There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
रॉबर्ट कियोसाकी यांचे रिच डॅड, पुअर डॅड हे एक अत्यंत गाजलेले पुस्तक. यामध्ये रॉबर्ट कियोसाकी यांनी स्वतःच्याच गोष्टी द्वारे पैसे कमावणे, वाढविणे, सांभाळणे आणि आर्थिकदृष्टया स्वतंत्र होण्याचे नियम सांगितले आहेत.
भरपूर शिकून नोकरी करणारे आणि तरीही पैशांची चणचण जाणवणारे रॉबर्ट चे वडील, आणि कमी शिकलेले मात्र योग्य गुंतवणूक करून श्रीमंत झालेले रॉबर्टच्या मित्राचे वडील ! या दोघांकडून रॉबर्ट काय शिकला ते या पुस्तकात सांगितले आहे.
प्रकाशित झाल्यानंतर आज कित्येक वर्षे झाली, तरी आजही हे पुस्तक विक्रीचे नवे नवे उच्चांक गाठत आहे. कित्येक लोकांचे आयुष्य या पुस्तकाने बदलून टाकले आहे. याच जगप्रसिद्ध आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या बेस्टसेलर पुस्तकाबद्दल आपण नेटभेट च्या या विशेष ऑनलाईन कोर्स मध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
👉 या कोर्स मध्ये काय शिकायला मिळेल.
✅ पैशाबद्दचे आपाल्या मनातील जुने समज आणि मानसिकता कशी बदलावी ?
✅ पैशांकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन आणि मानसिकता कशी असावी ?
✅ श्रीमंत होण्यासाठी नेमकं काय केलं पाहिजे, आपल्या कोणत्या सवयी बदलल्या पाहिजेत?
✅ आर्थिक व्यवस्थापन कसं केलं पाहिजे ?
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध