एक दर्जेदार आयुष्य जगण्याची इच्छा आहे का?

तर या काही अशा गोष्टी ज्या मी आजपर्यंतच्या माझ्या जीवनप्रवसात शिकलो आहे.

१. तुमच्या मनाला दररोज प्रेरणादायी विचार देणारे लेख, व्हीडीओ यांचे खाद्य द्या. कारण हेच विचार यशाचा वणवा भडकवण्यासाठी निखार्‍यांचं काम करतात.

२. नकारात्मक विचार करणार्‍या लोकांपासून दूर रहा. खुप वेळा हे लोक तुमचे मित्रमंडळी किंवा नातेसंबंधी असू शकतात ज्यांना प्रत्येक गोष्टीमध्ये नकारात्मकता शोधण्याची सवय असते, असे लोक तुम्ही एखादी गोष्ट कशी करु शकत नाही याचच बीज तुमच्यात पेरत असतात. अशा लोकांपासून शिष्टतापूर्वक दूर राहीलेलंच बर.

३. आपल्या कमाईतील १०% भागाची बचत करा.

४. आपल्या कमाईतील १०% भाग गरजू माणसांच्या मदतीसाठी दान करा.

५. दूसर्‍याला समृध्द करुन आपण आपल्या श्रीमंतीचा दरवाजा उघडू शकतो. रोज एका स्वच्छ कागदावर अशा २० कल्पना लिहून काढा ज्यामुळे आपण इतरांची मदत करु शकतो. महीनाभर हीच कृती न विसरता दररोज करा आणि महीन्याच्या शेवटच्या दिवशी आपल्या मध्ये अशा किती कल्पना दडल्या होत्या हे पाहून आश्चर्य वाटेल.

६. दिवसातील १० मिनीटे कृतज्ञता व्यक्त करणारे जर्नल लिहण्यात घालवा. १० अशा गोष्टींची यादी बनवा ज्यामुळे तुम्ही त्यांच्याप्रती आभारी आहात मग ती एखादी गोष्ट ,व्यक्ती, वस्तू किंवा अगदी घटना सुध्दा असू शकते. हे करण्यात एक प्रकारची जादू आहे. तुम्ही जेवढे आभार व्यक्त कराल तितके जास्त आभार व्यक्त करणारे क्षण तुमच्याकडे एखाद्या चुंबकाप्रमाणे आकर्शित होतील.

७. उठा. बाहेर जा. व्यायाम करा. निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घ्या. निर्माण करणार्‍याने हा निसर्गाचा मास्टरपीस कसा तयार केला आहे त्यातील छोट्या छोट्या गोष्टींकडे आपले लक्ष केंद्रित करा. निसर्गाकडे पाहण्याचा तुमचा हा दृष्टिकोन तुम्हाला खुप काही देऊन जाईल. तुम्ही जेव्हा निर्गाकडे एक निर्मिती म्हणून बघाल तेव्हा तुम्हाल खुप नवीन कल्पना सापडतील.

८. अध्यात्माकडे वळा. तुम्ही आयुष्यात किती पैसा आणि प्रसिध्दी मिळवली आहे हे महत्त्वाचे नसते तर प्रचंड पैसा आणि प्रसिध्दी मिळवल्यानंतर सुध्दा तुम्ही कशा प्रकारे तुमची मुळे धरुन आहात हे महत्वाचे असते. तुमच्या आत्म्याचा प्रवास आणि जीवनाचे पैसा आणि प्रसिध्दी पलिकडील मोठे चित्र समजून घ्या.

९. धोका पत्करा. धोका पत्करणे म्हणजे यशाचा पाठलाग करणे. रोज थोडे थोडे तुमच्या ध्येयाच्या जवळ जाण्यासाठी रोज नवीन गोष्टी शिकत रहा आणि मोजूनमापून धोका पत्करा.

स्तब्ध राहू नका कृती करा.
तुमच्या यशस्वी वाटचालीसाठी खुप शुभेच्छा. हा लेख तुम्हाला नवीव उर्जा देणारा ठरेल हीच आशा..

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================

धन्यवाद,

टीम नेटभेट
*नेटभेट ई -लर्निंग सोल्युशन्स*
मातृभाषेतुन शिकूया , प्रगती करूया !
www.netbhet.com
Learn.netbhet.com