पैसा आपलं खरं रूप उघड करतो !

आपल्याला वाटतं, जर पुरेसे पैसे कमावले तर आपल्या सर्व समस्या संपतील, घरात सुखशांती नांदेल, आणि आपले सर्व नातीसंबंध सुधारतील.
दुर्दैवाने, प्रत्यक्षात तसं काहीही घडत नाही. खरंतर पुढील गोष्टी घडतात:
🔹१. छोट्या समस्या हळूहळू वाढत जाऊन मोठ्या समस्या बनतात. जेव्हा पैशांचा तणाव असतो तेव्हा ज्या छोट्या गोष्टींची तुम्हाला जाणीवही होतनाही नाही, त्याच गोष्टी पैशांचा तणाव गेल्यावर मोठ्या समस्या बनून बसतात. पैसा येतो तेव्हा या छोट्या समस्या अधिक ठळकपणे जाणवू लागतात.
================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/IcltwTPXamtKMo5AnUrnCd
येथे क्लिक करा.
================
🔹२. भरपूर पैसे असणे तुम्हाला बदलत नाही. ते फक्त तुमचं खरं स्वरूप उघड करतं - जे तुम्ही नेहमीच होता आणि कायम असाल. तुम्ही स्वभावाने चिंताग्रस्त असाल, तर ५ कोटी रुपये बँकेत रोख ठेवल्यावर तुमची काय अवस्था होईल ते बघा. तुम्ही उद्धट असाल, तर पैसा तुम्हाला अजून असह्य बनवेल. आणि तुम्ही उदार असाल, तर पैसा तुम्हाला अनेक लोकांचं आयुष्य बदलण्यात मदत करेल.
🔹३. तुम्हाला नवीन मित्र आणि ओळखी कराव्या लागतात. कारण बऱ्याच वर्षांपासून तुमच्या आयुष्यात असलेल्या लोकांशी जुळवून घेणे कठीण होऊ लागते. पैसा हाती आल्यानंतर तुम्हाला आता ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या तुमची मित्रमंडळी करू शकत नाहीत किंवा त्यांना त्या परवडत नाहीत. हळूहळू तुम्हाला वाटू लागतं की तुम्ही कदाचित त्यांच्यापेक्षा वरच्या पातळीवर पोहोचला आहात.
🔹४. तुमचे जवळचे लोक - अगदी तुमच्या अत्यंत जवळचे लोकसुद्धा - तुमचा द्वेष करू लागतात. जरी ते उघडपणे दाखवत नसले तरी. जरी तुम्ही त्यांना चिडवले नाही तरी. जरी तुम्ही त्यांना मदत केली तरी. खरंतर, विशेषतः तुम्ही त्यांना मदत केली तर हे अधिक घडते.
🔹५. भरपूर पैसे असणे म्हणजे भरपूर गोष्टींकडे मानसिक लक्ष द्यावे लागते आणि सतत नियोजन करावे लागते. सुट्ट्या आता एखाद्या प्रोजेक्ट सारख्या प्लॅन कराव्या लागतात. नवनवीन कार आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट्स बद्दल सतत स्वतःला अपडेटेड ठेवावे लागते.
🔹६ .तुम्हाला विचित्र, अगदी सामान्य गोष्टींमध्ये आनंद मिळू लागतो - स्वतःची कार धुणे, घरात व्हॅक्युम क्लीनर फिरवणे, किरकोळ कामं करणे, कपडे घडी घालणे इत्यादी.
मग भरपूर पैसा असणे चुकीचे आहे का ? तर नाही !
लक्षात ठेवा काही यश तुमच्या कामातून मिळणाऱ्या समाधानाच्या रूपात येईल. काही यश तुमच्या बँक खात्यातील आकड्यांवर अवलंबून असेल. दररोज सकाळी उठून प्रयत्न करण्याची ही दोन्ही कारणं महत्वाची आहेत. आणखी एक महत्त्वाचं सत्य लक्षात घ्या - “समाधानासाठीची लढाई कधीच थांबणार नाही”.

================
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !
असे आणखी माहितीपूर्ण लेख, व्हीडीओ, ऑडिओ मिळविण्यासाठी आणि मराठीतून शिकण्यासाठी आजच व्हॉट्सअ‍ॅप वर आमचा ग्रुप जॉइन करा. त्यासाठी https://chat.whatsapp.com/IcltwTPXamtKMo5AnUrnCd
येथे क्लिक करा.
================
आर्थिक यश मिळवल्यावर तुम्ही कसे वागता यावरूनच वैयक्तिक यशाची खरी सुरुवात होते. !
#wealth #success #lifestyle #mindset #satisfaction #abundance #lifegoals


सलिल सुधाकर चौधरी
नेटभेट ई-लर्निंग सोल्युशन्स
मातृभाषेतून शिकूया, प्रगती करूया !