There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
सध्याच्या वेगाने बदलत जाणाऱ्या या काळात जीवनशैली व्यवसाय म्हणजेच लाइफस्टाइल बिझनेस हि संकल्पना चर्चेत आहे.नक्की काय आहे ही लाइफस्टाइल बिझनेसची संकल्पना??
लाइफस्टाइल बिझनेसची सोपी व्याख्या म्हणजे असा बिझनेस जो तुम्हाला तुमच्या मनाप्रमाणे आयुष्य जगण्यासाठी मानसिक आणि आर्थिकदृष्टया सक्षम बनवतो. याचे उदाहरण सांगायचे झाले तर लेखनाची आवड असलेली व्यक्ती फ्रीलान्सर लेखक म्हणून जेव्हा काम करते तेव्हा ती लाइफस्टाइल बिझनेस करते असे आपण म्हणू शकतो.
कारण यामध्ये ती व्यक्ती तिला जी गोष्ट करायला आवडते म्हणजेच जर लिखाण करायला आवडतं तर ते स्वतःच्या वेळेनुसार कधीही ,कुठेही ,प्रवास करताना अथवा घरी बसून करू शकते. यामध्ये काम करताना स्वतःची वैयक्तिक कामे,इतर जबाबदाऱ्या (कुटुंब,मुले इ.) अश्या गोष्टींचा योग्य तो समतोल राखून स्वतःच्या सवडीनुसार आणि आवड जपून काम करता येते.
लाइफस्टाइल बिझनेस मध्ये एकतर स्वतःची आवड जोपासता येते आणि मुख्य म्हणजे त्यातून तुम्ही अर्थार्जनही करू शकता.हि थोडी नवीन संकल्पना असल्याने असे खूपसे व्यवसाय यात मोडू शकतात.
सध्या चालू असलेले लाइफस्टाइल व्यवसाय हे फक्त एखादे दुकान अथवा एखादे प्रॉडक्ट बनवणे किंवा रूढ अर्थाने उद्योजकता (entrepreneurship)नाही. अनेक लाईफस्टाईल उद्योजक ऑनलाइन काम करतात आणि वेगवेगळ्या सेवा पुरवतात किंवा एखादा अभ्यासक्रम विकसित करतात, त्यांच्या वेबसाइट्स किंवा पॉडकास्टमधून पैसे कमावतात.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
या लाइफस्टाइल बिझनेस चे बरेचशे फायदे आपल्याला दिसून येतात.स्वतःच्या वेळेनुसार कामाचे तास निवडणे हि एक मोठी जमेची बाजू आहे.आपले कामाचे तास निवडणे त्याप्रमाणे ग्राहकांची निवड या सारख्या गोष्टी अशा पद्धतीच्या व्यवसायाममध्ये करणे आपल्या हातात असते.
कामाचे स्वातंत्र्य हा दुसरा फायदा.आपल्या मनाप्रमणे काम करणे ,ग्राहक निवडीचे स्वातंत्र्य मिळते. तसेच पारंपरिक पद्धतीचे ऑफिस, ऑफिस स्टाफ किंवा कर्मचारी या सगळ्या गोष्टींचा समावेश नसल्याने इतर अनावश्यक जबाबदाऱ्या नसतात.
सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे इतर ओव्हरहेड्स चा खर्च नसतो.फक्त एक लॅपटॉप अथवा कंप्युटर आणि इंटरनेट जोडणी..बस्स तुम्ही काम सुरु करायला तयार…!
अश्या पद्धतीचे लाइफस्टाइल बिझनेस सुरु करण्याआधी आपल्याला व्यवसायातुन नक्की काय साध्य करायचे आहे याचा विचार करणे आधी गरजेचे आहे. प्रसिद्धी हवीय का? एखाद्या नवीन उत्पादनासह जग बदलण्याची इच्छा? "पारंपारिक" 9 ते 5 नोकरीऐवजी आपल्याला हवे असलेले आयुष्य जगण्यासाठी पुरेसे पैसे कमवायची इच्छा आहे का? आपल्याला आयुष्याकडून काय हवे आहे आणि आपल्या व्यवसायातुन आपण नक्की काय साध्य करू इच्छितो हे मनाशी ठरलं कि मग आपल्याला पाहिजे ते मिळविण्यासाठी लाइफस्टाइल बिझनेस हा एक चांगला मार्ग असू शकतो.
================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
Netbhet.com