There are no items in your cart
Add More
Add More
Item Details | Price |
---|
Hyundai आणि NVIDIA मिळून भविष्यातल्या Hyundai च्या गाड्यांमध्ये AI तंत्रज्ञान वापरण्यासाठी काम करत आहेत. self-driving गाड्या, robots, आणि कारखान्यांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी ते NVIDIA चं software आणि technology वापरणार आहेत.
CES 2025 मध्ये नवीन AI चष्मा
Halliday कंपनीने CES 2025 मध्ये नवीन AI smart glasses दाखवले आहेत. जगातला सगळ्यात छोटा optical module वापरून, display हा चष्म्याच्या फ्रेममध्ये बसवला आहे, लेन्समध्ये नाही. त्यामुळे चष्मा फक्त 35 ग्रॅम वजनाचा आहे. हा चष्मा रिअल-टाईम भाषांतर, नोटिफिकेशन्स आणि रस्ता दाखवू शकतो.
Grammarly ची नवीन Authorship फीचर
Grammarly ने Google Docs मध्ये टेक्स्ट कुठून आला आहे हे दाखवणारी नवीन Authorship फीचर बनवली आहे. ही फीचर चालू केल्यावर तुम्ही स्वतः टाईप केलेला मजकूर, वेबसाईटवरून कॉपी केलेला मजकूर किंवा अज्ञात स्त्रोतांमधून कॉपी केलेला मजकूर हे ट्रॅक करते.
Nvidia चिप्सवर US चे निर्बंध
US ने आतापर्यंतचे सर्वात कडक AI नियम लावले आहेत. त्यामुळे जगातल्या बहुतेक देशांना advanced AI chips आणि models मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागणार आहेत. Russia आणि China सारख्या विरोधी देशांना मात्र पूर्णपणे मनाई करण्यात आली आहे. फक्त काही US च्या मित्र देशांनाच सूट देण्यात आली आहे. Biden प्रशासनाच्या मते हे नियम US ला त्यांची 6-18 महिन्यांची आघाडी कायम ठेवण्यास मदत करतील, पण Nvidia ने याचे मोठे आर्थिक परिणाम होतील असा इशारा दिला आहे. दरम्यान, OpenAI ने US ने AI regulations कसे हाताळावेत याबद्दल त्यांचे स्वतःचे मत मांडले आहे.
Google ने बनवली कार्स साठी नवीन AI सिस्टम
Google नी एक नवीन AI सिस्टम तयार केली आहे जी Mercedes सारख्या कार कंपन्यांना त्यांच्या गाड्यांसाठी स्मार्ट voice assistant बनवण्यात मदत करेल. हे नवीन कार assistant ड्रायव्हर आणि प्रवाशांशी नैसर्गिकरित्या संवाद साधू शकतील. जवळपासच्या हॉटेल्स किंवा traffic बद्दल प्रश्नांची उत्तरे देऊ शकतील.
ChatGPT मध्ये टास्क शेड्यूल करण्याची नवीन सुविधा
OpenAI नी त्यांच्या ChatGPT AI assistant मध्ये एक नवीन फिचर जोडला आहे, ज्यामुळे युजर्स रिमाइंडर्स आणि रिपीट होणारे टास्क शेड्यूल करू शकतात. या फिचरमुळे, ChatGPT आता ठराविक वेळेला हवामान किंवा बातम्यांचे अपडेट्स देऊ शकेल.
Microsoft चे Pay-as-You-Go एजंट्स
Microsoft त्यांचा फ्री Copilot बिझनेससाठी Microsoft 365 Copilot Chat म्हणून रीलाँच करत आहे. याचा उद्देश बिझनेसला त्यांच्या कामात AI tools वापरण्याची सवय लावणे आहे, जेणेकरून ते पूर्ण Microsoft 365 Copilot सर्व्हिससाठी दर माहिन्याला प्रति युजर $30 देण्यास तयार होतील. Copilot Chat मध्ये तुम्ही AI "agents" तयार करू शकता जे तुमचा email मॉनिटर करणे असे काम करू शकतात. पण हे agents वापरण्यासाठी जास्ती पैसे मोजावे लागतील, जे तुम्ही किती वापरता त्यावर अवलंबून असेल.
या आठवड्यातील प्रॉम्प्ट खूप उपयोगी आहे आणि वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये लेखन सुधारण्यासाठी वापरता येऊ शकते. जसे की: Professional communication साठी, educational materials, marketing साठी किंवा अशी कोणतीही परिस्थिती जिथे स्पष्ट आणि प्रभावी लेखन महत्वाचे असेल, तिथे हे प्रॉम्प्ट तुमची मदत करू शकते.
PROMPT
खालील लिंकवर क्लिक करा 🎁 आणि एखादा मजेदार AI एक्सपेरिमेंट व्हिडिओ किंवा AI बद्दल एखादा रंजक लेख किंवा एखादी गुपित टीप मिळवा !
Mystry Link