There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
काही काही उत्पादनं अशी असतात, ज्यांच्या जाहिरातींवर कायद्याने बंदी असते, त्यामुळे त्या उत्पादनांच्या जाहीराती करण्यासाठी त्याच ब्रँडच्या नावांतर्गत दुसऱ्याच उत्पादनांच्या जाहिराती केल्या जातात, याला सरोगेट अॅडव्हर्टायझिंग असे म्हणतात.
Impereal Blue -
टीव्हीवर ती सतत झळकणारी Men will be men ची जाहीरात तुम्ही पाहिलीच असेल, सरोगेट जाहिरातींचं ते एक उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्षात ते विकतात दारू, पण ते जाहिरात करतात म्यूझिक सीडींची !
Kingfisher - किंगफिशर ही कंपनी मद्य विक्री करते हे कोणाला ठाऊक नाही ? पण जाहिरात मात्र ते करतात ती किंगफिशर कॅलेंडरची !
अशीच गंमत आहे कार्ल्सबर्गची.. ते म्हणजे क्लब ग्लासेस विकतात, आणि बकार्डी कंपनीही म्यूझिक सीडीजची जाहिरात करते.
सरोगेट अॅडव्हर्टायझिंग कशासाठी ?
लोकांच्या मनावर सतत आपल्या ब्रँडचं नाव बिंबवण्यासाठी ! लोकांच्या मनात आपल्या ब्रँडची प्रतिमा खराब किंवा नकारात्मक कधीही होऊ नये म्हणून !
पोस्ट आवडल्यास जरूर आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा.
धन्यवाद
टीम नेटभेट