There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
भावनिक बुद्धीमत्ता कशी वाढवायची ते शिकूया !
Instructor: Salil ChaudharyLanguage: Marathi
👉 हा कोर्स कशाबद्दल आहे ?
रामायणामध्ये लक्ष्मणाला राग आणि त्याने शूर्पणखेचं नाक आणि कान कापून टाकलं. रावणाला राग आला आणि त्याने सीतेचं अपहरण केलं. पण रामाला राग येण्याची कोणतीच उदाहरणं आपल्याला रामायणामध्ये दिसत नाहीत. रामाला शबरीने उष्ठी बोर दिली होती त्याजागी जर दुसरा कोणी राजा असता तर त्याला या कृतीचा प्रचंड राग आला असता पण रामाला राग आला नाही कारण त्याने ती कृती न बघता त्यामागची शबरीची भावना बघितली.
कृती न बघता त्या व्यक्तीची भावना बघणं, ती समजून घेणं आणि त्यानुसार ऍक्शन किंवा रिऍक्शन देणं यालाच म्हणतात Emotional Intelligence. आपल्या करिअर मध्ये एका लेव्हल पर्यंतच आपण आपल्या Technical ज्ञानावर पुढे जाऊ शकतो, त्यापुढील लेव्हल ला आपण functional Intelligence वर पुढे जाऊ शकतो पण त्यापुढे जर जायचं असेल तर Emotional Excellence हे एकमेव महत्वाचं हत्यार आहे. जेव्हा आपण सिनिअर मॅनेजर किंवा मोठ्या पदावर जातो तेव्हा आपल्याला माणसं सांभाळायची असतात, माणसं हाताळायची असतात आणि माणसं हाताळणं म्हणजे त्यांच्या भावना समजून घेणं त्यासोबत आपल्या भावनांवर नियंत्रण ठेवणं, त्या समोरच्या पुढे योग्य शब्दात मांडणं. हा कोर्स याबद्दलच आहे.
👉 या कोर्समध्ये आपण काय शिकणार आहोत?
Emotional Intelligence म्हणजे नेमकं काय?
Emotional Intelligence चे फायदे काय?
Emotional Intelligence आपल्या मध्ये Develop कसा करावा?
Emotional Intelligence आपल्या करिअर मधील प्रगतीसाठी कसा वापरावा?
👉 हा कोर्स कोणासाठी ?
- वर्किंग प्रोफेशनल्स
- विद्यार्थी
- स्टार्टअप्स आणि लघु/मध्यम उद्योजक (Entrepreneurs and Freelancers)
टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com
भरपूर अनुभवी आणि आपापल्या क्षेत्रातील तज्ञ प्रशिक्षक
अनेक कोर्सेस LIVE शिकता येतात तसेच त्यांचे रेकॉर्डिंगही उपलब्ध केले जाते.
डाउनलोड करता येईल असे डिजिटल प्रमाणपत्र काही कोर्ससोबत उपलब्ध