Drawing And Sketching
Contact us
Drawing And Sketching cover

Drawing And Sketching

Instructor: Bharat Parte

Language: Marathi

Validity Period: 365 days

₹1999 including 18% GST

👉 ही कार्यशाळा कशाबद्दल आहे?

तुम्हाला ड्रॉईंग आणि स्केचिंग ची आवड आहे का ? कदाचित तुम्ही स्केचिंग करण्यासा प्रयत्नही केला असेल, पण मार्गदर्शनाच्या अभावामुळे तितकसं निट जमलं नसेल ? कदाचित तुम्ही फार पूर्वी स्केच करत होतात आणि आता ते कौशल्य पुन्हा नव्यावे शिकायचे असेल ? किंवा, कदाचित तुम्ही व्हिज्युअल नोट्स कॅप्चर करण्याचा विचार करत आहात? जर तुमचे उत्तर "हो" असे असेल तर मग नेटभेट आयोजित "Drawing And Sketching Workshop" या खास २० दिवसीय कार्यशाळेमध्ये नक्की सहभागी व्हा !

चित्रकला क्षेत्रात काम करण्यासाठी स्केचिंग आणि ड्रॉईंग हे अत्यंत आवश्यक आणि मुलभूत कौशल्य आहे. या वीस दिवसांच्या कार्यशाळेमध्ये तुम्हाला बेसिक म्हणजेच अगदी स्केचिंग करताना पेन्सिल कशी पकडावी यापासून ते विविध प्रकारच्या अ‍ॅडव्हान्स टेक्निक्स पर्यंत स्केचिंग आणि ड्रॉईंग बद्दल शिकवलं जाणार आहे. तुम्ही चित्रकलाक्षेत्रातील कोणत्याही माध्यमामध्ये काम करत असाल इथे जे कौशल्य तुम्ही शिकणार आहात ते तुमच आर्ट आणि डीझाईन नक्कीच उत्तम रित्या सुधारेल.

👉 या कार्यशाळेत तुम्ही काय शिकाल ?

  • ड्रॉईंग आणि स्केचिंगसाठी पेन्सिल कशी धरावी.
  • शेडींगचे विविध घटक
  • संवादाचे साधन म्हणून स्केचिंग कसे वापरावे
  • कोणताही आकार कसा काढायचा.
  • आत्मविश्वासाने आणि सहजतेने विविध वस्तूचे स्केचिंग करणे (Object Sketching)
  • निसर्ग आणि निसर्गातील विविध गोष्टींचे स्केचिंग करणे ( Nature Sketching)
  • विविध प्रकारची मानवी स्केचिंग करणे ( Human Sketching)
  • आपल्या ड्रॉईंगमध्ये डीटेलिंग आणि टेक्श्चर च्या माध्येमातून जिवंतपणा कसा आणावा
  • बेसिक पासून अ‍ॅडव्हान्स पर्यंतच्या स्केचिंगच्या विविध टेक्निक्स
  • स्केचिंगचा सराव कसा करावा

👉 ही कार्यशाळ कोणासाठी?

  • तरुणांपासून प्रौढांपर्यंत ड्रॉईंग आणि स्केचिंग शिकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येकासाठी
  • चित्रकार - आपली चित्रकला अधिक खुलवण्याचा मार्ग म्हणजे ड्रॉईंग आणि स्केचिंग, त्यामुळे ही कार्यशाळा अशा प्रत्येक व्यक्तिसाठी आहे ज्याला चित्रकलेत रस आहे.
  • या क्षेत्रात करिअर करु इच्छिणारे विद्यार्थी
  • स्केचिंग आणि ग्राफिकली माहिती रेकॉर्ड करण्यात अधिक चांगले होऊ इच्छिणाऱ्या प्रत्येकासाठी हा कोर्स आहे.
  • असे लोक ज्यांनी यापूर्वी पेन्सिल उचलेली नाही परंतु ड्रॉईंग आणि स्केचिंग शिकण्याची इच्छा आहे.

 

टीम नेटभेट
नेटभेट ई-लर्निंग सोल्यूशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Reviews
Other Courses
Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy