There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
सध्या लॉकडाउनमुळे आपण सगळेच घरात डांबले गेलो आहोत. आता अनायासे सगळेच घरी असल्याने काही दिवस अनस्कुलिंगचा ऑप्शनसुद्धा ट्राय करता येईल असं काही जणांना वाटू शकतं. निदान ह्या लॉकडाउनमध्ये तरी करून बघता येईल का? नक्कीच करता येईल. खरंच, काय हरकत आहे?
पण मग अनस्कुलिंग म्हणजे नक्की काय करायचं? माझ्यामते अनस्कुलिंग म्हणजे 'स्वातंत्र्य'. आपल्या रोजच्या जगण्यात आपल्याला जे काही छोटे मोठे निर्णय घ्यावे लागतात ते घेण्याचं स्वातंत्र्य म्हणजे अनस्कुलिंग. त्यात काय करायचं किंवा कसं हा ही निर्णय आला. पालक या नात्याने त्यातले आपल्याला वाटणारे फायदे तोटे आपण मुलांसमोर मांडू शकतो. पण, निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मात्र त्यांना दिलंच गेलं पाहिजे.
कोणकोणते निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य मुलांना देता येईल? त्यासाठी एक छोटीशी परीक्षा घेता येईल. जे निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य तुम्हाला आहे ते. अपवाद अर्थातच असतील पण ते अत्यावश्यक आणि कमीत कमी असावेत.
उदा. कधी उठायचं? काय खायचं? सुट्टीच्या दिवशी तुम्ही कधी उठायचं हे कोण ठरवतं? दुसऱ्या कोणी हे ठरवलेलं तुम्हाला रुचेल का? जो जेवण बनवणार आहे तो ठरवेल काय बनवायचंय ते. पण ते खायचं की नाही आणि किती खायचं ह्याचा निर्णय खाणाऱ्यावर सोपवायला काय हरकत आहे? बऱ्याच जणांना वाटतं आपण मुलांना भरवलं नाही तर मुलं जेवणारच नाहीत. सुरुवातीला काही काळ तसं होऊही शकेल आणि कदाचित नाहीही. पण त्यांच्या शारीरिक गरजा त्यांना साद घालतीलच. पण आपण सांगू त्या वेळेला, सांगू ते आणि आपण सांगू तेव्हढं त्यांनी जेवलंच पाहिजे हा आग्रह मात्र आपण सोडायला हवा. पण मग मुलं अरबट चरबटच खातील त्याचं काय? मुळात हे घरात आणतं कोण? तुम्हाला वाटत असेल आरोग्यासाठी चांगलं नाहीये तर आणूच नका ना. ना रहेगा बांस, ना बजेगी बांसुरी. आणि मग मुलं सतरा वेळा येऊन मागत राहतील तेव्हा आपण वाढत राहायचं का? तर त्याचीही गरज नाहीये. ज्या वेळेला सगळे जेवतात त्यावेळेला मागितलं तर त्यांना वाढता येईल. इतर वेळी त्यांचं त्यांना वाढून घेता येईल. आणि त्यांनी सांडवलं, खरकटं केलं तर त्यांचं त्यांनाच 'आवरावंच' लागेल. हेच तर आहे अनस्कुलिंग. स्वातंत्र्य आणि त्याच्यासोबत येणारी जबाबदारीही. बाबारे, तुला हवं तसं कर आवरायची जबाबदारी आईची असं होता कामा नये. तुला हवा तो खेळ खेळ. कोणासोबतही खेळ. माझी इच्छा असल्यास मीही खेळीन. तू खेळलास तर तूच आवर आणि आपण मिळून खेळलो तर आपण मिळून आवरूया. बऱ्याचदा पालक जबाबदाऱ्या स्वतःकडे घेतात आणि स्वातंत्र्य मुलांना देतात. हे पुढे जाऊन खूप घातक ठरू शकतं.
===================
तुम्हाला "अभ्यासाचे तंत्र" शिकायचं आहे ? किंवा आपल्या मुलांना अभ्यास कसा करावा ? हे माहित असावं असं तुम्हाला वाटतंय ? तर मग नेटभेटचा हा कोर्स तुमच्यासाठी आहे.
कोर्स बद्दल अधिक माहीती जाणून घेण्यासाठी खालिल लिंकवर क्लिक करा.
https://learn.netbhet.com/s/store/courses/description/Study-Technics
===================
दुसऱ्या टोकाचे पालक मुलांना स्वातंत्र्य मिळावं म्हणून स्वतःचं स्वातंत्र्य विसरून जातात. मूल म्हणलं मला सापशिडी खेळायचीय की बसले खेळायला. थोड्या वेळाने ते म्हणालं ल्युडो की, ल्युडो. खेळा, खेळायला हरकत नाहीये. असूच शकत नाही. पण, जणूकाही मुलांचं एंटरटेनमेंट करायची सगळी जबाबदारी आपल्यावरच असल्यासारखं वागून काय उपयोग? तुम्हाला इच्छा असेल तेव्हा खेळा इतरवेळी नाही. पण मग काहीजण म्हणतील आम्हाला मुलांचे खेळच आवडत नाहीत तर नाहीच खेळायचे का? मला वाटतं, अशावेळी आपण कुटुंबात एकत्र का राहतोय ह्याचाही थोडा विचार करायला हवा. सगळ्यांच्या सगळ्याच गरजा भागतीलच असं नाही आणि कोणाच्या काहीच भागणार नाहीत असंही होऊ नये. तसं होत असेल तर आपण एकत्र राहूच शकत नाही. शिवाय, एकाच्या सगळ्याच गरजा भागतील आणि दुसऱ्याच्या काहीच नाही असं तर नाहीच नाही. थोडं प्लस, थोडं मायनस करून सुवर्णमध्य साधता येईल. शेवटी अनस्कुलिंग फक्त मुलांची होत नसते. झाली तर ती संपूर्ण कुटुंबाचीच होते. नाहीतर कुणाचीच नाही.
मग करून बघता येईल ना? मुलं मेनस्ट्रीममध्ये कशी येणार? सोशल कशी होणार? हे प्रश्न लॉकडाउन असेपर्यंत बाजूला ठेऊयात. हे सगळं करताना बऱ्याच अडचणी येऊ शकतील. आपल्याला न रुचणाऱ्या काही गोष्टी मुलं करतील. कळत नकळत आपल्या लहान मोठ्या अपेक्षा आपण मुलांवर लादत नाहीना हेही आपल्याला पहावं लागेल. जसं की काहीजणांना मुलांनी पुस्तकं वाचलीच पाहिजेत असं वाटतं मग मुलांनी पुस्तक हातात घेतलं की त्यांची बॉडी लँग्वेज बदलते आणि मोबाईल हातात घेतला की चलबिचल सुरू होते. पण आपल्याला खरोखरच स्वातंत्र्य आहे ना हे मुलं चाचपडून बघत असतील नव्हे ते ती बघतातच. आपल्याला ह्या कसोटीस उतरावं लागेल. मुलं बोअर होतील. होऊ देत. त्याचीही जबाबदारी त्यांनाच घ्यावी लागेल. छाप्यासोबत काटाही स्वीकारावा लागेल हे त्यांना कळायला हवं.
एक मात्र लक्षात ठेवायचं, स्वतःचंही अनस्कुलिंग करायचंय. आवश्यक त्या कौटुंबिक जबाबदाऱ्या (अर्थातच त्याही वाटून घेतलेल्या) सोडल्या तर इतर वेळी आपल्याला हवं तसं आपल्या आवडीचं, स्वतःसाठीचं जगायचंय.
- सचिन अधिकारी
sachin@adhikari.co.in
(तुमचे अनुभव ऐकायला मला नक्की आवडेल)
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com