There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
डॉमिनोज, पिझ्झाहट, मॅकडोनल्ड्स, सबवे किंवा केएफसी सारख्या कोणत्याही दुकानात जेव्हा तुम्ही ऑर्डर देत असता तेव्हा संवाद कसा असतो पहा.....आपण उदाहरणार्थ पिझ्झा घेउया !
आपण - एक वेज पिझ्झा
विक्रेता - त्यावर एक्स्ट्रा चीज पाहिजे का ?
आपण - होय, चलेल
विक्रेता - सोबत काही ड्रिन्क्स पण पाहिजेत का ?
आपण - होय, पेप्सी द्या
विक्रेता - पेप्सी रेग्युलर की लार्ज ?
आपण - रेग्युलर (लार्जला जास्त पैसे लागतील असा विचार करुन :-)
विक्रेता - जर आपण मील कॉम्बो घेतला तर मोठा पिझ्झा आणि लार्ज पेप्सी दोन्ही स्वस्तात मिळेल. मील कॉम्बो साठी ऑर्डर अपग्रेड करु का ?
आपण - ओके
विक्रेता - सर आपली ऑर्डर कंन्फर्म झाली आहे. सोबत गार्लिक ब्रेड किंवा डिप्स पण पाहिजेत का ?
आपण - नको
विक्रेता - ओके
आपल्या पैकी अनेकांना असाच अनुभव आला असेल. त्वरीत "नाही" बोलणे जमत नाही ही आपली मानसशास्त्रीय कमजोरी आहे. याचाच उपयोग करुन अनेक रेस्टॉरंट्स आपल्याला जास्तीच्या गोष्टी यशस्वीरित्या विकतात. मित्रांनो, याच युक्तीला अप-सेल आणि क्रॉस-सेल असे म्हणतात.
================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी आजच आमचे अॅन्ड्रॉइड अॅप इन्स्टॉल करा.
https://bit.ly/35Axjzz
================
या सर्व फास्ट-फूड कंपन्या आपल्या रेस्टॉरंटमधील कर्मचार्यांना असे जास्तीचे प्रश्न विचारुन सेल्स वाढविण्याचे खास प्रशिक्षण देतात. आणि बर्याच ठिकाणी कर्मचार्यांना अतिरिक्त सेल्ससाठी कमिशन देखिल मिळते.
मुख्य प्रॉडक्टच्या सोबत दिल्या जाणार्या अतिरिक्त गोष्टींमध्ये % मार्जिन मात्र जास्त असते. त्यामुळे नफ्याचं प्रमाण वाढविण्याचं काम मात्र याच अतिरिक्त गोष्टी करत असतात.
आपल्यालाही आपल्या बिझनेसमध्ये नफा वाढवायचा असेल तर कुठे कुठे अप-सेल आणि क्रॉस-सेल करता येईल का याचा विचार करायला लागेल. हा लेख वाचल्यानंतर तसा विचार तुम्ही सुरु करालच याची मला खात्री आहे. अप-सेलिंग आणि क्रॉस-सेलिंगचा विचार करण्यासाठी उपयुक्त ठरतील असे काही मुद्दे खाली देत आहे -
१. आधी सेल नंतर अप-सेल - अपसेलिंग तेव्हाच केली जाते जेव्हा मुख्य ऑर्डर पुर्णपणे हातात असेल. आधीच घाई-घाईत अपसेल करायला जाऊ नका.
२. संबंधित उत्पादन - मुख्य प्रॉडक्टला संबंधित असलेली इतर उत्पादनेच अप-सेल केली जाऊ शकतात. क्रॉस-सेल करताना वेगळी उत्पादने करु शकता परंतु मुख्य आणि क्रॉस सेल उत्पादनाचा वापर एकमेकाला पुरक असावा
३. ओढुन-ताणून अप-सेल नको - अप-सेल प्रॉडक्ट्स मुख्य प्रॉडक्टच्या सोबत चपखल बसली पाहिजेत. केवळ विक्री-वाढविण्याच्या उद्देशाने जबरदस्ती ऑफर मध्ये बसविलेली उत्पादने अप-सेल होत नाहीत.
४. २०% नियम - अप-सेलची किंमत मूळ प्रॉडक्टच्या किंमतीच्या साधारण २०% असलेली चांगली...त्यापेक्षा जास्त असेल तर अप-सेल सहसा होत नाही.
५. सराव - अप-सेल करण्याचा विषेश सराव करणे गरजेचे असते. ग्राहकाला प्रवृत्त करतील असे योग्य शब्दच वापरले गेले पाहिजेत. तसेच अपसेलची वेळही अचूक साधता आली पाहिजे.
अप-सेल किंवा क्रॉस-सेल हे केवळ विक्री किंवा नफा वाढविते असे नाही...तर ग्राहकाचा एकुण अनुभव सुधारण्याचेही काम करते. मनात होते त्यापेक्षा अधिक काहीतरी चांगले मिळाल्याचा आनंद ग्राहकाला मिळवून देण्याचे समाधान अप-सेलिंग आणि क्रॉस-सेलिंग मुळे शक्य होते.
तेव्हा हे तंत्र जरुर आत्मसात करा आणि आपल्या बिझनेसला "प्रॉफिट"चा पिझ्झा खायला द्या !!
================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा -
SUBSCRIBE - https://goo.gl/JtFkBR
===============
धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !
www.netbhet.com