राजकारण आणि गुंतवणूक!


शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने कधी न कधी “कित्येक पटीने वाढणाऱ्या मल्टिबॅगर” चा शोध घेतला असेल. एकच स्टॉक असा निवडायचा जो सुसाट वेगाने वाढेल आणि मला करोडपती बनवेल असा विचार प्रत्येक गुंतवणूकदार करतोच. आणि याचा परिणाम काय होतो ते आपल्या सगळ्यांना माहीतच आहे…..साधारण ५% गुंतवणूकदारांनाच असा “मल्टिबॅगर” सापडतो आणि त्यातही १% गुणतवणूकदारच अशा स्टॉक मध्ये फायदा मिळेपर्यंत थांबतात. उर्वरित ९९% आपले पैसे गमावतात.

राजकारणाच्या उदाहरणाने बघायचं झालं तर नरेंद्र मोदी असा मल्टिबॅगर स्टॉक आहे जो सतत आणि कित्येक पटीने वाढलाय. तीन वेळा मुख्यमंत्री आणि तीन वेळा पंतप्रधान ( Almost !) असा मोठा पल्ला सातत्याने गाठणे सोपे नाही. पण २० वर्षांपूर्वी कोणाला याचा अंदाज बांधता आला असता ? मोजक्या राजकारण अभ्यासकांनाच ( १% लोकांनाच) हा अंदाज बरोबर बांधता आला असेल.

राहुल गांधीनी बरोबर २० वर्षांपूर्वी २००४ मध्ये राजकारणात प्रवेश केला. तेव्हा त्यांच्या “आडनावामुळे” बऱ्याच जणांना वाटले असेल की हा स्टॉक सहज मल्टिबॅगर होऊ शकेल. पण प्रत्यक्षात या स्टॉकची growth (कालच्या निकालापर्यंत तरी!) below average च राहिली आहे.

अगदी बेसिक स्टॅटिस्टिक्स अभ्यासामध्ये “Bell Curve” शिकविला जातो. तो सांगतो की कोणत्याही ग्रुपमध्ये / डेटामध्ये २०% सर्वोत्तम असतात, २०% सर्वात खाली असतात आणि मध्ये ६०% सरासरीच्या आसपास असतात. जेव्हा सरासरीपेक्षा थोडा अधिक असा परफॉर्मन्स असतो तेव्हा तो कुणाच्याही नजरेत भरत नाही. ठळक उठून दिसावं असं त्याकडे काही नसतं.

top २०% मध्ये येण्याच्या प्रयत्नात बरेच राजकारणी/ स्टॉकस शून्य होतात. त्यांची कारकीर्द वेळेच्या खूप आधी संपते. जग त्यांना लवकरच विसरूनही जाते.

जे Lower २०% असतात. ते असेच संपतात आणि त्यापैकी अगदी थोडे थोडके लोक मोठी भरारी घेऊ शकतात. या दोन्ही टोकांना failure rate खूप जास्त असतो.

२००४ साली bell curve च्या मध्यभागी असणारे (little more than average) आणि तिथे टिकून राहणारी नेते मंडळी कोण असतील बरे ? कालच्या निकालाकडे पहिले तर लक्षात येईल. २००४ साली हे स्टॉक्स म्हणून शरद पवार, नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू, ममता बॅनर्जी ही नावे प्रकर्षाने लक्ष्यात येतात. यां स्टॉक्सनी अनेक market cycles बघितले, चढ उतार बघितले, स्पर्धा बघितली , या कंपन्यांमध्ये अनेक मॅनेजर्स आले आणि सोडून गेले…आणि तरीही हे चारही स्टॉक्स दीर्घकाळ चांगला परतावा देऊ शकले.

एक गुंतवणूकदार म्हणून २००४ साली हे चारही stocks fundamentally चांगले वाटत होते, दीर्घकाळ टिकतील असे वाटत होते आणि कदाचित मल्टिबॅगर होतील असेही वाटत होते. परंतु त्यांची कारकीर्द सोपी नव्हती.

शरद पवार, नितीश कुमार, ममता बॅनर्जी आणि चंद्रबाबू नायडू हे त्यांच्या राजकीय जीवनातल्या तग धरून राहण्याच्या आणि बदलत्या परिस्थितींशी जुळवून घेण्याच्या क्षमतेमुळे ओळखले जातात. त्यांनी राजकीय उलथापालथींच्या काळातही आपली स्थिरता आणि महत्व टिकवून ठेवले आहे. त्यांनी अनेक वेळा बाजू बदलली आहे, स्वतः नवी समीकरणे मांडली आहेत आणि इतरांच्या नव्या समीकरणांशी जुळवूनही घेतले आहे. हे नेते आपल्याला शिकवतात की दीर्घकालीन यशासाठी टिकून राहणे सर्वाधिक महत्त्वाचे आहे.

वॉरेन बफे यांचे “दोन नियम” प्रसिद्ध आहेतच. "नियम क्र. १: पैसे गमावू नका. नियम क्र. २: नियम क्र. १ विसरू नका,". गुंतवणुकीतील सुरक्षितता आणि भांडवलाचे संरक्षण हे सर्वात महत्त्वाचे आहे. बफे यांचे तत्त्वज्ञान असे आहे की बाजाराच्या उतार-चढावांमध्ये टिकून राहणे आणि आपले भांडवल सुरक्षित ठेवणे हे संपत्ती निर्माण करण्यासाठी मूलभूत आहे.

ब्रायन जॉन्सन यांचं Dont Die नावाचं एक पुस्तक आहे. त्यात सोपी गोष्ट सांगितली आहे की आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर पाहिलं “आयुष्य” टिकवलं पाहिजे. (सर सलामत तो पगडी पचास !)
============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live

93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा -
https://salil.pro/MBA
============================

समजा तुम्हाला तुमच्या जन्माच्यावेळी खालीलपैकी एक पर्याय निवडायला सांगितला तर तुम्ही कोणता निवडाल ?

१. श्रीमंतीतील २५ वर्षे आयुष्य
२. मध्यमवर्गीय ६० वर्षे आयुष्य
३. अत्यंत गरीबीतील १०० वर्षे आयुष्य

मला खात्री आहे Bell Curve नुसार तुमच्यापैकी ६०% लोक दुसरा पर्याय निवडतील. गुंतवणुकीत पण हेच निवडा. आयुष्य ही मुद्दल आहे आणि श्रीमंती हा परतावा. जास्त श्रीमंतीच्या नादात मुद्दल गमावू नका. दीर्घकाळ गेम मध्ये राहाल तर जिंकण्याच्या अनेक संधी येतील…हे आपण कालच्या निकालात पहिले आहेच !

राजकारण असो किंवा गुंतवणूक, या दोनच गोष्टी महत्वाच्या आहेत. सरासरीपेक्षा चांगला आणि दीर्घकाळ टिकून राहणारा परतावा.

धोनी म्हणतो तसा “खेळ शेवटच्या ओव्हरपर्यंत लांबवा…जिंकण्याचे चान्सेस खूप वाढतात !”

Happy Investing !!

सलिल सुधाकर चौधरी 
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy