There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
महाराष्ट्रातील वाकोद गावात शेतकरी जैन कुटुंबात जन्मलेल्या भंवरलाल जैन यांना बालपणी अनेकदा एकवेळच्या जेवणासाठीही संघर्ष करावा लागला. तरीही त्यांनी वाणिज्य आणि कायद्याची पदवी मिळवली. वडिलांप्रमाणे त्यांना स्वतःचा व्यवसाय सुरू करायचा होता.
केवळ ७,००० रुपये घेऊन त्यांनी जळगावात हातगाडीवरून रॉकेल विक्री सुरू केली. जळगाव हा कृषीप्रधान भाग होता. त्यामुळे त्यांनी लवकरच बियाणे, खते आणि पंप यासारख्या शेतीच्या निविष्ठांवर लक्ष केंद्रित केले. विश्वासार्हतेने व्यवसाय वाढवताना त्यांना एक मोठी संधी मिळाली.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK येथे क्लिक करा.
================
भारतीय शेतीत योग्य सिंचन सुविधांचा अभाव होता. बहुतांश शेतकरी अनिश्चित पूर सिंचनावर अवलंबून होते. भाऊंनी १९८६ मध्ये जैन इरिगेशन सिस्टम्स स्थापन करून ठिबक आणि तुषार सिंचन तंत्रज्ञान आणले. या तंत्राने ७०% पाण्याची बचत होऊन पीक उत्पादन वाढले.
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात ही संकल्पना यशस्वी झाली. त्यांनी प्लास्टिक शीट्स, सौर वॉटर हीटर्स आणि शेतीसाठी पाइप्स बनवणारे सात कारखाने सुरू केले. १९९४ मध्ये त्यांनी आशियातील सर्वात मोठी टिश्यू कल्चर सुविधा सुरू केली, जी दरवर्षी केळी आणि डाळिंबासाठी ९ कोटी रोपे तयार करते.
१९९७ पर्यंत त्यांनी ४०० कोटींचे ११ प्रकल्प हाती घेतले, जे कंपनीच्या आकाराएवढे होते. परंतु २५० कोटींचे कर्ज आणि व्यवस्थापनातील कमतरतेमुळे शेअरची किंमत फेब्रुवारी १९९४ मधील ३६५ रुपयांवरून ऑक्टोबर २००० मध्ये ८ रुपयांवर घसरली. २००२ मध्ये Aqua International Partners ने १८३ कोटींमध्ये ४९.४% हिस्सा खरेदी केला.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWKयेथे क्लिक करा.
================
भाऊंचा हिस्सा ७३% वरून ३७% वर आला, तरी त्यांनी हार मानली नाही. त्यांनी अनेक छोटे व्यवसाय बंद केले, मुख्य प्रोडक्ट्स वर फॉक्स केला, कर्ज फेडले आणि भांडवल मजबूत केले. त्यांनी जैन फ्रेश फार्म फूड्स सुरू केले, जे भारतातील सर्वात मोठे आंबा पल्प आणि डिहायड्रेटेड कांदा निर्यातदार बनले. २०१२ पर्यंत कंपनी ३,८०० कोटींची झाली.चॅपिन, वॉटरमॅटिक्स आणि नानडान यांसारख्या कंपन्यांच्या अधिग्रहणाने कंपनीने जागतिक पातळीवर विस्तार केला. २०१७ मध्ये ७,००० कोटींची उलाढाल आणि १७६ कोटींचा नफा कमावून ती भारतातील सर्वात मोठी आणि जगातील दुसऱ्या क्रमांकाची सूक्ष्म सिंचन कंपनी बनली.
आज घडीला १२० देशांमधील ६,००० डीलर्ससह कार्यरत, ३३,८१० कोटींच्या मूल्यांकनासह जैन इरिगेशन ही भारतातील सर्वात मोठी आणि जगातील दुसरी सर्वात मोठी सूक्ष्म सिंचन कंपनी आहे. पद्मश्री भंवरलाल हिरालाल जैन यांचे २०१६ मध्ये निधन झाले, परंतु त्यांचा वारसा आजही जगभरातील १ कोटी शेतकऱ्यांना आधार देतो आहे.