There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
अशी कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला पुढे जाण्यापासून रोखते आहे? बऱ्याच अंशी तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळतंय. तुम्ही तुमच्या क्षेत्रात चांगले काम करत आहात. पण असं तरीही काहीतरी आहे जे तुम्हाला त्यापुढच्या पायरीवर जाण्याचा मार्गात येत आहे. तो कदाचित तुमच्यातला एखादा छोटासा दोष असू शकतो किंवा एखादी लहानशी सवय. पण ते काय आहे आणि ते कसं ओळखायचं ?
याबद्दलच लेखक, मार्शल गोल्डस्मिथ यांचं "What Got You Here Won’t Get You There" हे पुस्तक आहे. अनेकदा यशस्वी लोकांना त्यांच्या करिअरमध्ये पुढील मोठी झेप घेण्यापासून त्यांच्याच काही छोट्या छोट्या सवयी रोखतात. या पुस्तकामध्ये लेखकाने त्या सवयी ओळखण्याचा आणि त्यांवर मात करण्यासाठी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरुन तुम्ही तुमच्या जीवनात जे काही करायचे आहे त्यामध्ये तुम्ही पुढची मोठी झेप घेऊ शकता.
या पुस्तकाचा कल जरी व्यवस्थापनाच्या दिशेने असला तरीही अशा अनेक गोष्टी आहेत ज्या तुम्ही काहीही करत असलात तरीही लागू करता येतील. याच पुस्तकाबद्दल आपण सविस्तर जाणून घेणार आहोत.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
स्वतःच्या व्यक्तिमत्वावर काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी
अपुर्या वेळेमुळे आपल्या वाचनाच्या छंदाला जोपासणे जमत नसलेल्या परंतु ज्ञानाची भूक असलेल्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध