There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
सतत प्रेरणा देणार्या, मनामध्ये आलेल्या निराशेला एका क्षणात झटकून टाकणार्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा आणि व्हीडीओंचा हा एक संच आहे. यामधील कोणतेही प्रकरण केव्हाही पाहून मनाला नविन उभारी द्या आणि पुन्हा मन मोडून आपल्या लक्ष्याच्या मागे लागा.
star star star star star_half | 4.7 (3 ratings) |
Instructor: Salil Chaudhary
Language: Marathi
Validity Period: Lifetime
नमस्कार मित्रहो,
आज नेटभेटचा "लक्ष्य...एक प्रेरणास्त्रोत" हा मोफत मराठी ऑनलाईन कोर्स आपल्यासमोर सादर करत असताना मला अतिशय आनंद होत आहे. कोर्स स्वरुपात जरी मांडला असला तरी रुढार्थाने हा एक कोर्स नाही आहे....सतत प्रेरणा देणार्या, मनामध्ये आलेल्या निराशेला एका क्षणात झटकून टाकणार्या अनेक छोट्या छोट्या गोष्टींचा आणि व्हीडीओंचा हा एक संच आहे.
यामधील कोणतेही प्रकरण केव्हाही पाहून मनाला नविन उभारी द्या आणि पुन्हा मन मोडून आपल्या लक्ष्याच्या मागे लागा.
प्रत्येक यशस्वी व्यक्तीमागे त्यांच्या निराशेच्या, वाईट काळामध्येही त्यांच्या मागे उभे राहणार्या, त्यांची उमेद वाढवणार्या अनेकांचा हात असतो. अशी माणसं अतिशय दुर्लभ असतात आणि ती अपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात असतातच असे नाही. माझ्या मते हा कोर्स तुमची "उमेद वाढवणारा आपला माणूस" आहे.
लक्ष्य...एक प्रेरणास्त्रोत" या कोर्सची मांडणी चार भागात केली आहे -
१. स्वयंप्रेरणा (Self Motivation)
२. सकारत्मक आयुष्याचे मंत्र (Leading a Positive Life)
३. यशस्वी लोकांच्या कथा (Success Stories)
४. यशस्वी होण्यासाठी वाचलीत पाहिजे अशी पुस्तके (Must read Motivational Books)
प्रसिद्ध लेखक झिग झिगलर यांचे एक वाक्य आहे. ते म्हणतात माणसाला जशी दररोज अंघोळीची गरज असते तशीच रोज नव्याने प्रेरणेची (मोटीव्हेशनची) गरज असते. मित्रांनो, ही गरज या कोर्समधून नक्कीच भागवली जाईल.
वेळोवेळी आम्ही आणखी नवे व्हीडीओ आणि प्रकरणे या कोर्समध्ये समाविष्ट करणार आहोत. त्याचा पुरेपुर फायदा घ्या !
काही प्रश्न अथवा अडचणी असल्यास आम्हाला 908 220 5254 / admin@netbhet.com येथे संपर्क करा.
यशस्वी भव !!
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करुया !!
By using Netbhet E-learning solutions LLP's services/products, you herewith agree to following terms and conditions and policies.
Terms & Conditions