There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
🔹 Zoom AI वाढवणार आपली कार्यक्षमता
Zoom त्यांच्या AI assistant ची क्षमता वाढवत आहे जेणेकरून वापरकर्ते अधिक productive बनू शकतील. Zoom AI Companion लवकरच आपोआप पुढील मीटिंग schedule करू शकेल, मीटिंग नोट्समधून documents तयार करू शकेल, आणि व्हिडिओ क्लिप्स सुद्धा बनवू शकेल.
Zoom "Custom AI Companion" नावाचे $12 प्रति महिना add-on सुद्धा लाँच करत आहे ज्यामुळे वापरकर्ते स्वतःचे personalized AI avatars तयार करू शकतील. पुढे वाचा.
🔹 3D वस्तूंसाठी AI
Roblox ने Cube 3D नावाचे नवीन AI model विकसित केले आहे जे text prompts वरून 3D वस्तू तयार करू शकते. Roblox म्हणते की Cube 3D developers साठी 3D निर्मिती अधिक कार्यक्षम करेल, यामुळे त्यांना जास्तीत जास्त नवीन कल्पनांवर लक्ष देता येईल. पुढे वाचा
🔹 Google चे AI औषध शोधात मोठे पाऊल
Google ने न्यूयॉर्कमध्ये झालेल्या "Check-Up" या आरोग्य विषयक वार्षिक कार्यक्रमात एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी TxGemma नावाचे AI-powered models विकसित केले आहेत जे औषध संशोधनाच्या क्षेत्रात क्रांतिकारक बदल घडवू शकतील. सामान्यपणे, एखादे नवीन औषध विकसित करण्यासाठी 10-15 वर्षे आणि अब्जावधी डॉलर्स खर्च होतात. परंतु Google च्या या नवीन technology मुळे हा कालावधी आणि खर्च दोन्ही कमी होऊ शकतील.
TxGemma models हे Google च्या Gemma AI models वर आधारित आहेत, परंतु त्यामध्ये खास pharmaceutical research साठी वैशिष्ट्ये जोडली गेली आहेत. हे models सामान्य माहिती (text) समजू शकतात, पण त्याच बरोबर कठीण रसायनिक रचना, छोटे अणू, प्रथिने, इत्यादींचे स्ट्रक्चर सुद्धा ओळखू शकतात. हे अतिशय महत्त्वाचे आहे कारण शास्त्रज्ञांना नवीन औषधांच्या संभाव्य प्रभाव आणि दुष्परिणामांचा अंदाज बांधण्यात मदत होईल. पुढे वाचा.
🔹OpenAI चे सर्वात महागडे AI
OpenAI ने त्यांच्या नवीन o1-pro AI model ची घोषणा केली आहे, जो त्यांच्या o1 मालिकेतील प्रगत आवृत्ती आहे. हे model AI तंत्रज्ञानातील एक मोठा पुढचा टप्पा मानला जात आहे, कारण त्याला "जनरल इंटेलिजन्स"च्या जवळ असलेले मानले जाते. परंतु ज्या गतीने या क्षेत्रात प्रगती होत आहे, त्याची किंमत सुद्धा वाढत आहे.
o1-pro वापरणे हे अतिशय महागडे आहे - इनपुटसाठी (म्हणजे तुम्ही जे लिहिता ते) $150 प्रति दशलक्ष tokens आणि आउटपुटसाठी (म्हणजे AI जे उत्तर देते ते) $600 प्रति दशलक्ष tokens खर्च येतो. हे दर OpenAI च्या GPT-4.5 पेक्षा दुप्पट आणि सामान्य o1 model पेक्षा 10 पट जास्त आहेत. या किंमतीमुळे o1-pro हे फक्त मोठ्या कंपन्या आणि संशोधन संस्थांसाठीच परवडणारे असेल, आणि सामान्य वापरकर्त्यांसाठी अत्यंत महाग ठरेल. पुढे वाचा
🔹 Anthropic च्या Cloud मध्ये नवीन AI Search फीचर!
Anthropic ने आपल्या Claude AI chatbot मध्ये web search चा नवा फीचर launch केला आहे. हा फीचर फक्त Claude 3.7 Sonnet model वर उपलब्ध आहे आणि सध्याला only US मधील paying users साठी available आहे.
या नव्या feature मुळे Claude आता इंटरनेटवरून माहिती शोधू शकतो आणि त्याबरोबर source citations पण देतो, जेणेकरून users त्या information ची खात्री करू शकतील.
तरीही, एका अभ्यासात असे समोर आलं आहे की AI-powered chatbots web search मध्ये जवळपास 60% प्रश्नांची चुकीची उत्तरं देतात.
Anthropic चा plan आहे की पुढच्या काही आठवड्यांमध्ये हा feature इतर देशांमध्ये पण launch करावा. पुढे वाचा.
🔹 वैयक्तिक AI सुपरकॉम्प्युटर्स
Nvidia, जे जगातील सर्वात मोठ्या GPU निर्माता कंपन्यांपैकी एक आहे, त्यांनी त्यांच्या GTC 2025 कॉन्फरन्स मध्ये अभूतपूर्व घोषणा केली आहे. त्यांनी दोन नवीन "personal AI supercomputers" सादर केले आहेत - DGX Spark आणि DGX Station, जे व्यक्तिगत वापरासाठी डिझाइन केलेले सुपरकॉम्प्युटर्स आहेत.
DGX Spark हा त्यापैकी पहिला model आहे जो दर सेकंदाला 1,000 ट्रिलियन ऑपरेशन्स पूर्ण करू शकतो. हे असे वेग आहे जो काही वर्षांपूर्वी फक्त सरकारी किंवा अत्यंत मोठ्या कंपन्यांच्या डेटा सेंटरमध्ये शक्य होता. आता हीच शक्ती तुमच्या घरी किंवा ऑफिसमध्ये वापरली जाऊ शकते.
दुसरा model, DGX Station, हा अजून जास्त प्रगत आहे आणि त्यामध्ये Nvidia चा GB300 Grace Blackwell Ultra Desktop Superchip वापरला गेला आहे. या मशीनमध्ये 784GB मेमरी आहे, जे सामान्य कॉम्प्युटरपेक्षा 30-40 पट जास्त आहे. या सुपरकॉम्प्युटर्सचा वापर करून, संशोधक, designers, आणि engineers आता अत्याधुनिक AI models घरीच चालवू शकतील, ज्यासाठी आधी cloud सर्व्हिसेस वापरणे आवश्यक होते. हे नवीन सुपरकॉम्प्युटर्स AI क्रांतीला व्यक्तिगत पातळीवर आणणार आहेत. पुढे वाचा
Prompt of the Week
आपला या आठवड्यातील प्रॉम्प्ट त्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे ज्यांना त्यांची एकाग्रता वाढवायची आहे, कामाची पद्धत सुधारायची आहे, आणि काम करताना एकूण उत्पादकता वाढवायची आहे.
Prompt : I need suggestions for techniques that can help improve focus and productivity during work hours. The techniques should be practical, easy to implement, and effective in helping individuals stay focused and avoid distractions while working. Your task is to provide a list of proven techniques that can help improve focus, concentration, and productivity during work hours. Work environment: [work environment] Typical distractions: [typical distractions]
खालील लिंकवर क्लिक करा 🎁 आणि एखादा मजेदार AI एक्सपेरिमेंट व्हिडिओ किंवा AI बद्दल एखादा रंजक लेख किंवा एखादी गुपित टीप मिळवा !