द वन मिनीट मॅनेजर (#Saturday_BookClub)

एकदा एक प्रतिभावान तरूण एका विशिष्ट प्रकारच्या मॅनेजरच्या शोधार्थ निघाला. त्याला एक असा मॅनेजर हवा होता, जो लोकांना आपल्या कामात आणि जीवनात संतुलन आणण्यात मदत करेल. अशा मॅनेजरच्या शोधात हा तरूण गावोगावी, खेडोपाडी आणि अतिशय दूरवर भटकला. त्याने अनेक कडक मॅनेजर पाहिले, ज्यांच्या कंपनी तर यशस्वी होत्या पण तिथे असलेले कर्मचारी उदास आणि वैतागलेले होते. त्याने असेही अनेक मॅनेजर पाहिले जे खूप चांगले होते त्यामुळे त्या कंपनीचे कर्मचारी तर सुखी होते पण ती कंपनी मात्र यशस्वी झालेली नव्हती. अखेरीस त्याला कोणीतरी एका खास मॅनेजरचा पत्ता दिला, त्याचे खूप किस्से त्याच्या कानावर पडू लागले. त्याने ऐकले की हा मॅनेजर खूपच हुशार होता आणि कर्मचारी त्याच्याबरोबर काम करताना खूप खूश असत. शिवाय, ते सोबत उत्तम काम करत असल्याने त्यांची कंपनीही खूप यशस्वी होती. या मॅनेजरबद्दल ही सगळी वैशिष्ट्य ऐकून तो तरूण जवळच्याच शहरात रहात असलेल्या त्याला भेटायला गेला. भेटीची वेळ नक्की व्हावी म्हणून त्याने त्या मॅनेजरच्या सेक्रेटरीला फोन केला तर तिने थेट मॅनेजरशीच त्याचं बोलणं करून दिलं. मॅनेजर म्हणाला, बुधवार सोडून कोणत्याही दिवशी कोणत्याही वेळी या .. या उत्तरावर तरूणाला फार धक्का बसला. एवढा रिकामा असलेला हा मॅनेजर कोण याची उत्सुकता त्याला वाटली.. म्हणून तो भेटायला गेला, तेव्हा त्याला कळलं की लोक या मॅनेजरला वन मिनीट मॅनेजर म्हणून ओळखत. मॅनेजरला त्या तरूणाने प्रश्न केला, की तुमची कामाची पद्धत काय व कशी आहे हे मला जाणून घ्यायला फार आवडेल, तेव्हा त्याने सांगितले.. की याबाबत तुम्हाला माझ्यापेक्षा माझे कर्मचारीच जास्त चांगली माहिती देऊ शकतील.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

तेव्हा सहा कर्मचाऱ्यांचे नाव व फोन नंबर त्याने त्या तरूणाला देऊ केले. त्यापैकी तीन कर्मचाऱ्यांशी तो बोलला आणि तीन रहस्य त्याला त्यांच्याकडून कळली ती अशी -

1. एक मिनीटांचे लक्ष्य -
ही अशी एका मिनीटांची ध्येय खूप चांगलं काम करतात. जेव्हा मॅनेजर आणि कर्मचारी मिळून ध्येय ठरवतात आणि त्याचे संक्षिप्त आणि स्पष्ट विवरण लिहून ते कर्मचाऱ्यांसमोर ठेवलं जातं तेव्हा त्यांच्यासमोर तो आदर्श निर्माण होतो. कर्मचाऱ्यांनाही हे वन मिनीट मॅनेजर तशाच प्रकारे स्वतःचं प्रत्येक उद्दीष्ट तारखेसह एका पानावर लिहायला सांगतात आणि दररोज आपल्या प्रत्येक उद्दीष्टाची समीक्षा करायला सांगतात.. या सगळ्याला केवळ काहीच मिनीटं लागतात. आता पुढची पायरी म्हणजे कर्मचाऱ्यांची उद्दीष्ट समोर ठेऊन मॅनेजर त्यांना सांगतात की आता अगदी एकच मिनीट वेळ खर्ची घालून हे पहा की तुम्ही काय करता आहात.. अर्थात आत्मपरिक्षण करा. तुम्ही करत असलेल्या कृती आणि तुमची उद्दीष्ट जर एकमेकांशी ताळमेळ राखत नसल्याचं तुम्हाला जाणवलं तर मग तुमच्या उद्दीष्टांपर्यंत पोहोचण्यासाठी तुम्ही तुमच्या कृतीत बदल करणं अनिवार्य आहे याकडे हे मॅनेजर कर्मचाऱ्यांचं लक्ष वेधतात आणि मग कर्मचारी स्वतःच स्वतःमध्ये बदल घडवू लागतात.

2. एक मिनीटाची प्रशंसा -
अशी प्रशंसा तेव्हा काम करते, जेव्हा तुम्ही पहिला अर्धा मिनीट तुमच्या कर्मचाऱ्यांची तत्काळ प्रशंसा करता, त्यांना सांगता की त्यांनी काय बरोबर केलं आणि एवढ्यावरच तुम्ही थांबत नाही, तर तुम्ही त्यांना हे देखील सांगता की त्यांच्या त्या एका योग्य कृतीने तुम्हाला किती बरं वाटलंय आणि त्यामुळे कोणाकोणाला मदत होणार आहे. हे सगळं त्या कर्माचाऱ्याला सांगण्यासाठी तुम्ही क्षणभऱ त्याच्या पुढ्यात थांबता आणि त्यामुळे तर त्या कर्मचाऱ्याला आणखीनच चांगलं वाटतं. पुढला अर्धा मिनीट त्या कर्मचाऱ्याला तुम्ही प्रोत्साहन देण्यासाठी खर्ची घालता. तुम्ही त्या कर्माचाऱ्यावर विश्वास दाखवता आणि त्याला तो यशस्वी होईल याबद्दल विश्वास देता.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================

3. एक मिनीटाची दटावणी -
जेव्हा लक्ष्य स्पष्ट असतं तेव्हा तिथवर पोहोचणं फार कठीण नसतं. म्हणूनच, कर्मचाऱ्यांना पुन्हा मार्गदर्शन करा, पहिले तथ्य तपासा आणि मग मिळून चुक कशामुळे झाली याची समीक्षा करा. या चुकीमुळे तुम्हाला कसं वाटतंय ते कर्मचाऱ्यांना सांगा आणि आता याचे काय परिणाम होतील तेही कर्मचाऱ्यांना स्पष्ट करून सांगा. आता क्षणभर शांत व्हा, म्हणजे कर्मचाऱ्यांना स्वतःच्या चुकांबद्दल वाईट वाटण्यास वेळ व संधी मिळेल. आता लक्षात ठेवा की पुढल्या अर्धा मिनीटात तुम्हाला त्यांना हे सांगायचंय की ते त्यांच्या चुकांहून अधिक चांगले आहेत आणि माणसाच्या हातून चुका होतातच. माणूस म्हणून आपण त्यांना समजू शकतो, त्यांच्याबद्दल चांगलीच भावना आपल्या मनात आहे हे त्यांना पटवून द्या. तुमचा त्यांच्यावर विश्वास आहे व एक ना एक दिवस ते यशस्वी होतील याबाबत त्या कर्मचाऱ्यांच्या मनात तुम्ही विश्वास निर्माण करा.
ही तीन्ही रहस्य कळल्यावर ती मनात पक्की करून तो तरूण पुन्हा त्याच्या गावी गेला व कामावर रूजू झाला आणि अल्पावधीतच तो स्वतः देखील फार लोकप्रिय मॅनेजर झाला. कारण, आता तो नेतृत्व आणि टीमवर्कची तंत्र वापरण्यात निष्णात झाला होता. त्याने गोष्टी सोप्या ठेवल्या, त्याने एक मिनीटांची लक्ष्य निर्धारित केली, एक मिनीटांची प्रशंसा केली आणि एका मिनीटांचे पुन्हा मार्गदर्शन केले, त्याने संक्षिप्त महत्त्वपूर्ण प्रश्न विचारले. त्याने सहजपणे सत्य कथन केले, तो हसला, त्याने भरपूर काम केलं आणि कामातून आनंद मिळवला.

केन ब्लँचर्ड आणि स्पेन्सर जॉन्सन लिखीत हे पुस्तक वाचण्यासाठी या लिंकवर क्लिक करा - https://salil.pro/1MM

धन्यवाद
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया
learn.netbhet.com