There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आजचं जग हे खोट आणि खोट बोलणार्यांनी भरलं आहे. अशावेळी आपणा सर्वानाच हे जाणून घ्यायच असतं की कोणीतरी खोटं बोलत आहे हे कसं ओळखावं. कारण शक्याता असते की आपण खोट बोलत नसताना सुध्दा आपण एखाद्याच्या खोट्यामध्ये अडकू शकतो. आपण परत असे खोट्यामध्ये फसू नये म्हणून या वरती खूप संशोधन झाले आहे, परंतु असं असताना सुध्दा खोट पकडणे अजून सुध्दा कठीण काम आहे.
पहीली गोष्ट जर आपण त्या व्यक्तीला ओळखत असू तर कदाचित त्या व्यक्तीचं खोटं पकडणं सोप होऊ शकत कारण आपल्याला त्या व्यक्तीचा स्वभाव आणि क्षमता माहीत असतात पण तेच जर आपल्यासाठी ती व्यक्ती अनोळखी असेल तर खोट पकडण फार कठीण होऊन बसतं. जर आपल्याला एखादी व्यक्ती खोट बोलत आहे हे शोधायच असेल तर आपल्याला त्या व्यक्तीबद्दल माहीती जाणून घेणं गरजेचे आहे. काही सवयी जसं जास्त बोलणे किंवा अडखळणे त्यांच्या स्वभावतच असू शकतं.
आपण जी लक्षण आज बघणार आहोत ते खोट्याचे शक्य निर्देशक आहेत. हा कोणताही निश्चित पुरावा नाही आहे. काही खोट बोलणार्या व्यक्ती त्यामध्ये इतक्या सराईत असू शकतात की या लक्षणांशिवाय सहज खोट बोलू शकतात. हे लक्षात घेऊन आपण या ही लक्षणे जाणून घेऊया.
१. असामान्य वर्तन
असामान्य वर्तन म्हणजेच वागण्या बोलण्यामध्ये बदल हे एखादी व्यक्ती खोटं बोलत असताना दिसणारे प्रमुख लक्षण आहे. एखाद्या व्यक्तीच्या नेहमीच्या वागण्यातील बदल शोधणे हे खोटे बोलणार्या व्यक्तीला पकडण्याची पहीली पायरी आहे. एखाद्या व्यक्तीला डोळ्यांमध्ये न बघता बोलण्याची सवय आहे आणि अचानक ती व्यक्ती एकटक डोळ्यात बघून प्रश्नांची उत्तरं देत असेल तर हा तर हा लाल दिवा आहे. अशा व्यक्ती उत्तर देताना थोडे थांबून बोलतात.या वेळेत त्यांचा मेंदू उत्तर बदलण्यासाठी वेळ घेत असतो. अशा व्यक्ती तुम्ही जास्त प्रश्न विचारलेत तर लगेच चिडू शकतात आणि लगेच शांत होतात किंवा आधी शांत असतात आणि अचानक चिडतात असे सुध्दा होऊ शकते.
२. शारीरिक हालचाल
खोटं बोलणारी व्यक्ती शक्यतो शरीरिराची हालचाल कमी करते. त्यांचा हाताच्या पायाच्या मोजक्याच हालचाली या त्यांच्या स्वतःच्या दिशेनेच असतात. खोट बोलणारी व्यक्ती शक्यतो डोळ्यांचा संपर्क टाळतात आणि वारंवार स्वतःच्या चेहर्याला, मानेला, तोंडाला स्पर्श करतात. ते त्यांचे नाक किंवा कनाच्या खालचा भाग हाताने घासतात किंवा खाजवतात. आणि महत्त्वाचं म्हणजे अशा व्यक्ती स्वत:च्या छातीजवळ किंवा हृदया जवळ हात लावत नाहीत्.सामान्यपणे अपराधी भावना असलेली व्यक्ती स्वतःला प्रश्नांनपासून दूर राहण्याचा प्रयत्न करते.
३. तोंडपाठ उत्तरे
जर तुम्ही एखाद्याला विचारले कि एक आठवडा आधी तो काय करत होता, तर तो माणूस याचं उत्तर देण्यासठी थोडा वेळ विचार करेल. पण जर तुम्हाला ते उत्तर लगेच आणि नियोजित मिळाले तर ते खोटं असण्याची शक्यता असते. आपण अजून एक टेक्निक वापरु शकतो ती म्हणजे त्यांना उत्तर उलट क्रमाने द्यायला लावणे. अशा परिस्थितीत खोटं बोलणार्या व्यक्तीला घटना योग्य क्रनाने सांगणे जमनार नही.
४. वाक्यातील विराम
जे व्यक्ती खोट बोलतात किंवा अशी परिस्थिती जीथे खोटं बोलावं लागत ती त्या व्यक्तीसाठी तणावपूर्ण असते. जर तुम्ही एखाद्याला प्रश्न विचारत असाल त्यानवेळी त्या व्यक्तीच्या उत्तराच्या मध्येच तीला थांबवा आणि दूसरा प्रश्न विचारा.असे बोलताना मध्येच थांबवणे खुप जणांना बोलताना अस्वस्थ करते, जास्त करुन अशा माणसांना ज्यांना ते खोटं बोलून लगेच यातून बाहेर पडायचं असतं. खोट बोलणार्या व्यक्तीला असं मधेच थाबवून दूसरच काहीतरी विचारणे त्रासदायक वाटू शकतं. असे करताना आपण अगोदर सांगितल्या प्रमाणे त्यांच्या हालचालीत तुम्हाला बदल जाणवतील.
५. विषय बदलणे
चांगली गोष्ट म्हणजे खोटं बोलणारी व्यक्ती खोटं संपल्यानंतर पूर्ववत होऊ शकते. जेव्हा त्या व्यक्तीला जाणवते की संवादाचा विषय बदलला आहे आणि आता त्यांना खोट बोलावं नाही लागणार तेव्हा ते आतमधून सुटकेचा निश्वास सोडतात. विषय बदलल्यामुळे खोट्यामुळे चिंतेत असलेली व्यक्ती त्यातून सुटका झाल्यामुळे थोडी शिथिल झालेली आणि चिडलेली व्यक्ती तुम्हाला हसताना जाणवेल. ही टेक्निक तुम्हाला खोटं बोलणार्या व्यक्तीच्या स्वभावातील बदल आभ्यसण्यासाठी मदत करु शकते.
६. घाम आणि कोरडेपणा
ऑटोमिक नरवस सिस्टीम च्या बदलामुळे खोट बोलणार्या व्यक्तीच्या चेहर्यावर म्हणजेच डोकं,ओठाच्या वरचा भाग, हनुवटीच्या आजूबाजूला घाम येतो आणि तोंड व डोळे कोरडे पडतात. अशा व्यक्ती कदाचित तुम्हाला डोळ्यांच्या पापण्याची हालचाल जास्त करताना दिसतील.
७. बोलताना चुकणे
आपल्यातले खुप जण नैसर्गिकरित्या खोट बोलण्यासाठी सराईत नसतात. त्यामूळे अशा व्यक्ती बोलताना त्या ओघात चूकून खरं बोलतात. उदा. " मला कामावरुन काढून टाकले, नाही म्हणजे मीच ते काम सोडले" किंवा मी बाहेर जेवायला गेलो होतो, नाही खरतर मी खुप वेळ काम करत होतो." अशा वेळी तुमच्या समोरची व्यक्ती खोट बोलत असावी असे होऊ शकते.
८. जास्त प्रश्न विचारणे.
कोणीतरी खोटं बोलत आहे हे पकडण्याचा हा सर्वात वेगवान मार्ग आहे. त्या व्यक्तीला जास्तीत जास्त प्रश्न विचारा. कारण, तज्ञांच्या संशोधनानुसार, "जित्के जास्त प्रश्न तुम्ही खोटं बोलणार्या व्यक्तीला विचाराल, खोटं टीकवणं तिच्यासाठी तितकच कठीण होईल. त्यामुळे आपण लगेच खोट बोलणार्या व्यक्तीला पकडू शकतो.
९. जास्त माहीती पुरवणे.
जेव्हा एखादी व्यक्ती तुम्हाला प्रमाणापेक्षा जास्त माहीती देते, जी तुम्ही विचारलेली सुध्दा नसते आणि ना तुमच्या काही फायद्याची असते. अशा वेळी जास्त शक्यता असते की ती व्यक्ती खरं बोलत नाही आहे. " खोट बोलणार्या व्यक्ती खुपवेळा खुप जास्त बोलतात, कारन त्यांना अस वाटत असत की जास्त आणि खुलून बोलल्याने समोरची व्यक्ती त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवेल.
१०. स्वतःबद्दल बोलणे टाळणे.
काही वेळा खोट बोलणार्या व्यक्ती "मी" या शब्दाचा वापर करणे टाळतात. स्वतबद्दल तिसर्या व्यक्तीच्या बद्दल बोलल्याप्रमाणे बोलणे किंवा उत्तरं अधूरी देणे हे सर्व स्वतःला त्या खोट्यापासून दूर करण्याचे मानसिक प्रयत्न असतात. स्वतःबद्दल बोलण्यापेक्षा सामन्यपणे बोलल्याने त्यांना कदाचित खोट्या पासून दूर राहील्यासारखे वाटते.
वरती सांगितलेल्या लक्षणांपैकी एखादं लक्षण एखाद्याच्या स्वभावतच असू शकतं त्यामुळे ती व्यक्ती खोट बोलत आहे असा त्याच अर्थ धरु नये. लक्षात ठेवा एखाद्याच्या स्वभावातच या गोष्टी नाहीत आणि अचानक तुम्हाला त्यांच्या स्वभावात फरक जाणवला तर तीथे खोटे असल्याची शक्यता असते. त्यामुळे त्यांच्या नेहेमीच्या स्वभावाबरोबर या यादीतील स्वभावांशी तुलना करा.
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp
आणि व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com