There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
या जगात श्रीमंत व्हायला कोणाला आवडणार नाही..? अनेक लोकांचं तर हे उराशी बाळगलेलं फार वर्षांच स्वप्न असतं की त्यांना एक ना एक दिवस भरपूर पैसे कमावून श्रीमंत व्हायचं असतं..पण हे शक्य आणि साध्य कसं होईल याची त्यांना सुतराम कल्पना नसते. अनेक जण केवळ वर्षानुवर्षे पैसे कमावतात आणि ते खर्च करतात, पण त्या पैशांची गुंतवणूक करून आहे त्यात भर कशी घालता येते याबाबत काडीचीही कल्पना नसते. तसंच पैसे जोडणं ही सवय स्वतःला लावणं, विनाकारण उधळपट्टी न करणं, या सवयीही स्वतःला लावणं त्यांना कधीच महत्त्वाचं वाटलेलं नसतं.. अशा सगळ्यामुळेच अनेकांची श्रीमंत होण्याची स्वप्न कधीच पूर्ण होत नाहीत. पैशांसाठी काम करणाऱ्या बऱ्याच जणांना हे कधीच लक्षात येत नाही, की तुम्ही पैशाला आपल्यासाठी कामाला लावणं हे खरं तर तुम्हाला साध्य करायचंय..
चला तर मग आज जाणून घेऊया, स्टॉक गुरू आणि भारताचे वॉरेन बफेट म्हणून ओळखले जाणारे, भारतातील सर्वात श्रीमंत गुंतवणूकदार राकेश झुंझुंवाला यांनी सांगितलेल्या काही महत्त्वा्च्या बाबींविषयी ज्या अंगिकारल्यानंतर कदाचित तुमचं श्रीमंतीचं स्वप्न तुम्हाला साध्य करता येईल.
1. अधिक परताव्याच्या गुंतवणुकींसाठी वेळ लागतो -
स्टॉक मार्केटमध्ये जेव्हा तुम्ही गुंतवणूक करायला लागता तेव्हा एक गोष्ट लक्षात ठेवा, की तुम्हाला अपेक्षित परतावा मिळवण्यासाठी तुम्ही जी जी गुंतवणूक तेथे करता ती फळाला येण्यासाठी वेळ लागतो. एका रात्रीत कोणतीच गुंतवणूक तुम्हाला भरपूर परतावा कधीच देत नसते हे लक्षात ठेवा. जर तुम्ही घाईत असाल तर तुम्हाला कधीच उत्तम परतावा मिळणार नाही. म्हणूनच तुम्ही नेहमी इतकंच करू शकता की जरा धीर धरा आणि मग अपेक्षित परताव्याचे तुमचे उद्दीष्ट साध्य करा.
2. भावनिक होऊन गुंतवणूक करू नका -
स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना कधीही भावनिक होऊन गुंतवणूक करू नका, तुमच्या भावना दूरच ठेवा. एखाद्याला एखाद्या कंपनीत गुंतवणूक केल्यामुळेच गेल्या वेळी प्रचंड नफा मिळाला होता आणि म्हणूनच तसाच नफा त्याच कंपनीत गुंतवणूक केल्याने तुम्हालाही मिळेल असा विश्वास जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचं चुकतंय .. कारण, अशा पद्धतीने गुंतवणूक करणे नेहमीच घातक ठरू शकते, भावनिक गुंतवणूक नको तर प्रॅक्टीकल राहून निर्णय घ्यायला शिका.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
3. अशा चुका करू नका ज्या तुम्हाला परवडणार नाहीत -
गुंतवणूकदार म्हणून तुम्ही केलेल्या चुकांचा तुमच्या जीवनावर परिणाम होऊ शकतो, म्हणून कधीच अशा चुका करू नका ज्यांचा तुमच्या जीवनावर परिणाम होईल. तुम्ही केवळ मुद्दलाच्या गुंतवणुकीचीच रिस्क घेणं तुम्हाला परवडतं, त्यामुळे तेवढंच करा.
4. संधी ओळखा व त्यावर स्वार होऊन भविष्य रचा -
तुम्हाला संधी ओळखता आल्या पाहिजे. जर तुम्ही गुंतवणुक क्षेत्रात असाल तर तुम्हाला स्मार्ट गुंतवणूकदार होता आलं पाहिजे. तुमच्या समोर असलेल्या संधी हेरून त्यावर स्वार होता आलं पाहिजे. तंत्रज्ञान, विपणन आणि अशा अनेक क्षेत्रातल्या संधी ओळखता आल्या पाहिजेत.
5. उद्योगांत गुंतवणूक करा, कंपनीत नव्हे -
कोणत्याही उद्योगाची पूर्ण माहिती करून, त्यांच्या उद्योग करण्याच्या पद्धतीची, त्यांच्या सामाजिक प्रतिमेची व विश्वासार्हतेची खात्री करून मगच त्यात गुंतवणूक करायला हवी. अनेक गुंतवणूकदारांचं इथेच चुकतं. स्टॉक मार्केटमध्ये गुंतवणूक करताना ते केवळ कंपनीच्या नावाला भुलतात आणि कंपनीच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करून मोकळे होतात. असं करणं मग पुढे त्यांना महागात पडतं. म्हणूनच, कंपनीत नव्हे तर त्या त्या उद्योदधंद्यात, उद्योगव्यवसायात गुंतवणूक करा.. पूर्ण अभ्यास करून मगच गुंतवणूक करा, …..कारण, अभ्यास न करताच गुंतवणूक करणे नेहमीच घातक ठरू शकते, भावनिक गुंतवणूक नको तर प्रॅक्टीकल राहून निर्णय घ्यायला शिका.
चांगले शेअर्स कसे निवडावे हे शिकण्यासाठी येथे क्लिक करा - https://learn.netbhet.com/blog/How-to-choose-the-right-shares-for-investment-business-thursday
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com