There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
वेळ ही खूप मौल्यवान गोष्ट आहे, आपल्या वेळेचे आणि कामाचे व्यवस्थापन करणे हे एक अत्यंत महत्वाचे कौशल्य आहे हे आपण जाणतोच पण तरीही आपण या व्यवस्थापनामध्ये कुठेतरी कमी पडत असतो.
आपल्या सगळ्यांनाच आपली कामं पूर्ण करण्यासाठी समान वेळ असतो. दिवस आणि रात्र मिळून 24 तासांच्या अवधीतच आपल्याला आपली कामं पूर्ण करायची असतात, काही काही माणसांना हे वेळेचं गणित इतकं उत्तम जमतं, की ते आपल्या कामांचा फडशा पाडण्यात यशस्वी होतात. ते इतके प्रॉडक्टीव्ह असतात की त्यांचं हे कसब पाहून अनेकांना त्यांच्याविषयी कुतूहल वाटू लागतं.
पण अनेकांना दिवसाचे चोवीस तासही कमीच पडतात आणि त्यांची कामं नेहमी अपूर्ण रहातात. तुम्हीही अशा लोकांपैकीच एक आहात का ?
तुम्हाला तुमच्या वेळेचा योग्य उपयोग करुन तुमची कामे पूर्ण करायची असतील तर ब्रायन ट्रेसी यांनी त्यांच्या एका पुस्तकात सांगितलेली एक टेक्निक नक्की वापरुन बघा. त्यांच्या पुस्तकाचं आणि त्या टेक्निकचं नाव आहे " ईट दॅट फ्रॉग !" ही टेक्निक काय आहे आणि ती आपण कशी वापरु शकतो हे आपण Netbhet BookSmart Series च्या या भागमध्ये पाहणार आहोत.
👉Date - 11 October 2021
👉Time - 7:30 PM
नेटभेट BookSmart सीरिजमध्ये,आम्ही विविध उपयुक्त विविध उपयुक्त बिझनेस, व्यक्तिमत्व विकास यावर आधारित पुस्तकांची रंजक सफर सोप्या मराठीतून आपल्यासमोर आणत आहोत. तेव्हा जरूर याचा फायदा घ्या !
भेटूया, पुढील Live Session मध्ये ! ऑनलाइन !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध