There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
मित्रानो, ज्याला आपण जगातील सर्वात वेगवान धावपटू म्हणून ओळखतो अशा युसेन बोल्टची ही गोष्ट. जमेका च्या राष्ट्रीय स्पर्धेत योहान ब्लेकने त्याला हरवले होते, 100 मीटरच्याच नव्हे तर 200 मीटर धावण्याच्या शर्यतीतही..! 2012 च्या लंडन ऑलिम्पिक्सपूर्वीची ही घटना.
कोणालाही विचारा .. आणि तुम्हाला कळेल की उसेन बोल्ट हा उपजत प्रतिभेचे एक उत्तम उदाहरण होता. तो केवळ जिंकायचाच नाही तर तो त्याच्या प्रतिस्पर्ध्यांचा दणदणीत पराभव करून जिंकायचा. एवढी प्रचंड गुणवत्ता आणि गुणवत्तेचा वारसाच त्याच्यात होता. पण कधीकधी केवळ गुणवत्ता असून पुरेसं नसतं.
बोल्ट नॅशनल्स हरला आणि त्याने लंडन ऑलिंपिक्सची कसून तयारी सुरू केली. तो इतकी प्रचंड मेहनत करत होता की दरदिवशी त्याला त्याच्या सरावादरम्यान अक्षरशः ओकाऱ्यांनी हैराण व्हायला होई. त्याने त्याचा पराभव फारच मनावर घेतला होता. तो कोपऱ्यात बसून केवळ हळहळत बसला नाही तर ट्रॅकवर सरावासाठी प्रचंड मेहनत घ्यायला लागला. असा सराव करू लागला की कोणीही करूच शकणार नाही. परिणामी, काही महिन्यांनी जमेका च्या टीमसाठी त्याने लंडन ऑलिंपिक्सदरम्यान तब्बल तीन सुवर्णपदकं पटकावली. आणि जगज्जेता झाला.
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी 908 220 5254 येथे SUBSCRIBE असे लिहून व्हॉट्सअॅप मेसेज करा किंवा https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
या यशाबद्दल विचारलं असता बोल्ट म्हणाला, 'मी तुम्हाला यशस्वी होण्याचं कोणतंही सूत्र देणार नाही, तर केवळ एक शब्द देतो.. 'आऊटवर्क'. ज्या गोष्टींसाठी तुम्ही पॅशनेट आहात त्या गोष्टी मिळवण्यासाठी एखाद्या झपाटलेल्या व्यक्तीप्रमाणे तुम्ही काम करत रहा. केवळ स्वप्न बघू नका आणि केवळ इच्छा व्यक्त करू नका तर ती स्वप्न, त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी झपाटल्यागत काम करत रहा ! कोणीही करणार नाही एवढी मेहनत करा, वेगाने पुढे जात रहा किंवा दीर्घकाळपर्यंत मेहनत करत रहा.. आऊटवर्क'...!
मित्रांनो जगात अशी अनेक उदाहरणे दिसतील. जिथे नैसर्गिक गुणवत्ता असलेले लोक हे कालांतराने जिद्दीने आणि ध्यासाने अथक परिश्रम करणाऱ्या लोकांपेक्षा मागे पडतात. म्हणूनच हा शब्द महत्वाचा ठरतो....Outwork !!
आपल्या अपयशावद्दल चिंतीत असाल तर हा प्रश्न स्वतःलाच विचारा...की तुम्ही तुमच्या प्रतिस्पर्ध्याना आणि स्वतःलाच दररोज outwork करताय का ?
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com