गरुड सापाला जमिनीवर मारत नाही, तो सापाला घेऊन उंच आकाशात जातो. कारण साप हवेत असताना काहीच हालचाल करू शकत नाही. सारपटण्या साठी जमीन नसल्यामुळे साप निशस्त्र होतो.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
येथे क्लिक करा.
================
कोळी आपल्या शिकारी साठी जाळं विणतो आणि त्यात शिकार येण्यासाठी कित्येक तास वाट पाहतो. शिकार सापडल्यानंतर सुद्धा कोळी लगेच शिकार खाऊ शकत नाही... तर अन्नाविना शिकार गतप्राण होईपर्यंत वाट पाहतो.
जंगली कुत्रे शिकार हेरून तो दमेपर्यंत त्या प्राण्याचा पाठलाग करतात. ते स्वतः मात्र कळपाने धावत असल्याने आळीपाळीने पुढे जातात त्यामुळे थकत नाहीत.
वाघ लपूनछपून शिकारीच्या जवळ जातो आणि शिकार बेसावध असताना मागून झडप घालतो.
मित्रांनो, निसर्गातील प्रत्येक प्राण्याने आपापली स्ट्रॅटेजी तयार केली आहे. आणि ही स्ट्रॅटेजी वापरत असताना प्रत्येक प्रजाती स्वतःच्या शरीररचनेत बदल करत गेली आहे.
संकटांना सामोरे जाण्याची, आयुष्यातील युद्ध जिंकण्याची तुमची स्ट्रॅटेजी काय आहे? विना धोरण सर्व अवहनांना सामोरे जाणे हे बहुतेकांच्या अपयशाचे खरे कारण असते.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
येथे क्लिक करा.
================
धोरण (strategy) ठरवणे आणि त्यानुसार आवश्यक ते बदल करणे (अनुकूलन) हे यशाचे सूत्र लक्षात ठेवा. बिझनेस असो वा खाजगी आयुष्य सगळीकडे योग्य धोरण आखून मार्गक्रमण केले तर जिंकता येते !!
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !