Netbhet AI Newsletter! - January 25 - Week 1

नमस्कार मित्रांनो,
नेटभेट AI Newsletter मध्ये आपले स्वागत आहे.🙏

📰AI जगात काय घडतंय?


OpenAI ची मोठी कामगिरी

OpenAI ने बनवलेलं o3 मॉडेल खूप हुशार निघालं. ARC-AGI नावाच्या टेस्टमध्ये त्याने 76% मार्क मिळवले. ही टेस्ट AI ची बुद्धिमत्ता तपासते. नवीन गोष्टी समजून घेणं, शिकणं आणि त्या वापरणं यात हे AI किती चांगलं आहे ते या टेस्टमधून कळतं. आतापर्यंत कुठल्याही AI ने सामान्य माणसांपेक्षा जास्त मार्क मिळवले नव्हते. OpenAI चं हे मॉडेल ते करणारं पहिलं AI ठरलं आहे.

कोका-कोलाची AI मार्केटिंग

कोका-कोला आणि इतर मोठ्या कंपन्या AI चा वापर त्यांच्या मार्केटिंगसाठी करत आहेत. AI नवीन फोटो आणि व्हिडिओ बनवतं. शिवाय कुठले मेसेज लोकांना आवडतील, कधी जाहिरात दाखवली तर जास्त लोक पाहतील हे सुद्धा AI ठरवतं. यामुळे जाहिरातींचा खर्च कमी होतो आणि फायदा जास्त होतो. PetSmart सारख्या कंपन्या AI चा वापर करून त्यांच्या ग्राहकांशी वैयक्तिक पातळीवर संवाद साधू शकतात. 

 Coca Cola AI Ad - https://www.youtube.com/watch?v=4RSTupbfGog

फेसबुकचे नवीन AI फीचर

फेसबुक लवकरच AI बनवलेली अकाउंट्स सुरू करणार आहे. लोक स्वतःचे AI कॅरेक्टर्स बनवू शकतील. हे कॅरेक्टर्स इतरांशी खऱ्या माणसांसारखे चॅट करू शकतील. Meta कंपनी (फेसबुकची पॅरेंट कंपनी) त्यांच्या सगळ्या प्रॉडक्ट्समध्ये AI वाढवत आहे.

हेल्थकेअरमधला AI चा वापर

Carecode नावाची कंपनी हॉस्पिटलमधली रोजची कामं AI च्या मदतीने करणार आहे. उदाहरणार्थ:
- डॉक्टरांची अपॉइंटमेंट ठरवणं
- पेशंटला रिमाइंडर पाठवणं
- अपॉइंटमेंट कन्फर्म करणं
यामुळे कॉल सेंटरचा खर्च वाचेल आणि पेशंटला चांगली सेवा मिळेल.

जगातील पहिले AI विद्यापीठ

अबू धाबीमध्ये जगातलं पहिलं AI विद्यापीठ सुरू झालं आहे. Mohamed bin Zayed University of Artificial Intelligence (MBZUAI) मध्ये फक्त AI शिकवलं जातं. 45 देशांतले 365 विद्यार्थी इथे शिकत आहेत. विद्यार्थी तीन विषयांत master's किंवा PhD करू शकतात:
- Computer Science (संगणक विज्ञान)
- Machine Learning (मशीन लर्निंग)
- Robotics (रोबोटिक्स)

NASCAR मध्ये AI चा वापर

NASCAR ही कार रेसिंगची स्पर्धा आहे. 2025 पासून त्यांच्या playoff सिस्टममध्ये बदल होणार आहे. सध्याची सिस्टम रेसर्स आणि चाहत्यांना फारशी आवडत नाही. नवी सिस्टम बनवण्यासाठी ते AI चा वापर करणार आहेत. AI जुन्या रेसेसचा डेटा अभ्यासून सांगेल की कोणते बदल केले तर स्पर्धा अधिक रंगतदार होईल.


​🤖PROMPT OF THE WEEK

💼 ChatGPT च्या मदतीने नोकरीसाठी मुलाखतीचा सराव करा.

PROMT:

"I have an upcoming interview for [Position] at [Industry type]. Act as an experienced interviewer in this field.  Conduct a mock interview focusing on [specific skills/experience ]. Provide feedback on my response clarity, relevant examples, and areas for improvement."

   

🔍 Mystery Link

खालील लिंकवर क्लिक करा 🎁 आणि एखादा मजेदार AI एक्सपेरिमेंट व्हिडिओ किंवा AI बद्दल एखादा रंजक लेख किंवा एखादी गुपित टीप मिळवा !
Mystry Link