सौर ऊर्जा या विषयावर ऑनलाइन वेबिनार

एनर्जी स्वराज फाउंडेशन , या सौर ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य संस्थे मार्फत सौर ऊर्जा या विषयावर ऑनलाइन वेबिनार आयोजित करण्यात आला आहे. नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स या कार्यक्रमामध्ये पार्टनर म्हणून काम पाहत आहे.

या वेबिनारच्या माध्यमातून ऊर्जा, पर्यावरण आणि टिकाव याबद्दल सखोल माहीती आणि अनुभव असणार्‍या काही प्रमुख व्यक्तिमत्वांकडून आपण कोणत्या दिशेने यापुढे जायला हवे याबद्दल मार्गदर्शन करुन घेणार आहोत. हा ३ तासांचा लाखमोलाचे मार्गदर्शन करणारा वेबिनार सर्व वयोगटातील व्यक्तींसाठी खुला ठेवण्यात आला आहे. या मोलाची माहीती देणार्‍या वेबिनार मध्ये आपला सहभाग दर्शवून आपले आयुष्य आणि दिशा बदला.

वेबिनार मध्ये पद्मविभूषण श्रीयुत अनिल काकोडकर , पद्मभूषण श्रीमती इला गांधी ( महात्मा गांधीजी यांची नात), डॉक्टर चेतन सोळंकी (IIT MUMBAI) , आणि गुडविल ॲम्बेसिडर म्हणून अभिनेत्री दिया मिर्झा सहभागी होणार आहेत.

- कोणत्याही वयोगटातील व्यक्ती या कार्यशाळेमध्ये सहभागी होऊ शकतात.
- सौर ऊर्जा, वातावरणातील बदल या क्षेत्रांमध्ये करिअर करू इच्छिणार्‍या व्यक्तींसाठी अतिशय उपयुक्त
- या कार्यक्रमांमध्ये काय शिकायला मिळेल -
1. विज बिल शून्य करण्याची प्रक्रिया
2.सौर ऊर्जा वापरण्याचे नियम
3.एका भाग्यवान विजेत्याला सोलार होम सिस्टम जिंकता येईल
4.त्याचप्रमाणे सोलार दिवा पेंटिंग स्पर्धेमध्ये 50 हजार रुपये इतकी बक्षिसे जिंकण्याची संधी
5.सहभागाचे ई-प्रमाणपत्र


कार्यक्रमाची फी - रुपये 50 फक्त
कार्यक्रमाची वेळ- 2 ऑक्टोबर 2020, सकाळी 10:00 ते दुपारी 1:00
रजिस्ट्रेशन ची शेवटची तारीख - 28 सप्टेंबर 2020
( वेबिनार इंग्रजी मध्ये असेल)

खालील लिंक वर क्लिक करून वेबिनार मध्ये रजिस्ट्रेशन करा - https://salil.pro/SSA2020

धन्यवाद,
टीम नेटभेट

नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स