कोणी आपल्याला "काय" बोललंय यापेक्षा

कोणी आपल्याला "काय" बोललंय यापेक्षा
"कोणी" आपल्याला काय बोललंय याला लोक जास्त महत्व देतात.

कोणी आपल्याला "का" बोललंय यापेक्षा
कोणी आपल्याला "कसं" बोललंय याला लोक जास्त महत्व देतात.

कोणी आपल्याला "किती" बोललंय यापेक्षा
कोणी आपल्याला "कधी" बोललंय याला लोक जास्त महत्व देतात.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/F2Kfn2dccp9K3QMzY7FbfX
येथे क्लिक करा.
================

म्हणून कोणालाही काहीही बोलताना -
✅ ते बोलण्याइतका अधिकार आपण मिळवला आहे का?
✅ जे बोलतोय ते बोलण्याची पद्धत, आवाज आणि हावभाव योग्य आहेत का?
✅ आणि ते बोलण्याची हीच योग्य वेळ आहे का?
या गोष्टीवर नीट विचार करा.

अन्यथा तुम्ही कितीही बरोबर बोलत असलात तरी लोक चुकीचेच अर्थ काढणार. आणि ती व्यक्ती सांगूनही माझं ऐकत नाही असा चुकीचा अर्थ तुम्ही काढणार. यालाच म्हणतात Miscommunication !

सलिल सुधाकर चौधरी

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !