There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
ही गोष्ट आहे १९२९ सालची. फ्रिट्झ लँग (Fritz Lang) नावाच्या एका जर्मन दिग्दर्शकाने 'डी फ्राउ इम मॉन्ड' (Die Frau im Mond) नावाचा एक चित्रपट बनवला, ज्याचा अर्थ होतो 'चंद्रावरील स्त्री'. हा चित्रपट विज्ञानावर आधारित (science-fiction) होता आणि त्यात चंद्रावर जाणाऱ्या रॉकेटची कथा होती. त्या काळात चंद्रावर जाण्याचे तंत्रज्ञान अस्तित्वातच नव्हते, त्यामुळे लँग यांना केवळ कल्पनाच करायची होती. (हा चित्रपट आल्यानंतर पुढे ४० वर्षांनी माणसाने पहिल्यांदा चंद्रावर पाऊल ठेवले.)
आपल्या चित्रपटाला अधिक वास्तविक बनवण्यासाठी त्यांनी जर्मनीचे तज्ज्ञ हर्मन ओबेर्थ (Herman Oberth) यांची मदत घेतली. ओबेर्थ आणि लँग यांनी मिळून चित्रपटात चाळीस वर्षांपूर्वीच भविष्यातील अनेक गोष्टी अचूकपणे मांडल्या, जसे की अंतराळवीरांचे अंतराळात गुरुत्वाकर्षणमुक्त तरंगणे किंवा रॉकेटचे विविध टप्प्यांमध्ये (booster stages) प्रज्वलित होणे.
पण या चित्रपटाचा अवकाश प्रवासावर सर्वात मोठा प्रभाव टाकणारा भाग पूर्णपणे वेगळाच होता.
हा चित्रपट बनण्याच्या काळात आवाज रेकॉर्ड करण्याचे तंत्रज्ञान अत्यंत प्राथमिक, प्रायोगिक आणि महाग होते. त्यामुळे फ्रिट्झ लँग यांचा चित्रपट मूकपट (silent film) होता. (चार्लि चॅप्लिन सारखा ज्यात व्हिडिओ मधील मुख्य डायलॉग्ज स्क्रीनवर लिहून दाखविले जातात.) प्रत्यक्ष आवाज वापरता येणार नसल्यामुळे त्यांना चित्रपटामधील रॉकेट प्रक्षेपणाच्या (launch sequence) दृश्यात नाट्य आणि उत्कंठा निर्माण करण्यासाठी काहीतरी वेगळे करायचे होते.
त्या काळापर्यंत, कोणतीही शर्यत किंवा सुरुवात "एक... दोन... तीन... सुरू!" (One... Two... Three... GO!) अशा थेट गणनेने होत असे. पण लँग यांना हे खूपच साधे वाटले. त्यांना आपल्या चित्रपटातील प्रक्षेपणाचा क्षण अधिक प्रभावी आणि अविस्मरणीय बनवायचा होता.
त्यांच्या डोक्यात एक विलक्षण कल्पना आली. आवाज तर नव्हताच, म्हणून त्यांनी पडद्यावरील अक्षरांचा वापर करून प्रक्षेपणाची प्रक्रिया उलट्या क्रमाने दाखवण्याचे ठरवले. थेट गणती करण्याऐवजी त्यांनी उलटी गणती (COUNT-DOWN) सुरू केली.
चित्रपटात, जेव्हा अंतराळवीर आपल्या जागेवर प्रक्षेपणाची वाट पाहत असतात, तेव्हा पडद्यावर एक कार्ड येते: "Noch 10 sekunden" (म्हणजे 'आणखी १० सेकंद बाकी'). त्यानंतर पडदा व्यापून टाकणारे आकडे येतात: "५", "४", "३", "२", "१", आणि शेवटी "JETZT" (म्हणजे 'आता लाँच').
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================
पण या कल्पनेचा प्रभाव केवळ चित्रपटापुरता मर्यादित राहिला नाही. या चित्रपटाच्या प्रभावामुळे ही पद्धत जर्मनीबाहेर पसरली आणि लवकरच कोणत्याही महत्त्वाच्या गोष्टीच्या सुरुवातीसाठी 'काउंटडाउन' एक जागतिक प्रथा बनली - मग ते अणुबॉम्बचे परीक्षण असो, पॅराशूट जंप असो किंवा एखादे लष्करी आक्रमण.
जी गोष्ट लँग यांनी केवळ आपल्या चित्रपटात उत्कंठा निर्माण करण्यासाठी केली होती, ती जगभरातील रॉकेट प्रक्षेपणाचा एक अविभाज्य भाग बनली.
ही कल्पना कोणत्या शास्त्रज्ञाच्या डोक्यातून नाही, तर एका कलाकाराच्या, एका चित्रपट दिग्दर्शकाच्या मनातून आली, ज्याला फक्त थोडी अधिक नाट्यमयता हवी होती. त्याने वैज्ञानिक अचूकतेपेक्षा मानवी मनाचा विचार केला. परिणामी, मानवी मनाला ती पद्धत अधिक प्रभावी वाटली आणि तिने तत्कालीन प्रथेला मागे टाकून नवी जागतिक पद्धत सुरु केली.
यावरून सिद्ध होते की, मोठमोठी यंत्र असो, व्यवसाय असो किंवा योजना असो.....मानवी भावनांच्या स्पर्शाशिवाय त्यास पूर्णत्व येत नाही. "...आज जगभरातील वैज्ञानिक हीच पद्धत वापरतात. कारण वैज्ञानिक असले तरी ती ही माणसेच आहेत !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !