लग्नाचा सीझन आला आहे, आणि दसरा-दिवाळी सारखे मोठे उत्सवही आलेले आहेत. नोव्हेंबर ते डिसेंबर 2024 मध्ये भारतात तब्बल 48 लाख लग्न होणार आहेत आणि त्यावर ₹6 लाख कोटी खर्च होण्याची शक्यता आहे. Confederation of All India Traders (CAIT) ने सांगितले की या वेळी मागील वर्षाच्या तुलनेत ₹1.5 लाख कोटी जास्त खर्च होईल. त्यामुळे वेगवेगळ्या सेक्टरमध्ये ही उत्सवांची वेळ एक मोठं आर्थिक संधी आणत आहे. म्हणून या लग्नाच्या सीझनमध्ये फायद्यात राहतील असे टॉप 10 Stocks बघूया.
1. Titan Company Ltd.
लग्न म्हटलं की Titan कंपनीचा विचार होतोच. त्यांच्या Tanishq, Zoya, Mia आणि CaratLane ब्रँड्समुळे त्यांची जवळपास 90% कमाई ज्वेलरीतून होते. याशिवाय त्यांचं Taneira नावाचं क्लोदिंग ब्रँडही आहे ज्यात साडी आणि इतर इथनिक वेअर आहे. सोन्याला शुभ मानलं जातं, त्यामुळे लग्नात Titan च्या प्रोडक्ट्सची डिमांड वाढते. टायटनने देशभरात आपल्या स्टोअर्सचा विस्तार केला असून, प्रीमियम ब्रँड्समुळे ते ग्राहकांच्या मनात खास स्थान मिळवत आहेत. त्यांच्या नवीन लाँचेसमुळे कंपनीला अतिरिक्त लाभ मिळण्याची शक्यता आहे.
============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live
93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा - https://salil.pro/MBA
============================
2. Vedant Fashions
Vedant Fashions ह्या कंपनीचे Manyavar आणि Mohey सारखे ब्रँड्स wedding wear मध्ये अग्रेसर आहेत. ही कंपनी पुरुष आणि महिला दोघांसाठीही celebration wear पुरवते. कंपनीची 662 हून अधिक स्टोअर्स आहेत, त्यामुळे त्यांचा मार्केटमध्ये चांगला जम बसलेला आहे. Vedant Fashions ची उत्पादने विविध प्रकारच्या कस्टमरला आकर्षित करतात, ज्यामुळे त्यांच्या सेलिब्रेशन वेअर सेगमेंटमध्ये उल्लेखनीय वाढ झाली आहे. त्यांचं स्टोअर विस्ताराचं उद्दिष्ट त्यांना अधिक बाजारपेठ मिळवून देईल.
3. Raymond Ltd.
Raymond ही कंपनी सूट आणि शर्ट्ससाठी प्रसिद्ध आहे, विशेषतः लग्नाच्या वेळेस. 1,581 स्टोअर्समधून त्यांची उत्पादनं मिळतात आणि त्यांचा बाजारपेठेतील शेअर मजबूत आहे. मागील काही वर्षांत कंपनीच्या नफ्यातही वाढ झाली आहे. त्यांचे उच्च-गुणवत्तेचे सूट्स आणि शर्ट्स ग्राहकांच्या पसंतीस उतरत आहेत. Raymond आपल्या उत्पादनांचे एक्स्पोर्ट वाढविण्याच्या तयारीत असून, त्यामुळे कंपनीला जागतिक बाजारात अधिक संधी मिळू शकते.
4. Indian Hotels Company Ltd.
मोठ्या लग्न समारंभांसाठी हॉटेल्स हे एक पॉप्युलर चॉईस बनले आहे, आणि Indian Hotels Company चा Taj, Vivanta, Ginger आणि SeleQtions सारखे ब्रँड्स त्यात आघाडीवर आहेत. अशा प्रकारे लग्नासाठी हॉटेल्सची डिमांड वाढली आहे आणि त्यामुळे ह्या कंपनीच्या नफ्यातही वाढ होण्याची शक्यता आहे. लग्नाच्या बुकिंगसाठी त्यांच्या लक्झरी हॉटेल्सना विशेष मागणी असते, ज्यामुळे त्यांच्या रेव्हेन्यूमध्ये मोठा वाटा मिळतो.
5. Kalyan Jewellers
Kalyan Jewellers हे एक जुने आणि प्रतिष्ठित नाव आहे ज्याचे Nimah, Ziah आणि Tejasvi सारखे ब्रँड्स आहेत. भारतात त्यांची 214 स्टोअर्स आहेत आणि ते 5 देशांमध्येही आहेत. गोल्डला शुभ मानले जाते, त्यामुळे लग्नाच्या सीझनमध्ये त्यांच्या विक्रीत मोठ्या प्रमाणात वाढ होईल. त्यांची 'My Kalyan' या कस्टमर आउटरीच इनिशिएटिव्हमुळे ग्राहकांशी घट्ट संबंध तयार झाले आहेत. कंपनी नव्या ठिकाणी स्टोअर उघडून आपल्या ब्रँडची पोहोच वाढवत आहे. (नुकत्याच मार्केट मध्ये लिस्ट झालेल्या PNG या मराठमोळ्या कंपनीलाही लग्नाच्या मागणीचा फायदा होईलच !)
6. Dixon Technologies
Dixon Technologies इलेक्ट्रॉनिक्स मॅन्युफॅक्चरिंगमध्ये मोठं नाव आहे आणि TV, वॉशिंग मशीन, आणि स्मार्टफोन्स सारखी गिफ्टिंग आयटम्स बनवल्या जातात. ह्या wedding gifts ची डिमांड या सीझनमध्ये वाढते, त्यामुळे Dixon ला यातून फायदा होण्याची शक्यता आहे. Dixon आपल्या मॅन्युफॅक्चरिंग क्षमतेचा विस्तार करत आहे, ज्यामुळे त्यांच्या व्यवसायाची पोहोच आणखी वाढेल. ग्राहकांसाठी किफायतशीर इलेक्ट्रॉनिक्स उपकरणं पुरवण्यामुळे त्यांची लोकप्रियता वाढत आहे.
============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live
93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा - https://salil.pro/MBA
============================
7. Voltas Ltd.
Voltas ही Tata Group ची कंपनी आहे आणि भारतात AC च्या मार्केटमध्ये लीडर आहे. लग्न आणि फेस्टिव्ह सीझनमध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तूंची विक्री वाढते, त्यामुळे Voltas सारख्या कंपन्यांना फायदा होतो. Voltas आपल्या नेटवर्कचा विस्तार करण्याचं काम करत आहे. कंपनी आपल्या रिटेल नेटवर्कसाठी नवी उत्पादने आणत असून ग्राहकांना विविध प्रकारचे पर्याय उपलब्ध करून देत आहे.
8. TVS Motor Company
ग्रामीण भागात लग्नाच्या वेळेस दुचाकी ही एक पॉप्युलर गिफ्ट असते. TVS Motor ही कंपनी आपल्या विविध दुचाकींसाठी ओळखली जाते आणि ह्या सीझनमध्ये त्यांची विक्री वाढेल अशी अपेक्षा आहे. याशिवाय, कंपनी आपली EV उत्पादन क्षमता वाढवते आहे. कंपनी आपल्या ग्राहकांसाठी नवीन इलेक्ट्रिक बाइक्स आणत आहे, जे लग्नाच्या गिफ्टिंगमध्ये महत्त्वाची भूमिका निभावू शकतात.
9. Arvind Fashions
Arvind Fashions हे Calvin Klein, Tommy Hilfiger आणि US Polo Assn सारख्या ब्रँड्ससाठी ओळखले जाते. लग्नाच्या सीझनमध्ये कपड्यांची डिमांड वाढते आणि Arvind Fashions ने आपल्या स्टोअरचा विस्तार करण्याचं ठरवलं आहे. कंपनी आपल्या नवीन प्रॉडक्ट लाईन्समध्ये विविधता आणत असून ग्राहकांसाठी वेगवेगळे पर्याय उपलब्ध करून देत आहे.
10. Trent Ltd.
Trent ही आणखी एक Tata Group ची कंपनी आहे. Westside आणि Zudio सारखे ब्रँड्स असलेली ही कंपनी वेगवेगळ्या फॅशन प्रकारांमध्ये आहे. लग्नाच्या सीझनमध्ये त्यांच्या स्टोअरमध्ये मोठी विक्री होण्याची अपेक्षा आहे. कंपनीने नुकतेच 203 नवीन Zudio स्टोअर्स सुरू केले असून, यामुळे ग्राहकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. Trent आपल्या ब्रँड पोर्टफोलिओमध्ये नवनवीन लेबल्स आणत आहे, ज्यामुळे त्यांची वाढ होत राहील.
अशा वेडिंग थीमवर आधारित stocks मध्ये गुंतवणूक करणं आकर्षक असू शकतं, पण तितकंच काळजीपूर्वक निर्णय घेणं गरजेचं आहे. अशा stocks मध्ये गुंतवणूक करताना बाजारभावाचं भान राखा वं. लग्नाचा सीझन मोठ्या आर्थिक संधी घेऊन येतो पण तरीही गुंतवणूक करताना सर्व गोष्टींचा विचार करूनच पुढे जावं.
सलिल सुधाकर चौधरी.
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया.