There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
या जगामध्ये दोन प्रकारचे लोक असतात. मला जगाकडून काय मिळतंय ? (मागणारे) आणि मी जगाला काय देऊ शकतो ? (देणारे) असा विचार करणारे !
मागणे हे नैसर्गिकतःच आपल्यामध्ये असते. मागण्यासाठी काहीच कष्ट लागत नाहीत आणि ते देण्यापेक्षा नक्कीच सोपे असते.
मात्र "मी जगाला काय देऊ शकतो?" याचे उत्तर शोधणारे कमी असतात. कारण "देणे" सोपे नसते. देण्यासाठी वेळ, उर्जा, संपत्ती खर्च करावी लागते.
परंतु केवळ स्वतःचाच विचार करणार्या माणसांना ही गोष्ट लक्षातच येत नाही जे लोक जगाला काही देण्याचा प्रयत्न करतात तेच अधिकाधिक मौल्यवान होत जातात.
सतत काही न काही मागणी करणार्या लोकांना आपण टाळतो. कोणालाही त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडत नाही. पण तरीही जग अशा लोकांनी भरलेले आहे.
याउलट "देणार्या" लोकांशी मैत्री, जवळीक करायला सर्वांनाच आवडतं. आणि त्यांच्याकडून मिळालेलं ज्ञान, प्रेम , सौख्य आपणही इतरांमध्ये आनंदाने वाटतो. गाय दुध, शेण, गोमुत्र देते तसेच फळं, लाकूड, प्राणवायू देतात म्हणून झाडं अत्यंत महत्त्वाची असतात. जेवढं गवत खाते त्यापेक्षा कित्येक पटीने गाय परत देते, जेवढी खतं लागतात त्यापेक्षा कित्येक पटीने वृक्ष मानवाला परत देतात.
मित्रांनो, यालाच इंग्रजी मध्ये "Value" हा शब्द आहे. नोकरी असो, व्यवसाय असो अथवा जीवनातील कोणतीही बाब असो, जेवढी जास्त "वॅल्यु" आपण इतरांना देणार तेवढा मोबदला आपल्याला मिळणार, प्रेम आणि आदर वाढत जाणार.
यश हे आपण किती "वॅल्यु" जगाला देतो या एकाच गोष्टीवर अवलंबून असतं !
- नोकरीत आपण किती काम करतोय, यापेक्षा आपण केलेलं काम कंपनीला किती उपयोगाचं ठरतंय ते महत्त्वाचं !
- बिझनेसमध्ये आपण ग्राहकाला जे उत्पादन विकतोय, ते आकारलेल्या किंमतीपेक्षा ग्राहकाला किती जास्त फायदेशीर ठरतं ते महत्त्वाचं !
माझ्या ऑफीसमध्ये एक पिऊन होता. ऑफेसमधली बारीक सारिक कामं करायचा. शिक्षण बिलकुल नव्हतं पण स्वतःहून कंप्युटर चालवायला , डेटा एंट्री करायला शिकला. स्वतःहून इतरांना मदत करु लागला. काही दिवसांनंतर कंत्राटी लोकांना सामावून घेण्यासाठी जागा निघाल्या तेव्हा तो बॅक ऑफीस जॉबसाठी तयार होता. कोणाकडे वशिला लावला नाही, की कोणाकडे दया मागितली नाही. स्वतःची "वॅल्यु" वाढविली आणि "वॅल्युएबल" बनला.
उगाचंच मी खुप काम करतो म्हणून माझा पगार वाढला पाहिजे असा आक्रोश करण्यात काहीच फायदा नसतो. तुम्हाला जे हवंय ते जग तुम्हाला देत नसून, तुम्ही किती वॅल्यु देता त्यावर अवलंबून असतं.
आणखी एक गोष्ट ! काही लोक देतात पण मोजून मापून ! दिलं की लगेच किती आणि कधी परत मिळणार याची गणितं सुरु होतात. याला "देणे" म्हणत नाही हा व्यवहार झाला.
या वॅल्यु मधूनच "वॅल्युएबल" (Valueable) हा शब्द तयार झाला आहे हे विसरू नका ! Valueable म्हणजे मौल्यवान बनायचं असेल तर "द्यायला" शिका !
यशाच्या मागे न धावता, आपली किंमत वाढवायला , स्वतःला मौल्यवान करण्यासाठी वेळ, उर्जा आणि पैसा खर्च करा ! मग बघा यश कसं पायघड्या घालंत येतं ते !
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com