वैयक्तिक डेटा आणि AI



प्रत्येक मोठी तंत्रज्ञान कंपनी AI क्षेत्रात पाय रोवण्याच्या स्पर्धेत आहे, जनरेटिव्ह AI साठी मॉडेल्सना ट्रेनिंग करणे आवश्यक आहे, जेवढा जास्त डेटा या AI मॉडेल्सना शिकविण्यासाठी पुरवला जाईल तेवढा चांगला. आणि हा डेटा येतो कुठून ? तर तुमच्या माझ्यासारख्या असंख्य इंटरनेट वापरकर्त्यानीच तयार केलेला डेटा AI मॉडेल्सना पुरविला जातो आहे.

आपला सर्वाधिक खाजगी डेटा Meta म्हणजेच फेसबुककडे आहे. आता, फेसबुक आपल्या पोस्ट्स आणि फोटो वापरून त्यांचे AI मॉडेल ट्रेन करत आहे. तसं म्हंटल तर यात आश्चर्यकारक काहीच नाही. आपल्या खाजगी डेटाचा स्वसंपत्ती म्हणून वापर करण्यात मेटा आधीच कुप्रसिद्ध आहे.

खरी आश्चर्याची गोष्ट वेगळीच आहे. लहानसहान कारणांसाठी “community guidelines”च्या नावाखाली आपले अकाउंट्स/पेजेस ब्लॉक करणाऱ्या फेसबुकने स्वतः मात्र मोठ्या चलाखीने वापरकर्त्यांना Opt out करण्याची सुविधाच दिली नाहीये. opt out म्हणजे माझा डेटा तुझ्या AI च्या ट्रेनिंग साठी वापरू नको असे फेसबुकला सांगणे !

युरोपमध्ये GDPR हा कडक कायदा अस्तित्वात असल्यामुळे केवळ युरोपीय वापरकर्त्यांनाच यातून सुटका मिळू शकते. इतर देशांतील वापरकर्त्यांना तर फेसबुक विचारतही नाही ! आणि अगदी युरोपीय युझर्ससाठी सुद्धा opt out म्हणजे सेटिंग्ज मध्ये जाऊन एखादा चेकबॉक्स सिलेक्ट केला की झालं एवढी साधी ही प्रक्रिया नाही.
============================
MBA चे फंडे शिका सोप्या मराठीतून ! विनामूल्य!
संपूर्ण 18 महिने विनामूल्य ऑनलाईन क्लास
आजच सहभागी व्हा - Netbhet Marathi LIFE MBA 2.0
Free | Online | Marathi | Live

93217 13201 ला MBA असा व्हाट्सअप्प मेसेज पाठवा किंवा खालील लिंक वर नोंदणी करा -
https://salil.pro/MBA
============================

Meta ने ही प्रक्रिया मुद्दामहून कठीण बनवली आहे. युरोपीय वापरकर्त्यांना मेटा कडून एक ईमेल येतो की आम्ही तुमचा डेटा वापरणार आहोत. त्यात भरपूर मोठ्या मजकुरामध्ये लपलेली एक लिंक आहे. त्या लिंकवर क्लिक करून फॉर्म भरायचा, आपला डेटा का वापरला जाऊ नये याचे स्पष्टीकरण द्यायचे , नंतर त्यात otp भरायचा. त्यानंतर फेसबुक या विनंतीचा (!) विचार करणार आणि नंतर काही दिवसांनी opt out केले जाईल. अशी भलीमोठी गुंतागुंतीची प्रक्रिया आहे !

युरोपमध्ये नुकताच AI ACT हा AI विषयक कायदा पास झाला. जगातील हा पहिलाच सर्वसमावेशक आणि व्यापक असा AI कायदा आहे. याचा लाभ युरोपातील नागरिकांना मिळतो आहे. इतर देशांना अजून याचं गांभीर्य देखील तितकंसं समजलेलं नाही. पूर्वी चित्रपटात स्मगलिंग च्या धंद्यातील खलनायक म्हणायचे…”यहा आदमी अपनी मर्जीसे आता है, लेकिन अपनी मर्जी से जा नाही सकता !” . आपण वापरत असलेल्या इंटरनेट सेवांचही काहीसं तसंच आहे !!

# Netbhet AI Library

AI च्या जगात आत्मविश्वासाने प्रगती करण्यासाठी तुम्हाला तयार करणारा पहिला आणि एकमेव मराठी स्रोत !

Weekly Updates | Training Videos | New Tools


नेटभेट प्रस्तुत ही AI Library सर्व प्रोफेशनल्स, व्यावसायिक, विद्यार्थी आणि नवतंत्रज्ञान शिकण्यासाठी उत्साही असलेल्या सर्वांसाठी डिझाइन केली आहे. ज्यांना आर्टिफिशिअल इंटेलिजन्स (कृत्रिम बुद्धिमत्ता) या क्षेत्रात आघाडीवर राहायचे आहे अशा सर्वांसाठी ही AI Library आहे.

आपल्याला यामध्ये AI संबंधित ज्ञान आणि संसाधनांचा खजिना मिळेल, AI मधील जागतिक घडामोडी काळातील, नवीन AI टूल्स ची माहिती मिळेल आणि खूप सारे ट्रेनिंग व्हिडिओ मिळतील.

Netbhet AI Library मध्ये दर आठवड्याला नवीन अपडेटस केले जातील. आम्ही दररोज AI जगतामध्ये घडणाऱ्या नवनवीन घडामोडिंचा अभ्यास करून त्यातील महत्वाची माहिती सोप्या स्वरूपात, दर आठवड्याला आणि मराठी भाषेतून आपल्यासमोर सादर करत आहोत.

लिंक कमेंट्समध्ये !

सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स

मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !

Launch your GraphyLaunch your Graphy
100K+ creators trust Graphy to teach online
𝕏
Netbhet eLearning Solutions LLP 2024 Privacy policy Terms of use Contact us Refund policy