There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
आपल्या प्रत्येकाला समान संधी असते. संधी पुढे जाण्याची, संधी प्रगती करण्याची, संधी कालपेक्षा आज काहीतरी चांगलं करण्याची !
रोज नवं काहीतरी शिकण्याची ! रोज जगाला काहीतरी देण्याची, रोज आपल्या अस्तित्वाचा प्रत्येक दिवस या जगात काहीतरी अनमोल देता येण्याची !
आपल्याला जे जे हवे आहे ते ते मिळवण्याची संधी आपल्याला मिळते. त्यासाठी फक्त आणि फक्त आपणच आपल्या आयुष्याची संपूर्ण जबाबदारी घेणं आवश्यक आहे.
अगदी शून्यापासून सुरुवात करून अवकाशाला गवसणी घालणाऱ्या लाखो सक्सेस स्टोरी आपण बघतोय. या सगळ्यांनी आलेल्या संधीचा पुरेपूर फायदा घेतला आणि आपला आयुष्य आपणच घडवण्याची जबाबदारी स्वीकारली.
मित्रांनो संधी दार ठोठावत आहे अशी आपल्याकडे म्हण आहे पण माझ्या मते ती चुकीची आहे संधी प्रत्येक वेळेला दार ठोठावत नाही तर आपल्याला संधी ओळखून तिला खेचून आणावे लागते, त्यासाठी तयार राहावे लागते.
आणि मुख्य म्हणजे संधी मिळेल यासाठी आशावादी राहावे लागते. जर तुम्हाला वाटलं या जगात सगळं काही तुमच्या विरोधातच काम करतय तर तसंच होईल. कारण तुम्ही स्वतःच निगेटिव्ह एनर्जी तुमच्याकडे ओढत आहात. तुम्ही जी एनर्जी जगाला देता तीच एनर्जी पुन्हा तुमच्याकडे आकृष्ट होते हे लक्षात ठेवा.
याउलट जर तुम्हाला वाटलं की या जगामध्ये अनेक संधी आहेत,अनेक चमत्कार घडू शकतात तर मित्रांनो तसंच होणार.
आणि हे चमत्कार घडवण्यासाठी आपल्याला सतत प्रयत्न करत राहणे, जे आपल्याला जमतय त्यावर काम करणे आणि सतत नवीन गोष्टी शिकत राहणे हे गरजेचे आहे ! ही आहे तयारी जिंकण्याची !
================
असे आणखी माहितीपूर्ण लेख वाचण्यासाठी आणि मराठीतून उद्योग-व्यवसाय शिकण्यासाठी आजच आमचे मोबाईल अँप डाऊनलोड करा - bit.ly/NetbhetApp आणि व्हॉट्सअॅप वर आमचा ग्रुप जॉइन करण्यासाठी https://salil.pro/WAG येथे क्लिक करा.
================
धन्यवाद,
टीम नेटभेट
नेटभेट ईलर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
learn.netbhet.com