There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
गम और खुशी मे फर्क ना....
एक माणूस देवळामध्ये प्रार्थना करत असतो. त्याचा मुलगा हॉस्पीटलमध्ये अत्यंत गंभीर आजाराने त्रस्त असतो. आणि आज त्या मुलाचे एक मोठे ऑपरेशन होणार आहे म्हणून त्याचे वडील अत्यंत उदास , खिन्न मनाने देवाकडे प्रार्थना करत असतात.
त्याच वेळेला देवळात एक मुलगा पेढे घेऊन येतो आणि ते देवासमोर ठेवून अत्यंत आनंदाने देवाला पाया पडतो. आज तो चांगल्या गुणांनी बारावी पास झालेला आहे.
काही दिवस जातात्....त्या आजारी मुलाचे वडील अत्यंत आनंदात देवासाठी पेढे घेऊन येतात. त्यांच्या मुलाचे ऑपरेशन यशस्वी झाले आणि तो आता पुर्णपणे बरा झालाय म्हणून त्याचे वडील खुप खुश आहेत.
त्याच वेळेला देवळात एक मुलगा रडत असतो. हा तोच मुलगा आहे जो बारावी पास झाला म्हणून खुप खुश होता. पण आज मात्र तो दु:खी आहे कारण त्याला चांगल्या कॉलेजमध्ये अॅडमिशन मिळाले नाही. तो खुपच खिन्न आहे.
आयुष्यात काहीच शाश्वत नाही. सुखही नाही आणि दु:खही नाही. एका क्षणात होत्याचे नव्हते आणि नव्हत्याचे होते होऊ शकतं. म्हणूनच आनंद आणि दु़:ख या दोन्ही अवस्थांमध्ये शांत , संयमी राहणेच उचित असते. सुख आणि दु:ख दोघांनाही एकाच प्रकारे वागवता आले पाहिजे. ज्या माणसाला हे जमले त्यालाच मनःशांतीचा खरा प्रत्यय येतो.
देव आनंदच्या एका गाण्यातली ओळ म्हणूनच मला खुप आवडते..."गम और खुशी मे फर्क ना मेहसूस हो जहां, मै खुदको उस मुकाम पे लाता चला गया....मै जिंदगीका साथ निभाता चला गया !
================
नेटभेट चे लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
===============
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकुया, प्रगती करुया !
www.netbhet.com