There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
१९४५ साल. दुसरं महायुद्ध संपायला फक्त काही आठवडे बाकी होते. अमेरिकन सैन्याने जपान मधील दोन शहरांवर अणुबॉम्ब टाकण्याचा निर्णय घेतला. हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरांचा इतिहास कायमचा बदलून गेला. हजारो लोकं क्षणात भस्मसात झाली.
पण तुम्हाला माहिती आहे का – ज्या शहरांवर बॉम्ब टाकण्याचे ठरले होते त्या मूळ यादीमध्ये हिरोशिमाऐवजी क्योटो हे शहर होतं? पण अमेरिकेचे युद्धसचिव हेन्री स्टिम्सन हे एकदा सुट्टीसाठी क्योटो शहरांत गेले होते. त्यांचं क्योटोवर विशेष प्रेम होतं. तिथली संस्कृती, शांतता, मंदिरं… त्यांना खूपच आवडली होती.
त्यांनी ठामपणे सांगितलं – “Do not bomb Kyoto.” आणि त्या एका वाक्यामुळे क्योटो शहर आज अस्तित्वात आहे. आणि हिरोशिमा भस्मसात झालं होतं !
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.
================
बिल गेट्स आज जगातल्या सर्वात यशस्वी माणसांपैकी एक आहेत. त्यांच्या एका मित्रांसोबत शाळेत असतानाच एक सॉफ्टवेअर प्रोजेक्ट दोघांनी मिळून पूर्ण केला होता. पुढे जाऊन काहीतरी भव्यदिव्य करायचं असं त्या दोघांनी मिळून ठरवलं होतं.
तो मित्र होता केंट इव्हन्स. दोघंही शाळेत एकत्र शिकायचे, संगणकात रमायचे, कल्पना मांडायचे. दोघांचं एक स्वप्न होतं – एकत्र कंपनी सुरू करायची.
बिल गेट्सने त्याच्याबद्दल लिहूनही ठेवलं आहे– “Kent was the best. The smartest, the fastest, the funniest. He would have been my first business partner.”
पण नियतीचं गणित वेगळंच होतं.
एक ट्रेकिंग अपघातात, अवघ्या १७व्या वर्षी, केंट इव्हन्सचा मृत्यू झाला.
कोण सांगू शकलं असतं – कदाचित आजच्या Microsoft मध्ये "Bill & Kent" असं नाव असतं!
त्याचं स्वप्न, त्याची ऊर्जा, त्याचं संभाव्य भविष्य – एका अनपेक्षित क्षणात निघून गेलं.
बिल गेट्स अशा शाळेत होते जिथे त्यांच्या लहानपणीच संगणक होता. त्यावेळी ती अमेरिकेतील आणि बहुदा जगातील एकमेव अशी शाळा होती जिथे संगणक उपलब्ध होता ! अशा शाळेत शिकायला मिळण्याची "संधी" बिल गेट्स यांना मिळाली हा देखील एक मोठा योगायोग !
१९९० मध्ये दक्षिण आफ्रिकेच्या गुप्तचर संस्थेने एका संशयित क्रांतिकारी कार्यकर्त्याला शोधून ठार मारण्याचा आदेश दिला.
त्या व्यक्तीचं नाव होतं सिरिल रामाफोसा.
त्या ऑपरेशनसाठी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्याने केस फायलींग करताना त्या तरुणाचा एक फोटो पाहिला. तो फोटो एका सभेतील होता – सिरिल मोठ्यानं हसत होता. ते अधिकारी म्हणाले – “हा तरुण क्रूर असूच शकत नाही. याला मारणं म्हणजे चुकीचा निर्णय होईल.” ऑपरेशन थांबवण्यात आलं. आज तोच तरुण दक्षिण आफ्रिकेचा राष्ट्राध्यक्ष आहे !
आपलं संपूर्ण आयुष्य हा असाच एक मोठा योगायोग आहे ! आपल्याला वाटतं आपण खूप "यशस्वी" झालो आहोत. त्यामागे मोठं कर्तृत्व आहे. पण प्रत्यक्षात या यशात भलामोठा वाटा अशा अनेक "योगायोगाचा" आहे !
कधी विचार केलाय ? – आपण शाळेत जाऊ शकलो, चांगलं शिक्षण घेऊ शकलो, आपल्याकडे इंटरनेट आहे, मोबाईल आहे, आणि सध्या आपण ही पोस्ट वाचतोय – हीच किती मोठी गोष्ट आहे!
आपल्या जन्मावर आपलं काहीच नियंत्रण नसतं. कोणत्या देशात जन्म होईल, कोणत्या जाती-धर्मात, कोणत्या आर्थिक परिस्थितीत – हे सगळं आपल्या निर्णयाविना घडत असतं.
तुम्ही जर आज भारतात मध्यमवर्गीय कुटुंबात जन्मला असाल, शिक्षण घेऊ शकलात, आजारपणात डॉक्टरपर्यंत पोहोचू शकता – तर तुम्ही जगातील वरच्या १० टक्क्यांमध्ये आहात!
UNICEF च्या रिपोर्टनुसार, दरवर्षी ५ कोटी मुलं अशी असतात, जी जन्मल्यावर लगेचच गरिबी, कुपोषण, किंवा युद्ध यामध्ये अडकतात.
Global Wealth Report (Credit Suisse) म्हणतो की, जगात ५८% लोकांकडे $10 पेक्षा कमी उत्पन्न आहे. आणि आपल्याकडे? जरी आपल्याकडे कोट्यवधी रुपये नसले, तरीही सुरक्षित राहण्यासाठी घर आहे, पाणी, आरोग्य, शिक्षण, इंटरनेट, आणि स्वप्नं पाहण्याचं स्वातंत्र्य आहे. हे सगळं मिळणं म्हणजे लॉटरीच ना?
वॉरेन बफे स्वतः म्हणतात – “I was lucky to be born in America.” ते म्हणतात, जर ते दुसऱ्या देशात, गरीब कुटुंबात, अपुरी शिक्षणपद्धती असलेल्या ठिकाणी जन्मले असते, तर त्याचं यश अशक्य होतं.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK
येथे क्लिक करा.
================
मग आपलं काहीच कर्तृत्व नाही का ?
नक्कीच आहे. आपली मेहनत, चिकाटी, शहाणपणा – हे सगळं महत्वाचं आहे. पण हे दाखवायची संधीच जर मिळाली नसती, तर…? कधी कधी आपण म्हणतो – “मी मेहनत केली म्हणून इथवर आलो.” बरोबर आहे. पण मेहनतीला संधी मिळाली हे विसरून कसे चालेल ?
त्या संधीसाठी कोणतंही क्रेडिट आपण घेऊ शकत नाही. ती संधी मिळाली – हेच सर्वात मोठं भाग्य आहे.
कधी तुम्हाला वाटलं, “माझं काही खास नाही चाललं आहे” – तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही जिथे आहात, तिथे पोहोचणं अनेकांसाठी स्वप्न आहे.
कधी तुम्हाला वाटलं, “मी खूप मोठं काहीतरी मिळवलंय” – तेव्हा स्वतःला आठवण करून द्या की तुम्ही जिथे आहात, तिथे पोहोंचण्याची संधीच कित्येकांना मिळालेली नाही !
आयुष्य फार प्लॅनिंगनं नाही चालत… कधी वाटतं सगळं आपल्याच हातात आहे… पण एक अनपेक्षित क्षण आयुष्याचा संपूर्ण मार्ग बदलू शकतो !
आयुष्य म्हणजे नियोजन नाही… एक सुंदर योगायोग आहे ! या "जन्म लॉटरी" साठी कृतज्ञ राहूया !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !