There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
सोने ही भारतातील सर्वाधिक पसंतीची गुंतवणूक आहे. आपल्याकडे सोन्याला केवळ शुभ आणि मौल्यवानच मानले जात नाही तर एक सर्वांगीण गुंतवणूक म्हणून देखील मानले जाते. पूर्वीच्या काळी सोन्याची खरेदी फक्त एकाच स्वरूपात केली जात होती ती म्हणजे दागिने, सोन्याच्या विटा किंवा नाणी. पण अशा प्रकारच्या गुंतवणुकीमध्ये मेकिंग चार्जेस लागतात शिवाय सुरक्षिततेचा प्रश्न येतोच.
जसजसे आपले जग आधुनिक होत आहे तसतसे सोन्यामध्ये गुंतवणूकचे वेगवेगळे मार्ग समोर येत आहेत. आता सोन्यामध्ये दागिन्यांमधून गुंतवणूक करणे हा एकमेव मार्ग उरलेला नाही तर बाँड्स , Gold ETFs यामध्ये सुद्धा गुंतवणूक करता येते. परंतु अजूनही अनेक लोकांना सोन्यामधील गुंतवणुकीच्या या आधुनिक मार्गाबद्दल पुरेशी माहिती नाही.
म्हणूनच नेटभेटच्या या ऑनलाईन कोर्स मध्ये आपण सोन्यातील गुंतवणूक, त्यामधील गुंतवणुकीचे विविध पर्याय याबद्दल सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत.
👉 हा कोर्स कोणासाठी ?
वर्किंग प्रोफेशनल्स
विद्यार्थी
गृहीणी
आपल्या उत्पन्नाचे योग्य व्यवस्थापन आणि गुंतवणूकीचे विविध मार्ग जाणून घेण्याची इच्छा असणार्या प्रत्येकासाठी
धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध