लक्ष्य २०२० - ध्येयनिश्चीती ते ध्येयपुर्ती

access_time 2019-12-31T06:26:28.353Z face Team Netbhet TrainingWorkshopsGoal SettingPersonal Development

नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्सतर्फे आयोजित "लक्ष्य २०२०" - ध्येयनिश्चीती ते ध्येयपुर्ती ही कार्यशाळा काल उत्साहात पार पडली. मुंबई, पुणे, कोल्हापूर, सातारा अशा अनेक ठिकाणांहून या कार्यशाळेत सहभागी होण्यासाठी प्रशिक्षणार्थी आले होते.

या कार्यशाळेत प्रशिक्षक श्री. केतन गावंड यांनी अत्यंत मोलाचे मार्गदर्शन केले. सन २०२० साठी प्रत्येकाने आपापले वैयक्तिक आणि व्यावसायिक ध्येय काल ठरवले. अत्यंत काटेकोर,पद्धतशीर आणि नेमकी ध्येय निश्चीतीची

प्रोसेस वापरुन प्रत्येकाने आपली ध्येये ठरविली आणि ती पुर्ण करण्यासाठी वर्षभराचा, प्रत्येक महिन्याचा, प्रत्येक आठवड्याचा Action Plan देखिल बनवला. एवढेच नव्हे तर आता वर्षभर नेटभेट तर्फे प्रत्येकाच्या

ध्येयपुर्तीच्या वाटचालीमध्ये मदत देखिल करण्यात येणार आहे.

एकंदरीत हा कार्यक्रम अतिशय छान आणि "आयुष्याला कलाटणी" देणारा ठरला. या कार्यक्रमाची काही क्षणचित्रे -

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com