन बिझनेस कसा सुरु करायचा हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा - https://www.netbhet.com/ecom.html )

६. ऑटोमॅटीक रीमाइंडर वापरा. बर्‍याच ऑनलाईन अकाउंटींग सॉफ्टवेअर्स मध्ये पेमेंट येईपर्यंत ईमेल / SMS फॉलो अप करण्याची सुविधा असते. अशा सीस्टम जरुर वापरा.

७. बरेच उद्योजक दर महिन्याचं Profit & Loss Statement आणि Balance Sheet बनवत नाहीत किंवा काळजीपुर्वक अभ्यासत नाहीत. थकबाकीचा आपल्या बिझनेसवर कसा परिणाम होतो आहे हे जर आपण आकड्यांमध्ये पाहिले तर आपोआप थकबाकी जमा करण्याचं महत्त्व कळेल. आणि या महत्त्वाच्या गोष्टीसाठी उद्योजक आपोआप वेळ देउ लागतील.

मित्रांनो, सध्या अनेक बँकांना थकबाकी वेळेवर जमा न केल्याचा फटका पडतो आहे. त्यामुळे रातोरात बँका बंद पडताना आपण पाहत आहोत. आपल्या बिझनेस वर ही वेळ देऊ नका. वर दिलेल्या उपायांची अंमलबजावणी करून आपल्या बिझनेसला "नफा" मिळवून द्या.

================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

WE WOULD LOVE TO HEAR FROM YOU
GET IN TOUCH
E-MAIL
admin@netbhet.com
REGISTERED OFFICE
Netbhet E-Learning Solutions Workloft,61 Der Deutsche Park,
next to Nahur railway station,Nahur west, Mumbai 400078
Call - 908-220-5254
WHATSAPP US +91 908 220 5254
SOCIAL LINKS