There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
दक्षिण कोरिया ने नुकताच रोबोट्सला पादचारी म्हणून रस्त्यावर चालण्याची परवानगी देणारे कायदे मंजूर केले आहेत.
- ५०० किलो पर्यंत वजन असलेले रोबोट्स रस्त्यांवर चालू शकतात.
- १५ किमी/तास वेगाने चालण्याची परवानगी.
- सुरक्षिततेसाठी प्रमाणित केलेले रोबोट्सच रस्त्यांवर चालू शकतात.
- प्रत्येक रोबोसाठी विमा घेणे आवश्यक आहे.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK येथे क्लिक करा.
================
पण दक्षिण कोरिया हा पहिला देश नाही. यू.एस.ए., जपान, फ्रान्स, जर्मनी, एस्टोनिया, ऑस्ट्रिया, आणि यू.के. ने आधीच त्यांच्या रस्त्यांवर रोबोट्सना प्रवेश दिला आहे.
या नव्या बदलाची कल्पना करून बघा. फार पूर्वी जेव्हा नुकत्याच गाड्या आल्या असतील तेव्हा अगदी अशीच परिसथिती असेल. शेकडो घोडागाड्यांमध्ये एखादी मोटार दिसत असेल. रस्ता पहिला घोडागाडीचा की मोटारीचा असा वादही झाला असेल. गाड्यांसाठीचे नियम आले असतील. हळूहळू घोडागाड्या पूर्णपणे गायब होऊन गाड्यांचे संपूर्ण साम्राज्य तयार झाले असेल...आणि आसपास चालणाऱ्या मोटारींचे काहीही कौतुक न वाटणारी पिढी तयार झाली असेल.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/CwbadTDjQwwCuTiWRTCNWK येथे क्लिक करा.
================
रोबोट्सच्या बाबतीतही हे लवकरच सामान्य होईल.
रोबोट्स किरकोळ सामान आणतील, वसाहतीत गस्त घालतील, रस्ते स्वच्छ करतील…. ट्राफिक सांभाळतील, सुरक्षारक्षक बनतील. आपल्या आजूबाजूला फिरकणारे रोबोट्स सवयीचे होतील. जग अधिक स्मार्ट होत जाईल... आणि थोडं थोडं थंडही.
एक दिवस, तुमच्या बाजूने झपाझप पावलं टाकत एक रोबोट निघून जाईल आणि लक्षातही येणार नाही !
भविष्याचा वर्तमानकाळ चालू आहे !!
सलिल सुधाकर चौधरी