आयुष्याचं खऱ्या अर्थानं मॅराथॉन काय असतं? 'काइहो ग्यो' उत्तर देतं!

जपानच्या क्योटो शहराच्या ईशान्य दिशेला असलेल्या माऊंट हिएई या पर्वतावर हजारो भिक्षूंची निनावी स्मारके आहेत. ही स्मारके अशा "तेंदाई बौद्ध" भिक्षूंचे अवशेष आहेत जे "कैहोग्यो" नावाचे आव्हान पूर्ण करू शकले नाहीत. हे आव्हान इतके कठीण आहे की अनेक भिक्षू त्यात प्राण गमावतात.
पण हे कैहोग्यो नेमके काय आहे? आणि आपण त्यातून काय शिकू शकतो?
तेंदाई बौद्ध धर्माच्या भिक्षूंचा असा विश्वास आहे की ज्ञानप्राप्ती मिळू शकते पण केवळ अत्यंत कठीण कष्ट आणि टोकाच्या त्यागामुळे. त्यांच्या मते, आत्मत्यागाचे सर्वोच्च रूप म्हणजे "कैहोग्यो" नावाचे आव्हान. या आव्हानामुळे तेंदाई भिक्षूंना "मॅरेथॉन मंक्स" म्हणून ओळखले जाते.
कैहोग्यो: हजार दिवसांचे आव्हान
कैहोग्यो हे एक हजार दिवसांचे आव्हान आहे जे सात वर्षांत पूर्ण करावे लागते. जर एखाद्या भिक्षूने हे आव्हान स्वीकारले तर त्याला पुढील गोष्टी करावी लागतात:

- पहिले वर्ष: भिक्षूने दिवसाला 30 किमी सलग 100 दिवस धावायचे.
- दुसरे वर्ष: पुन्हा दिवसाला 30 किमी सलग 100 दिवस धावायचे.
- तिसरे वर्ष: आणखी एकदा दिवसाला 30 किमी सलग 100 दिवस धावायचे.
- चौथे वर्ष: दिवसाला 30 किमी, पण यावेळी 200 दिवस सलग धावायचे.
- पाचवे वर्ष: पुन्हा दिवसाला 30 किमी 200 दिवस धावायचे. पाचव्या वर्षाच्या शेवटी भिक्षूने सलग 9 दिवस अन्न, पाणी किंवा झोपेशिवाय राहायचे. त्याला झोप येऊ नये म्हणून दोन भिक्षू त्याच्याजवळ सतत उभे राहतात.
- सहावे वर्ष: दिवसाला 60 किमी सलग 100 दिवस धावायचे.
- सातवे वर्ष: दिवसाला 84 किमी सलग 100 दिवस धावायचे. त्यानंतर शेवटचे 100 दिवस दिवसाला 30 किमी धावायचे.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================
या प्रत्येक धावेमध्ये भिक्षूला केवळ एकदाच खाली बसून विश्रांती घ्यायची परवानगी असते.
या आव्हानाची सर्वात महत्वाची पायरी म्हणजे 101 वा दिवस. पहिले 100 दिवस भिक्षूला कैहोग्यो सोडण्याची परवानगी असते. पण 101व्या दिवसानंतर माघार घेण्याचा पर्याय नसतो. त्याला एकतर कैहोग्यो पूर्ण करावे लागते किंवा आपला जीव घ्यावा लागतो.
यासाठी भिक्षू आपल्या प्रवासात नेहमी एक दोरी आणि एक छोटी तलवार बाळगतात. गेल्या 400 वर्षांत केवळ 46 व्यक्तींनी हे आव्हान पूर्ण केले आहे. इतर अनेक माऊंट हिएईच्या टेकड्यांवर मृत्यू स्वीकारतात !
शारीरिक आणि मानसिक कणखरतेचा अत्युच्च बिंदू असलेल्या या तपस्येतून आपण काय शिकू शकतो?
▪️1. Power Of Commitment (वचनबद्धतेची शक्ती)
मॅरेथॉन मंक्स "करो या मरो" हे तत्व शब्दाशी : अमलात आणतात. कैहोग्यो आपल्याला वचनबद्धतेचे महत्त्व शिकवते. जेव्हा आपण एखाद्या गोष्टीसाठी इतके वचनबद्ध होतो की मृत्यू हाच एकमेव पर्याय उरतो तेव्हा आपली क्षमता अमर्याद वाढते. आपल्या दैनंदिन जीवनात मोठे ध्येय ठेवून त्यांच्यासाठी पूर्ण वचनबद्ध राहिल्यास आपणही आश्चर्यकारक परिणाम साधू शकतो.


▪️2. ध्येय दूरवरची आणि कृती दररोजची
कैहोग्यो एकाच दिवसात पूर्ण होत नाही. ही सात वर्षांची यात्रा आहे. आपल्या जीवनातील मोठी उद्दिष्टे देखील अशीच असतात. दिवसेंदिवस छोटी छोटी पावले टाकली तरच मोठी उद्दिष्टे साध्य होतात. धैर्य आणि सातत्य हेच यशाचे मुख्य घटक आहेत.
▪️3. सीमांना आव्हान देणे
कैहोग्यो आपल्याला शिकवते की आपल्या मनात ठरवलेल्या सीमा बहुतेकदा खोट्या असतात. जेव्हा आपण स्वतःला खरोखर आव्हान देतो, तेव्हा आपली खरी क्षमता समोर येते. दिवसाला 84 किमी धावणे अशक्य वाटते, पण काही लोकांनी हे केले आहे.
▪️4. उद्देश्याचे महत्त्व
भिक्षूंना ज्ञान प्राप्तीचे उद्देश्य आहे. आपल्या जीवनातील कोणत्याही मोठ्या आव्हानाला तोंड देण्यासाठी स्पष्ट उद्देश्य हवे. जेव्हा आपले "का" स्पष्ट असते, तेव्हा "कसे" चे उत्तर आपोआप मिळते.
आपणा सगळ्यांना भिक्षू व्हावे लागणार नाही आणि एवढी तपश्चर्या देखील करावी लागणार नाही, पण कैहोग्यो च्या तत्त्वांचा उपयोग आपल्या जीवनात नक्कीच करू शकतो:

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================
कैहोग्यो हे केवळ एक शारीरिक आव्हान नाही, तर जीवनाबद्दलचा एक दृष्टिकोन आहे. हे आपल्याला शिकवते की मानवी क्षमता अमर्याद आहे, पण त्यासाठी पूर्ण वचनबद्धता, धैर्य, आणि सातत्य आवश्यक आहे.
आपल्या आयुष्यात आपले स्वतःचे कैहोग्यो शोधा. ते लहान असू शकते, पण तुमच्यासाठी अर्थपूर्ण असू द्या. आणि मग त्यासाठी पूर्ण वचनबद्ध रहा. कदाचित आपण आपल्या जीवनातील माऊंट हिएई जिंकू शकू.
जीवन ही एक मॅरेथॉन आहे, स्प्रिंट नाही. धीर धरा, सातत्याने चला, आणि आपल्या ध्येयाकडे निर्भयपणे वाटचाल करा. मॅरेथॉन मंक्स कडून हेच यशाचे रहस्य शिकता येईल.

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !