There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आपण नेहमी आपल्यासारख्या समविचारी माणसांसोबत वेळ घालवणेच नेहमी पसंत करतो. किंबहुना आपण सोयीस्कररीत्या अशी सवय लावून घेतो.
आपल्यासारखेच वागणारे,आवडी-निवडी सारखे असणारे, समान विचार करणारे आणि आपल्यावर विश्वास ठेवणाऱ्या लोकांसोबत वेळ घालवणे हे आपल्यासाठी सोयीचे आणि मोकळेपणाचे ठरते. हे लोकं आपल्याला आपण एकटे नाहीत याची जाणीव करून देत असतात.
परंतु हे लोक आपण आपले स्वतंत्र व्यक्तिमत्त्व म्हणून सिद्ध करण्यासाठी अथवा वाढ होण्यासाठी तसेच निरनिराळ्या अनुभवाने समृद्ध होण्यासाठी पुरेशी नसतात.
म्हणूनच समृद्ध होण्यासाठी,अनुभव संपन्न होण्यासाठी,यशस्वी होण्यासाठी काहीसा न आवडणारा ⅓ नियम पाळणे महत्त्वाचे ठरते.पण हा नियम पाळायचा म्हणजे नक्की काय हे आपण सविस्तर पाहू.
===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
जे तुमच्यापेक्षा हुशार,वरचढ आहेत अशा लोकांसोबत तुमचा ⅓ वेळ घालवा.ते तुमचे मार्गदर्शक,गुरु म्हणून नेहमी मदत करतील.अगदी तुमचे समवयस्क मित्र ज्यांनी यशाचा टप्पा काहीसा आधीच गाठला आहे.असे लोक अथवा मित्र ज्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये प्रगती केली आहे,अश्या लोकांच्या निव्वळ सानिध्यात राहिल्याने देखील तुमच्यात आमूलाग्र बदल होऊ शकतात.
तुमचा दुसरा एक तृतीयांश वेळ अश्या लोकांसोबत घालवा जे अगदी तुमच्यासारखेच आहेत.तुमचे मित्र,ऑफिस मधले सहकारी असे लोक जे आता सध्या तुम्ही यशाच्या ज्या पायरी जवळ आहात ते देखील त्याच टप्प्यावर आहेत आणि त्यांनादेखील तुमच्या प्रमाणेच प्रगती करायची आहे. उदा. असे मित्र ज्यांची शैक्षणिक तसेच करिअरची सुरुवात तुमच्यासोबत झाली आहे,जे तुमच्यासारखेच पहिल्यांदाच पालक होणार आहेत.अश्या मित्रांच्या,व्यक्तींच्या सोबत वेळ घालवल्याने तुम्ही चालत असलेल्या मार्गावरून पुढे जात असताना विश्वास,दिलासा मिळतो.असे मित्र तुमच्या अडचणी,समस्या समजून घेण्यास सदैव तयार असतात आणि आपल्याला सतत आपण एकटे नाही आहोत याची जाणीव करून देतात.जितकी गरज तुम्हाला त्यांची असते तितकीच त्यांनाही तुमची गरज असते.
तुमचा तिसरा ⅓ वेळ जी लोकं तुमच्यासारखी यशस्वी होण्याचा प्रयत्न करत आहेत,अश्या लोकांसोबत घालवा.तुम्ही जितकं स्वतःला अपडेट करत राहाल, तसाच प्रयत्न हिलोकं सुद्धा तुमच्यासारखं बनण्यासाठी प्रयत्न करत राहती.ज्याप्रमाणे तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त यशस्वी लोंकाना तुमचा आदर्श मानता,मदत घेता त्याचप्रमाणे तुमचे योग्य सल्ले,मार्गदर्शन त्यांना तुमच्याप्रमाणे बनण्यास मदत करतील.तुम्ही जितकं जास्तीत जास्त ज्ञान त्यांना द्याल तितकं जास्त आणि नवनवीन माहिती,ज्ञान मिळवण्यासाठी स्वतःला सज्ज ठेवाल.त्यामुळे स्वतःला अहंकारापासून दूर ठेवू शकाल.
आपण ज्या व्यक्तींच्या सहवासात रमतो त्यांचा,त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव आपल्यावर पडत असतो. म्हणूनच आपण कोणती सोबत निवडतो हे आपल्या सर्वांगीण विकासासाठी खूप मोलाचे ठरते. म्हणूनच म्हटले आहे.... सुसंगती सदा घडो।सुजन वाक्य कानी पडो!
===================
नेटभेटचे उद्योग, व्यवस्थापन आणि प्रेरणादायी लेख, विडिओ आणि कोर्सबद्दल अपडेट्स व्हाट्सअप्प वर मिळविण्यासाठी 908 220 5254 या क्रमांकावर SUBSCRIBE असे लिहून पाठवा किंवा खालील लिंक वर क्लिक करून आमचा व्हाट्सअप्प ग्रुप जॉईन करा - https://goo.gl/JtFkBR
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com