There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
काही कारणास्तव माझं chatgpt अकाउंट अर्ध्या दिवसासाठी बंद झालं होतं. मलाच विश्वास बसत नाही पण माझं पूर्ण काम थांबलं होतं. मी जे काम हातात घेतलं होतं ते chatgpt शिवाय होत नाही म्हणून ते बाजूला ठेवून दुसरं काम सुरु केलं. ते पण chatgpt पाशी येऊन अडकलं. तिसरं सुरु केलं त्यातही तेच झालं !
केवळ दोन वर्षांपूर्वी मी chatgpt शिवाय काम करत होतो यावर आता विश्वासच बसत नाही. अर्थात grok, claude वापरून काही कामं मार्गी लावली. पण chatgpt मध्ये अनेक प्रोजेक्ट्स आधीच बनवून ठेवल्याने मी अडकून पडलो.
AI टूल्स एवढ्या लवकर माझ्या कामाचा आमूलाग्र भाग झाले. मी AI वापरून मी हुशार झालो की आळशी आणि मंद झालो याचा विचार करतोय !
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.
================
दुसरी घटना चीन मधली -
जूनच्या सुरुवातीला चीनमध्ये १.३ कोटींपेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी 'गाओकाओ' नावाची परीक्षा दिली – ही त्यांच्या देशातील सर्वात महत्त्वाची आणि स्पर्धात्मक कॉलेज प्रवेश परीक्षा आहे. या परीक्षेच्या चार दिवसांत संपूर्ण देशात AI बंद केलं गेलं होतं !
होय! Doubao (ByteDance), Qwen (Alibaba), Yuanbao (Tencent), आणि Kimi (DeepSeek/Moonshot) या देशातील प्रमुख AI टूल्सनी आपली इमेज रेकग्निशन आणि real-time Q&A सारखी फिचर्स थेट बंद केली.
हे फक्त काही शाळा किंवा कॉलेजेसपुरता नव्हतं. ही राष्ट्रीय पातळीवरील बंदी होती. मुलांनी तयार उत्तरे न मिळवता स्वतःहून उत्तरे शोधून प्रयत्नपूर्वक अभ्यास करावा हा यामागचा उद्देश होता.
या दोन्ही घटना वेगळ्या असल्या तरी त्यामागचा धागा समान आहे. AI आपल्याला अधिक हुशार बनवतोय की आळशी ?
एक संशोधन अमेरिकेतील Boston Consulting Group मध्ये करण्यात आलं. ही संस्था जगातील टॉप मॅनेजमेंट कन्सल्टिंग कंपन्यांपैकी एक. शेकडो कोटींचे व्यवहार करणारी आणि अत्यंत अनुभवी प्रोफेशनल्सनी भरलेली.या संशोधनात दोन गट बनवण्यात आले – पहिल्या गटाला काही व्यावसायिक challenges देण्यात आले आणि सांगितलं गेलं – “ChatGPT वापरायचं नाही.” दुसऱ्या गटाला तोच टास्क देण्यात आला, पण ChatGPT वापरण्याची मुभा होती.
ChatGPT न वापरणाऱ्या गटाने ८४% अचूक काम केलं (ग्राहकांच्या मतानुसार) आणि ChatGPT वापरणाऱ्या गटाने फक्त ७२%.
का? कारण जे AI वापरत होते, ते आपला स्वतःचा मेंदू वापरणं कमी करू लागले. विचार थांबला. त्यांच्या निर्णयक्षमतेवर त्याचा परिणाम झाला.
या सगळ्या गोष्टींचा विचार करताना एक प्रश्न सतत मनात घोळतोय — AI आपल्या कामाचा भाग होणं ही प्रगती आहे की अधोगती?
ChatGPT, Claude, Grok ही सगळी टूल्स आपल्याला वेग देतात, मदत करतात, कामं सोपी करतात – यात शंका नाही. पण त्या वेगात आपण आपला विचार करण्याचा वेग हरवत तर नाही ना? आपलं स्वतःचं मेंदू वापरणं कमी तर होत नाही ना?
चीनने परीक्षेदरम्यान AI बंद करून एक गोष्ट दाखवून दिली – विद्यार्थ्यांनी उत्तरं शोधली पाहिजेत, तयार उत्तरं नाही. आणि मी – एक प्रोफेशनल – माझं ChatGPT बंद झालं म्हणून थांबलो…
AI वापरणं चूक नाही – पण ते "विचार टाळण्यासाठी" नव्हे, तर "विचार वाढवण्यासाठी" वापरायला हवं.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.
================
🔸 AI आपल्याला दिशा दाखवू शकतं – पण चालायचं आपल्यालाच आहे. 🔸 AI उत्तरं देतं – पण "प्रश्न विचारणं" ही कला आपलीच असली पाहिजे.
🔸 AI काम सोपं करतं – पण निर्णय आपल्यालाच घ्यायचे आहेत.
तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण “जास्त” काम करू शकतो, पण “उत्तम” काम आपल्याच अंतःप्रेरणेने आणि विचारशक्तीने होतं.
AI ही तलवार आहे – वापरणाऱ्याच्या हातात आहे ती कोणासाठी आणि कशी वापरायची. तिचा वापर आपण आपली धार वाढवण्यासाठी करतोय की आपल्या मेंदूला झाकण्यासाठी?
आपण शाळा, कॉलेज, कार्यालयं, संस्था – सर्वत्र ही विचार करण्याची वृत्ती अबाधित ठेवणार आहोत का? की AI आपल्याला “सोयस्कर आळस” शिकवेल?
शिकणं संपलं तर विचारही संपतो. आणि जे विचार करत नाहीत, ते नंतर कोणत्याही तंत्रज्ञानाचे गुलाम होतात.
तुमचं मत काय? तुम्ही कोणत्या गटात असाल?
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
✍️ सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स