स्वप्न पूर्ण होतात...त्याची गोष्ट !

एरिक युआन - झूम स्टार्टअपची प्रेरणादायी कथा !

स्वप्न पूर्ण होतात...त्याची गोष्ट !

1987 सालची गोष्ट. एरीक युआन नावाचा एक चिनी तरुण कॉलेजमध्ये असताना त्याच्या मैत्रिणीला भेटण्यासाठी दर आठवड्याला दहा तासांचा प्रवास करून जात असे. तेव्हा तो आपल्या मैत्रिणीला नेहमी म्हणत असे की एक असे जादुई यंत्र पाहिजे ज्यामध्ये एक बटण दाबल्यावर आपण एकमेकाला पाहू शकतो आणि गप्पा मारू शकतो.

धडा - टेक्नॉलॉजी माहीत असण्यापेक्षा तिचा वापर म्हणजेच अप्लिकेशन ओळखले पाहिजे

सन 1994. हाच तरुण पुढे जपान मध्ये काही काळ नोकरी करत असताना अमेरिकेतून आलेल्या एका सॉफ्टवेअर उद्योजकांचं भाषण ऐकायला जातो. तो उद्योजक म्हणजे तिशीतला बिल गेट्स. इंटरनेटच्या सुरुवातीच्या या काळात "इंटरनेटच्या क्षमता आणि भविष्य" या विषयावरील ते व्याख्यान ऐकून एरीक युआन भलताच प्रभावित होतो आणि अमेरिकेला जायचं ठरवतो.

धडा - विविध विषयांतील तज्ञांना ऎका/वाचा/बोला. एक तासाचे एक भाषण पूर्ण आयुष्य बदलू शकते

अमेरिकेत जाण्यासाठी त्याचे प्रयत्न सुरू होतात. इंग्रजीचं ज्ञान अगदीच बेतास बात असल्याने त्याचे व्हिसा अप्लिकेशन एकदा नाही, दोनदा नाही तर तब्बल 8 वेळा नामंजूर होते. शेवटी 1997 मध्ये नवव्या प्रयत्नात तो यशस्वी होतो आणि अमेरिकेत पोहोचतो.

धडा - जो प्रयत्न सोडत नाही तोच जिंकतो

अमेरिकेत तेव्हा सिलिकॉन वॅली मध्ये webex नावाच्या एका सॉफ्टवेअर स्टार्टअप मध्ये त्याला नोकरी मिळते. वेब कॉन्फरन्स क्षेत्रात काम करणाऱ्या या कंपनी मध्ये युआन चांगली प्रगती करतो. दहा वर्षांनंतर प्रसिद्ध Cisco ही कंपनी webex विकत घेते. याही कंपनी मध्ये अचाट प्रगती करत तो vice president पदापर्यंत पोहोचतो आणि गलेलठ्ठ पगार , सोयीसुविधा अनुभवतो.

धडा - मेहनत आणि प्रगतीचा ध्यास असेल तर यश मिळतेच !

इथे नोकरी करत असताना युआनला सतत वाटत होतं की आपले प्रॉडक्ट आणखी चांगले करता येईल. सिस्को मात्र हे प्रॉडक्ट चांगले चालत असल्याने त्यामध्ये फार डेव्हलपमेंट करत नव्हते. युआनच्या मते नवीन आलेल्या स्मार्टफोन, टॅबलेट डिव्हाईससाठी वेब कॉन्फरन्स प्रॉडक्ट नव्याने डिझाईन केले पाहिजे होते.

धडा - कंपनीवर नव्हे तर तुमच्या कामावर प्रेम करा. ग्राहकाला सर्वोत्तम देण्याकडे भर द्या

शेवटी स्वतःच असे नवीन प्रॉडक्ट विकसित करण्याचा त्याने निर्णय घेतला. 2011 मध्ये सिस्कोमधील मोठ्या पगाराची नोकरी सोडली. त्याच्या मते हा निर्णय फार कठीण नव्हता. कारण माणसाच्या जीवनाचे अंतिम उद्दिष्ट आनंदी राहणे हेच आहे, मला नोकरी मध्ये आनंद मिळत नव्हता म्हणून नोकरी सोडण्याचा निर्णय सोपा होता.

धडा - ज्यामध्ये आनंद मिळतो ते करणे हेच जीवनध्येय !

Cisco, skype, google सारख्या मोठ्या कंपन्या या क्षेत्रात होत्या म्हणून युआनच्या स्टार्टअप ला फंडिंग देण्यास venture capitals तयार होत नव्हते. मात्र सिस्को आणि पूर्वीच्या webex मधील काही मित्रांनी युआनच्या कंपनीत गुंतवणूक केली. 2013 मध्ये त्यांचे प्रॉडक्ट तयार झाले. मित्रानो युआनच्या या नव्या वेब कॉन्फरन्स प्रॉडक्टचे नाव होते "झूम" !
सध्या सगळीकडे लॉकडाऊन असताना ज्या उत्पादनाने पूर्ण जग कनेक्टेड ठेवले आहे ते "झूम" ! सध्या tiktok आणि व्हाट्सअप्प पेक्षाही जास्त डाउनलोड केले जाणारे अप्लिकेशन "झूम" (zoom.us)

धडा - आपल्या व्यवसायामध्ये मित्रमंडळीची सोबत फार महत्वाची आहे !

आता मागे वळून पाहताना पन्नास वर्षांच्या एरीक युआनला कळतंय की आपण 1987 साली जे स्वप्न पाहिलं होतं, ज्याला वेब कॉन्फरन्स म्हणतात हे देखील माहीत नव्हतं ते स्वप्नच zoom च्या रूपाने पूर्ण झाले आहे.

धडा - लोक ज्याला overnight success म्हणतात ती मिळवायला कोणीतरी आयुष्य खर्ची घातलेलं असतं !

आता तो आणखी एक स्वप्न बघतोय. ऑफिसमध्ये काम करणाऱ्या जगातील 100 करोड लोकांना जोडण्याचं ! आणि ते ही लवकरच पूर्ण होईल असं दिसतंय !

मित्रानो, या लेखाच्या प्रत्येक परिच्छेदात एक धडा आहे. यापेक्षाही आणखी काही गोष्टी यातून शिकण्यासारख्या नक्कीच आहेत. Zoom च्या या कथेतून तुम्हाला काय शिकायला मिळाले ते खाली कमेंट मध्ये अवश्य लिहा !

धन्यवाद,
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
www.netbhet.com

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions 2023 Privacy policy Terms of use Contact us Refund policy