There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मुंबईत राहणारे वाघमारे काका (वय ७०) हे नेटभेटचे एक जुने विद्यार्थी. काही महिन्यांपूर्वी त्यांचा मला मेसेज आला. बँकेत FD रिन्यू करायला गेले असता, त्यांना एक 'गुंतवणूक प्लॅन' घ्यायला सांगितला गेला. ते तयारही झाले होते, पण त्यांनी एकदा मला विचारले. मी खोलात जाऊन तपासले तेव्हा धक्काच बसला! त्यांना म्युच्युअल फंड सांगून ULIP पॉलिसी विकण्याचा प्रयत्न झाला होता.
तुम्हीच विचार करा, जो ७० वर्षांचा माणूस फक्त FD रिन्यू करायला गेला आहे, त्याला २० वर्षे प्रीमियम भरण्याची पॉलिसी विकण्यामागे काय तर्क असू शकतो?
दुर्दैवाने, आज बँकेच्या शाखा अशा धोकादायक जागा बनल्या आहेत, जिथे ज्येष्ठ आणि असुरक्षित नागरिकांना लक्ष्य करून त्यांना अनावश्यक आणि महागड्या विमा पॉलिसी विकल्या जातात.
कर्मचारी आणि बँकेला मिळणाऱ्या मोठ्या कमिशनमुळे ते विशिष्ट उत्पादने विकायला प्रोत्साहन देतात. नुकतेच अर्थ मंत्रालयाने बँकांना विमा उत्पादनांच्या विक्रीवरील 'सेल्स इन्सेन्टिव्ह' बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. हा निर्णय स्वागतार्ह असला तरी, त्याला खूप उशीर झाला आणि त्याची अंमलबजावणी कशी होईल याबाबत शंकाच आहे!
RBI चे डेप्युटी गव्हर्नर सुद्धा मान्य करतात की ही समस्या गंभीर आहे, पण ते अजूनही 'पुनर्विचाराची गरज आहे' एवढेच म्हणत आहेत.
आकडेवारी तर आणखी धक्कादायक आहे: 📊
🏦 देशातील टॉप १५ बँकांनी ग्राहकांना विमा पॉलिसी विकून तब्बल २१,७७३ कोटी रुपये कमिशनच्या स्वरूपात कमावले आहेत. ही रक्कम ग्राहकांच्या खिशातून गेली आहे.
📊 आर्थिक वर्ष २०२४ मध्ये, काही बँकांच्या एकूण उत्पन्नापैकी तब्बल एक चतुर्थांश (1/4) उत्पन्न हे केवळ कमिशनमधून आले आहे.
📉 विकल्या गेलेल्यापैकी ४९% जीवन विमा पॉलिसी ५ वर्षांच्या आतच बंद पडतात. याचा अर्थ, लोकांना चुकीची उत्पादने विकली जात आहेत.
📝 २०२४ या एका वर्षात गैर-विक्रीबद्दल (misselling) बँकांविरोधात RBI कडे १२००० लेखी तक्रारी आल्या.
👨🌾 ग्रामीण भागातील ६२% ग्राहकांना बँकेकडून कोणतीतरी विमा पॉलिसी विकण्यात आलेली आहे.
बरीचशी विमा उत्पादने एका सापळ्यासारखी (trap) बनवली जातात. हा सापळा (Trap) कसा काम करतो?
- बँकेचे प्रतिनिधी अनेकदा युलिप (ULIPs) मधील विमा घटकाचा भाग वगळतात. ते युलिपला केवळ म्युच्युअल फंडांप्रमाणे बाजाराशी निगडीत गुंतवणूक उत्पादन म्हणून दाखवतात.
- ग्राहक बँकेच्या "रिलेशनशिप मॅनेजर" यांच्या सल्ल्यावर अधिक विश्वास ठेवतात आणि फसवणुकीला बळी पडण्याची शक्यता जास्त असते.
- आणि लवकर पॉलिसी बंद केल्यास तुमचे गुंतवलेले पैसेही परत मिळत नाहीत. यामुळे चूक कळूनही लोकांना किमान ५ वर्षे पॉलिसी चालवावी लागते.
- एजंटला पहिल्या वर्षी प्रचंड कमिशन मिळते. त्यामुळे तो बऱ्याचदा ग्राहकाला जुनी पॉलिसी बंद करून नवीन घ्यायला सांगतो, ज्यात एजंटचा फायदा पण ग्राहकाचे नुकसान होते.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/DC3q29uZWOxLpUJyHhjAVs
येथे क्लिक करा.
================
ग्राहकांनी काय काळजी घ्यावी? (हे नक्की वाचा) 👇
✅ फरक समजून घ्या: ULIP आणि म्युच्युअल फंड यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. स्वतः अभ्यास करा.
✅ चौकस प्रश्न विचारा: कमिशन, सर्व प्रकारचे चार्जेस, लॉक-इन कालावधी आणि विमा किती आहे, हे स्पष्ट विचारा.
✅ कागदपत्रे वाचा: नियम व अटी वाचल्याशिवाय कुठेही सही करू नका.
✅ दबावाला बळी पडू नका: निर्णय घेण्यासाठी वेळ घ्या. कोणी घाई करत असेल तर तिथेच थांबा.
या फसवणुकीचे बळी दुर्दैवाने ज्येष्ठ नागरिक, ग्रामीण भागातील लोक आणि आर्थिक ज्ञानाचा अभाव असलेले लोक ठरतात, जे आपल्या बँकेवर आंधळा विश्वास ठेवतात.
त्यामुळे लक्षात ठेवा, जेव्हा तुम्ही बँकेत जाता, तेव्हा तुम्ही शार्क माशांनी भरलेल्या पाण्यात उतरत असता. या शार्कबँक पासून सावध रहा! 🦈
हा मेसेज आपल्या सर्व मित्र-परिवारासोबत, विशेषतः ज्येष्ठ नागरिकांसोबत नक्की शेअर करा. जनजागृती करणे हे आपले कर्तव्य आहे. तुमचाही असा अनुभव असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा.
सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया!