सिसू

दुसर्‍या महायुध्दाच्या वेळी एका अतिशय छोट्या आणि एका बलाढ्य देशामध्ये घडलेल्या अनोख्या युध्दाची ही गोष्ट आहे. दुसर्‍या महायुध्दात अनेक देश अक्षरशः होरपळून निघाले होते तर काही देशांना या युध्दाच्या झळा लागणे अजूनही बाकी होते.फिनलँड हा त्या देशांपैकीच एक देश होता जो दुसर्‍या महायुध्दापासून दूर होता. त्या देशाच्याच शेजारी असलेला रशियामात्र आपली ताकद वाढवण्याच्या दृष्टीने पावल उचलत होता. रशियाने आपल्या आजूबाजूला असलेले छोटे बर्फाळ देश काबिज करायला सुरुवात केली होती. नकाशाच्या रचनेनुसार फिनलँड खुप छोटा देश होता रशियाने आखलेल्या योजनेनुसार नकाशावर तर रशिया कधीच युध्द जिंकला होता. ३० नोव्हेंबर १९३९ च्या रात्री कोणतीही पूर्व सूचना न देता रशियाने फिनलँड ची राजधानी हेलासिंकी शहरावर चढाई सुरु केली. रशियाकडे तब्बल साडे चार लाख सैन्यबळ होते तर फिनलँड कडे फक्त दीड लाख सैनिक होते. सैन्यबळाच्या तुलानेनुसार फिनलँड हे युध्द हरणार हे जवळजवळ निश्चित होते.

हि विंटर वॉर ची सुरुवात होती, त्यावेळी फिनलँड मध्ये प्रचंड थंडी पडली होती आणि नॉर्थ पोल च्या जवळ असल्यामुळे तिथे १८ तास काळाकुट्ट अंधार असे. फिनलँड ला त्यांच्या भौगोलिक परिस्थितीची पूर्णपणे कल्पना होती याच थंडीचा आणि अंधाराचा फायदा त्यांनी उचलला. रशियाने फिनलँड ला चारिही बाजूने घेरा घालायला सुरुवात केली होती. फिनलँड चे सैनिक काळ्याकुट्ट अंधारात दुश्मन सैन्याच्या दोन तुकड्यांच्या मधोमध जात आणि रशियन सैन्यावर उजव्या आणि डाव्या दोन्ही बाजूनी मशिनगन च्या सहाय्याने फयरींग करत आणि तिथून पळून येत. इकडे रशियन सैन्य फिनीश सैन्याने हमला केलाय असे समजून स्वतःच्याच सैन्याला मारत युध्द संपता संपता फिनलँड ने आपले ७० हजार सैनिक गमावले तर रशियन सैन्याने तब्बल ३ लाख २३ हजार सैनिक गमावले. ६ महिन्यानंतर शेवटी रशियाला माघार घ्यावी लागली आणि अशक्य असलेलं हे युध्द एका छोट्या देशाने जिंकले.

फिनलँड मध्ये एक संकल्पना आहे ज्याला सिसू असे म्हणतात. या संकल्पनेच्या बळावरच फिनीश सैन्य इतक्या बलाढ्य सैन्यासमोर पराजय निश्चित असताना सुध्दा न डगमगता लढत राहीले. सिसू या फिनीश शब्दाचा तसा शब्दशः अर्थ कोणत्याच भाषेमध्ये नाही. सिसू म्हणजे प्रत्येकाच्या आतमध्ये लपलेली एक अशी शक्ती किंवा एक अशी आंतरीक शक्ती आहे जी अतीशय कठीण काळात जेव्हा माणूस सतत अपयाशाला सामोरे जात असतो तेव्हा आपले अस्तित्व दाखवून लढण्याची क्षमता देते. फिनीश संस्कृतीप्रमाणे जे सिसूच्या मार्गाने चालतात ते आपल्या
मानसिक आणि शारिरीक शक्तीच्या सिमेपलीकडे जाऊ शकतात. सिसू म्हणजे जिंकणे, हरणे किंवा चॅलेंज पूर्ण करणे नाही तर या संकल्पनेचा अर्थ आहे कठीण काळात सुध्दा अ‍ॅक्शन घेणे, मोठ्या संकटासमोर हार न मानता आपल्या शक्तीला अजून बळ देऊन त्याच्याशी सामना करण्याची हिम्मत देणे असा आहे.

*खाली दिलेल्या ५ गोष्टी या संकल्पनेला ठळक करणार्‍या आहेत.*

१. तणावावर नियंत्रण ठेवा आणि भीतीला स्वतःवर हावी होऊ देवू नका.

कठिण काळात तणावावर नियंत्रण ठेवणे फार महत्वाचे आहे. कठीण काळात भीती आपली विचार करण्याची क्षमता कमजोर करण्याचे काम करते त्यामुळे निर्णय चुकतात आणि परिणामी अपयशाला सामोरे जावे लागते.अशा काळात भीतीवर नियंत्रण ठेवले तर शांतपणे विचार करून त्या परिस्थितीला तोंड देऊ शकतो.

२ चिकाटी

आजच्या जमान्यात चिकाटी दूर्मिळ होत चालली आहे, आपल्याला सगळ्या इन्स्टंट गोष्टीची इतकी सवय झालेय की आपल्याला सर्व गोष्टींचे रीझल्ट लगेच हवे असतात. आपण करत असलेल्या गोष्टींचे रिझल्ट लगेच मिळाले नाही तर आपण निराश होतो. या उलट सिसु मानत असलेल्या लोकांमध्ये चिकाटी असते, मनायोग्य रिझल्ट मिळेपर्यंत काम करत राहण्याची क्षमता त्यांच्यात असते.

३.प्रामाणिक रहा.

स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल आदर ठेवणे फिनीश लोकांसाठी महत्त्वाचे आहे. स्वत:शी आणि दुसर्‍यांच्या प्रति प्रामाणिक राहिल्यामुळे समाजात प्रेम आपुलकी वाढते आणि परिणामी कठीण काळात संघटीत होणे सोपे जाते.

४. लक्षात ठेवा.

छोट्या छोट्या अडचणींवर मात करायला शिका असे केल्याने मोठ्या अडचणींवर मात करण्याची क्षमता येईल. सिसू मानणारे लोक अडचणींपासून पळत नाहीत तर त्यांचा सामना करतात आणि नविन उपाय शोधून काढतात.

५. लवचिकता

लवचिकता म्हणजे अशी क्षमता जी आयुष्यात येणार्‍या वेगवेगळ्या बदलांना सामोरे जाऊन स्वतःला त्यांच्याप्रामाणे बदण्याचा प्रयत्न करते. सिसू मानणारे लोक बदलांना मान्य करुन त्याप्रमाणे स्वतःला बदलात प्रत्येक वेळी अडचणींतून स्वत:चंच पहिल्यापेक्षा स्ट्राँग व्यक्तिमत्व घडवतात.

================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
================

धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट इलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com