There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
तुलना करणं चुकीचं नाही. तुलना "कशासाठी" आणि "कुणा"बरोबर करायची ते ठरवता आलं पाहिजे.
ज्यांच्याबरोबर बहुतुल्य होता येईल असे सहकारी निवडा आणि त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी हरतऱ्हेचे प्रयत्न करा. जेवढे उच्च कोटीचे लोक तुम्ही सहकारी म्हणून निवडणार तेवढा त्यांच्या कामाची धग आणि ध्येयप्राप्तीची भूक बघून तुम्हाला त्रास होणार.
पण हा काही मुद्दाम दिलेला त्रास नसतो. तुम्हाला तुलना करून द्वेष करण्यासाठी प्रोत्साहन देणारा हा त्रास नव्हे. तर स्वतःला एका उंचीवर घेऊन जाण्यासाठी उद्युक्त करणारा हा त्रास असेल. असा त्रास आणि अशी तुलना केव्हाही फायद्याचीच !
फक्त यामध्ये कुठेही आपला EGO येता कामा नये. EGO जर तुम्हाला हाताळता आला तर या positive तुलनेतून तुम्हाला किती फायदा होईल त्याची काही सीमाच नाही.
आताही तुमचे काही सहकारी असे असतीलच. जे सतत तुम्हाला टोचून बोलत असतील...पण तुमचा अपमान करण्यासाठी नव्हे तर तुम्हाला प्रगतीच्या दिशेने पुढे ढकलण्यासाठी ! याला पोसिटीव्ह प्रेशर म्हणतात.
सत्य काय आहे ते केवळ एकाच माणसाला ठाऊक आहे ! तुम्हाला स्वतःला !
असे जे मित्र/सहकारी तुम्हाला positive pressure देत असतील त्यांना हा मेसेज पाठवा ! आणि मनापासून धन्यवाद द्या !
===========================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स मोफत मिळवण्यासाठी आजच आमचे अॅन्ड्रॉइड अॅप इन्स्टॉल करा.
https://bit.ly/35Axjzz
===========================
धन्यवाद,
टीम नेटभेट
मातृभाषेतून शिकूया , प्रगती करुया !
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
netbhet.com