There are no items in your cart
Add More
Add More
| Item Details | Price | ||
|---|---|---|---|
इंग्लंड मधील रेडिच (Redditch) प्रांतातील एक छोटेसे गाव.
का कुणास ठाऊक पण गाव प्रसिद्ध होते "सुया" (सुई - Needles) बनविण्यासाठी. इतके की आजही गावात चक्क सुयांचे म्युझिअम आहे.
त्या गावात १९व्या शतकाच्या सुरुवातीला एक कारखाना होता. तेथे केवळ साध्या सुया (Needles) बनवल्या जात होत्या.
या कारखान्याचं नाव होतं – George Townsend & Co.
पन्नास वर्षं ही कंपनी सुयाच बनवत होती.
पुढे त्यांनी प्रयोग केला – सायकलच्या सॅडल्स (सीट्स) बनवायचा.
सॅडल्सना चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर वाटलं, “संपूर्ण सायकल का बनवू नये?”
आणि तिथून सुरू झाली सायकल तयार करण्याची धडपड.
George Junior ने या कामाला चालना दिली.
पण या कामात गुंतवणूक जास्त झाली आणि कंपनीला फारसं यश मिळालं नाही.
शेवटी कंपनीच्या बँकर्सनी ही कंपनी विकली – बॉब स्मिथ (Bob Walker Smith) आणि अल्बर्ट एडी (Albert Eadie) यांना.
त्यांनी सायकलींचं उत्पादन चालू ठेवलं.
फक्त सायकलीच नव्हे तर Royal Arms Factory साठी प्रिसिजन पार्ट्सही बनवायला सुरुवात केली.
पण तरीसुद्धा व्यवसायाला म्हणावी तशी गती मिळाली नाही.
शेवटी कंपनीचं नियंत्रण आलं एका तिसऱ्या कंपनीकडे – Birmingham Small Arms नावाच्या कंपनी कडे.
आणि इथून सुरू झाला खरा प्रवास.
कंपनी हळूहळू स्थिर झाली आणि नाव कमवू लागली.
आता आपण मोर्चा वाळवूया भारताकडे. हो, या कथेत भारताचा मोठा वाटा आहे.
ब्रिटिश काळात भारतीय सेनेला सायकलींची गरज होती.
सीमांवरच्या खडतर परिस्थितीत सैनिकांना वाहतुकीचं साधन हवं होतं.
याच वेळी भारतात एक ट्रेडिंग कंपनी सुरू झाली – English Cycle Importing Company (ECIC).
ही कंपनी होती K. R. Sundarnarayan (सुंदरनारायण) यांची.
त्यांनी इंग्लंडमधील George Townsend कंपनीकडून सायकली आयात करून ब्रिटिश - भारतीय सेनेला पुरवण्याची सुरुवात केली.
पुढे इंग्लंडमध्ये सायकलला मोटार जोडून मोटारसायकल तयार करण्यात आल्या. ESIC ने त्यादेखील भारतात आयात करायला सुरुवात केली.
त्याच काळात कंपनीचं नाव बदललं – ती झाली मद्रास मोटर्स (Madras Motor).
साल १९५२. भारत स्वतंत्र झाला होता.
सीमेवर लढणाऱ्या सैनिकांसाठी मोटरसायकलींची गरज होतीच.
भारत सरकारने ब्रिटनमधील मूळ कंपनीला मोठी ऑर्डर दिली.
पण पंडित नेहरूंच्या सरकारने एक अट ठेवली –
“मोटरसायकली भारतातच तयार व्हायला हव्यात.” (त्यावेळची make in india !)
या अटीमुळे ब्रिटनमधील कंपनीने भारतातील Madras Motors सोबत करार केला.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी
https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
त्यांना परवाना दिला – आणि अशा प्रकारे George Townsend & Co ची मोटरसायकल भारतात तयार होऊ लागली.
भारतीय सैन्याच्या गरजा भागवल्यानंतर, हळूहळू ही मोटरसायकल सामान्य लोकांमध्येही लोकप्रिय झाली. मजबूत, दमदार, विश्वासार्ह – हे गुण लोकांना भुरळ घालू लागले.
इतकंच नाही, तर भारतात तयार होणाऱ्या या मोटरसायकली तुलनेने स्वस्त असल्याने इंग्लंडला परत निर्यात होऊ लागल्या.
ज्या देशातून ही मोटरसायकल आली, तिथेच ती भारतीय उत्पादन म्हणून विकली जाऊ लागली.
तर मित्रांनो, George Townsend & Co चा सुया बनविण्याचा मूळ कारखाना इंग्लंडमधील Redditch प्रांतांमधील ज्या छोट्याश्या गावात होता, त्या गावाचे नाव होते "Enfield" (एन्फिल्ड)
Enfield नावाच्या गावात.
आणि त्यांची सायकल विकत घेणारा पहिला ग्राहक होता - ब्रिटनमधील Royal Army !
म्हणूनच या सायकलीचं नाव ठेवलं गेलं – “Royal Enfield.” तेच नाव पुढे मोटारसायकलला पण देण्यात आलं !
आज या ब्रँडचं संपूर्ण नियंत्रण आहे Eicher Motors कडे.
आणि भारतात तयार होणारी व जगभरात निर्यात होणारी,
जगातील लोकप्रिय मोटरसायकल Royal Enfield ही संपूर्णपणे भारतीय उत्पादन म्हणून ओळखली जाते !
एन्फिल्ड या छोट्याशा गावात सुरू झालेलं काम –
एका सुईपासून, पुढे सायकल, मग मोटरसायकल आणि अखेर जगप्रसिद्ध ब्रँड!
ही कहाणी आपल्याला शिकवते की –
प्रत्येक सुरुवात लहान असते.
मात्र धाडस, दूरदृष्टी आणि योग्य वेळी घेतलेले निर्णय
एखाद्या लहान कल्पनेलाही जागतिक यशात बदलू शकतात.
आज तुमच्याकडेही कदाचित एखादी लहान कल्पना असेल.
ती एखाद्या सुईसारखीच छोटी वाटत असेल.
पण जर चिकाटी ठेवली, बाजाराच्या गरजा ओळखल्या,
आणि योग्य वेळी योग्य पाऊल उचललं –
तर उद्या त्या कल्पनेचं रूपांतर
तुमच्या आयुष्याचा रॉयल एनफिल्ड बनू शकतं !
(आणखीन एक ट्रीव्हिया - George Townsend & Co ची तिसरी मालक कंपनी होती Birmingham Small Arms म्हणजेच BSA ! आजही BSA च्या सायकल्स भारतात आणि जगभर विकल्या जातात. BSA मोटरसायकल ब्रँड आता भारतातील महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीकडे आहे आणि BSA सायकल ब्रँड भारतातीलच मुरुगप्पा ग्रुपकडे आहे !)
यशस्वी भव !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !