जगभरातील या लॉकडाउनमुळे सर्वांचेच प्रचंड नुकसान होत असताना एका कंपनीला मात्र खुप फायदा झाला ते म्हणजे ZOOM या ऑनलाईन वेबिनार, मीटींग सेवा पुरविणार्या कंपनीला. नावाप्रमाणेच या कंपनीचा बिझनेस "झूम" झाला :-)
मंदीतली ही संधी पाहून फेसबुकला राहवले नाही आणि त्यांनी झूमला टक्कर देणारे एक डेस्कटॉप अप्लिकेशन २ एप्रिल ला सुरु केले. (फेसबुकची ही जुनीच सवय आहे म्हणा, एखादे अॅप/प्रॉडक्ट चांगले चालत असताना दिसले की लगेचच त्यांचे फीचर्स कॉपी करुन स्वतःचे अॅप बाजारात आणायचे !)
फेसबुकची इतर सर्व उत्पादने चांगली चालली असताना "फेसबुक मेसेंजर" काही केल्या तेवढ्या जोमाने चालत नाही आहे. म्हणावा तसा फेसबुक मेसेंजरचा वापर वाढत नाही. हे अॅप चालावे म्हणून फेसबुकने हरतर्हेचे प्रयत्न करुन पाहिले. आणि त्याच प्रयत्नचा पुढचा भाग म्हणून फेसबुकने ZOOM चे फीचर्स असलेले "मेसेंजर डेस्कटॉप अप्लिकेशन" आणले आहे.
या लिंकवर क्लिक करुन फेसबुकच्या या नव्या "झूम किलर"ची माहिती मिळविता येईल. -
बाजारामध्ये संधी कमी होत नसतात तर जुन्या संधींची जागा नवी संधी घेत असते. हा नियम येणार्या काळात आपल्यासाठीही अनेक संधी असणार आहेत याची ग्वाही देतो आहे. फक्त वेळप्रसंगी आहे ते सोडून, नविन मार्गक्रमण करण्याची तयारी आणि दृष्टीकोन असला पाहिजे !
It Is Not the Strongest of the Species that Survives But the Most Adaptable
==================================
लॉकडाउनचा पुरेपुर फायदा घ्या, मराठीमधून मोफत डिजिटल मार्केटिंग शिका ! अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा - http://bit.ly/NetbhetDMM