There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
ही गोष्ट आहे ब्रिटिशकालीन भारताची. दिल्ली शहरात विषारी नागांचा सुळसुळाट झाला होता. नागरिक भीतीच्या छायेखाली जगत होते. या समस्येवर तोडगा काढण्यासाठी ब्रिटिश सरकारने एक अनोखी योजना जाहीर केली: जो कोणी मेलेला साप सरकारजमा करेल, त्याला बक्षीस दिले जाईल. अनेक लोक साप मारून बक्षिसे मिळवू लागले आणि ही योजना यशस्वी ठरली असे वाटू लागले. पण लवकरच अधिकाऱ्यांच्या लक्षात आले की, मेलेल्या सापांची संख्या कमी होण्याऐवजी वाढतच चालली आहे.
चौकशीअंती एक धक्कादायक सत्य समोर आले. बक्षिसाच्या लालसेपोटी काही हुशार लोकांनी पैसे कमावण्यासाठी चक्क नागांची पैदास करायला सुरुवात केली होती. ते घरातच साप पाळायचे, त्यांना मारायचे आणि सरकारकडून बक्षीस घ्यायचे. जेव्हा सरकारला हा घोटाळा कळला, तेव्हा त्यांनी तातडीने ही बक्षीस योजना बंद केली. पण आता एक नवीन आणि अधिक गंभीर समस्या निर्माण झाली होती. ज्या लोकांनी साप पाळले होते, त्यांच्यासाठी ते आता निरुपयोगी झाले होते. त्यांनी ते सर्व साप सोडून दिले. परिणामी, शहरात पूर्वीपेक्षाही जास्त नागांचा सुळसुळाट झाला. ज्या उपायाने समस्या सुटायला हवी होती, त्याच उपायाने समस्येला अधिक बिकट बनवले. इतिहासातील ही प्रसिद्ध घटना "कोब्रा इफेक्ट" म्हणून ओळखली जाते.
https://www.facebook.com/share/p/14Gb7dyM2Ms/
"कोब्रा इफेक्ट" म्हणजे अशी परिस्थिती जिथे एखाद्या समस्येवर विचारपूर्वक तयार केलेला उपाय अनपेक्षित आणि नकारात्मक परिणाम देतो, ज्यामुळे मूळ समस्या अधिकच गंभीर बनते. असे निर्णय अनेकदा घेतले जातात, जे वरवर पाहता खूप प्रभावी वाटतात, पण प्रत्यक्षात ते नुकसानकारक ठरतात. (unintended consequences) याचे कारण म्हणजे निर्णय घेताना मानवी स्वभाव, लोकांची प्रतिक्रिया आणि संभाव्य दुष्परिणामांचा पुरेसा विचार केला जात नाही. (consequences of consequences - परिणामांचे परिणाम !)
२००८ मध्ये जेव्हा रतन टाटा यांनी 'एक लाखाची कार' टाटा नॅनो बाजारात आणण्याची घोषणा केली, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष वेधले गेले. सामान्य भारतीय कुटुंबाचे चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करणे, हा यामागे एक उदात्त हेतू होता. दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या कुटुंबांना एक सुरक्षित आणि परवडणारा पर्याय उपलब्ध करून देणे, ही मूळ समस्या होती आणि 'सर्गातील सर्वात स्वस्त कार' हा त्यावरचा उपाय होता.
पण झाले उलटेच. टाटा मोटर्सने नॅनोचे मार्केटिंग 'स्वस्त गाडी' म्हणून केले. भारतीय समाजात गाडी हे केवळ वाहतुकीचे साधन नाही, तर ते सामाजिक प्रतिष्ठेचे प्रतीक आहे. 'स्वस्त गाडी' हा टॅग लागल्यामुळे लोकांनी नॅनोकडे कमीपणाच्या नजरेने पाहण्यास सुरुवात केली. ती 'गरिबांची गाडी' म्हणून ओळखली जाऊ लागली. त्यामुळे, ज्यांच्याकडे पैसे होते त्यांनी ती प्रतिष्ठेमुळे नाकारली आणि ज्यांच्यासाठी ती बनवली होती, त्यांना ती विकत घेतल्यास आपल्या आर्थिक परिस्थितीची जाहिरात केल्यासारखे वाटू लागले. इथे गाडी परवडणारी बनवण्याचा उपायच तिच्या अपयशाचे कारण ठरला. मार्केटिंगमधील हा "कोब्रा इफेक्ट" होता, जिथे एका चांगल्या उत्पादनाला केवळ चुकीच्या ब्रँडिंगमुळे अपयशाचा सामना करावा लागला. कोब्रा इफेक्ट !
एका मोठ्या औषध कंपनीने रक्तातील कोलेस्ट्रॉल कमी करणारे एक प्रभावी औषध बाजारात आणले. वाढते कोलेस्ट्रॉल ही एक मोठी आरोग्य समस्या होती आणि हे औषध त्यावर एक उत्तम उपाय म्हणून पाहिले जात होते. औषध प्रभावी होते, पण त्याचा एक हलका दुष्परिणामही होता आणि तो खूप कमी लोकांमध्येच दिसून यायचा. कंपनीचे हे औषध चांगले चालत होते. विक्री अधिक वाढविण्यासाठी कंपनीने जाहिराती वाढविण्याचे ठरविले. औषधांच्या जाहिरातींमध्ये त्याचे दुष्परिणाम देखील सांगण्याचा कायदा होता. त्यामुळे कंपनीला तसे करावे लागले. या जाहिरातींचा परिणाम उलटाच झाला. दुष्परिणाम कळल्यामुळे लोकांनी ते औषध घेतले तर नाहीच, उलट जे लोक हे औषध घेत होते त्यांनी देखील ते घेणे बंद केले. कोब्रा इफेक्ट !
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/C5bE8OR5wYbIkC1sWMqtm4?mode=ac_t
येथे क्लिक करा.
================
पण झाले भलतेच. लोकांनी या संधीचा फायदा घेत कंपनीबद्दलच्या तक्रारी, वाईट अनुभव आणि समस्या सोशल मीडियावर मांडायला सुरुवात केली. चांगल्या अनुभवांऐवजी नकारात्मक कमेंट्सचा पूर आला. जी मोहीम ब्रँडची प्रतिमा उजळण्यासाठी सुरू केली होती, तीच त्यांच्यासाठी एक जनसंपर्क संकट (PR crisis) बनली. इथे ग्राहकांशी संवाद साधण्याचा उपायच त्यांच्या नाराजीला वाट करून देणारा मंच ठरला. कोब्रा इफेक्ट !
समजा सरकारने एका गटाची कर्जमाफी केली. मात्र कर्जमाफी जाहीर करण्याआधीच ज्यांनी कर्ज फेडले आहे त्यांना आपले नुकसान झाल्यासारखे वाटले. पुढील वेळी कर्जमाफी होईल या आशेने कोणीच कर्ज फेडण्याचा विचार करणार नाही. हेतू चांगला असला तरी "कोब्रा इफेक्ट"मुळे विपरीत परिणाम होऊ शकतो.
"कोब्रा इफेक्ट" आपल्याला सांगतो की कोणताही निर्णय घेण्यापूर्वी त्याच्या सर्व संभाव्य परिणामांचा विचार करणे किती महत्त्वाचे आहे. केवळ समस्येवर लक्ष केंद्रित न करता, त्यावरील उपायामुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य नवीन समस्यांचाही विचार केला पाहिजे. यासाठी दूरदृष्टी, सखोल विश्लेषण आणि मानवी मानसशास्त्राची समज आवश्यक आहे.
असा विचार करण्याच्या पद्धतीला "second order thinking" म्हणतात.
नेटभेटच्या "मेंटल मॉडेल्स" या मराठी ऑनलाईन कोर्समध्ये मी विचार करण्याची second order thinking आणि इतरही अनेक विचार करण्याचे मार्ग शिकविले आहेत. वैयक्तिक किंवा व्यावसायिक जीवनामधील अनेक निर्णय घेण्यासाठी हे Mental Models प्रचंड उपयोगी ठरतात. हा मराठी ऑनलाईन कोर्स मिळविण्यासाठी आम्हाला 93217 13201 या क्रमांकावर NETBHET MM असे व्हाट्सअँप मेसेजमध्ये लिहून पाठवा.
धन्यवाद !
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !