दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं !

दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं !

एक मुलगा कॉलेज मध्ये असताना अभ्यास कमी उनाडक्या जास्त करायचा.
कॉलेजमधील दुसऱ्या एका ग्रुपसोबत त्याचे भांडण होते. त्या ग्रुपच्या मुलामुलींना त्रास द्यायचा.
दिवसभर सिगारेट फुकायचा आणि मित्रांसोबत टवाळक्या करत फिरायचा.
कॉलेज संपल्यानंतर एकदा त्याने एका मुलीला पाहिलं आणि पहिल्या नजरेतच त्याला ती आवडली.
मग त्याने तिची माहिती काढली. तिला भेटला. पण स्वतःची खरी ओळख लपवून. आपल्या खोट्या रूपातच तिला काही दिवस भेटत राहिला.
हे खोटं नाटक उघडकीस आल्यावर पुन्हा धिंगाणा केला. दारू पिऊन तिच्या घरासमोर नाचला.
पुढे तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पण मारण्याचा प्रयत्न केला.
तिच्या होणाऱ्या सासरच्या घरी तोडफोड करून आला.
आता दुसऱ्या एका मुलाबद्दल सांगतो.
हा मुलगा हुशार होता.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/FAMeuyTOtb2HTogf6ZGlW2
येथे क्लिक करा.
================
इंजिनीअर झाला..पण इंजिनीरिंग मध्ये करिअर न करता पुढे MBA शिकला.
मग एका मोठ्या कंपनीत मोठ्या पगारावर आणि मोठ्या हुद्द्यावर नोकरी करू लागला.
पुढे तो आपल्या आवडत्या मुलीबरोबर तिच्या आणि तिच्या वडिलांच्या संमतीने लग्न पण करणार होता.
या दोन मुलांची तुलना केली तर साहजिकच कोणीही सांगेल की पहिला मुलगा वाईट आणि दुसरा खूप चांगला आहे. पहिल्या मुलाचा आदर्श घेणं दूरच आपण आपल्या मुलांना त्याच्या सहवासातही जाऊ देणार नाही. आणि दुसऱ्या मुलाकडे आपण आपल्या मुलांना निदान करिअरचा सल्ला घेण्यासाठी तरी पाठवू.
प्रत्यक्षात पहिला मुलगा "रेहना है तेरे दिल मै" या चित्रपटाचा नायक आहे. आणि दुसरा मुलगा "थ्री इडियट्स" मधील एक काहीसा "यशस्वी तरी अपयशी" असा दाखविलेला कलाकार !
तर हे असं आहे. म्हंटल तर चित्रपटात दाखविलेलं बरोबरही आहे आणि म्हंटल तर चूकही. Context लक्षात घेतला नाही तर सत्य कळणारच नाही. हे केवळ चित्रपटातच घडतं असं नाही. प्रत्यक्षातही आपण अशी गफलत बऱ्याचदा करतो. गोष्टी जशा दाखविल्या जातात तशा त्या असतीलच असे नाही.
आपण काय बघतोय त्यासोबत हे आपल्याला काय दाखवलं जातंय , का दाखवलं जातंय, कसं दाखविलं जातंय, कधी दाखविलं जातंय आणि मुळात आपल्यालाच का दाखविलं जातंय या प्रश्नांचा विचार केला तरच ते कळेल. या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाल्याशिवाय विश्वास ठेवू नका.
सोशल मीडियावर एखादी पोस्ट बघून तुम्हाला राग येतो, चीड येते तेव्हा क्षणभर थांबून कंटेक्स्ट लक्षात घ्या. वर दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न करा. आणि मगच त्याबद्दल मत बनवा....
दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

What would you like to learn today?